heavy rain damage crop farmer esakal
जळगाव

Jalgaon Agriculture News: KYC अभावी शेतकऱ्यांचे अडकले 299 कोटी! नैसर्गिक आपत्तीतील नुकसानभरपाई प्रशासनाकडे पडून

Jalgaon News : शेतकऱ्यांनी ई- केवायसी केली, तर जिल्हा प्रशासनाला शासनाकडून आलेली नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देता येणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यातील २४ हजारांवर शेतकऱ्यांनी ई-केवायसी न केल्यामुळे नैसर्गिक आपत्तीत झालेल्या नुकसानीपोटी २९९ कोटी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देता येत नाही. २९९ कोटी जिल्हा प्रशासनाकडे पडून आहेत. शेतकऱ्यांनी ई- केवायसी केली, तर जिल्हा प्रशासनाला शासनाकडून आलेली नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देता येणार आहे. (Jalgaon Agriculture 299 crores of farmers stuck due to lack of KYC)

ई-केवायसी पूर्ण केल्याशिवाय या शेतकऱ्यांची लाभाची रक्कमही त्यांच्या बँक खात्यात जमा होणार नाही. जिल्ह्यात २४ हजार २७२ शेतकऱ्यांनी केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. ई- केवायसीअभावी लाभापासून कोणताही शेतकरी वंचित राह नये, यासाठी शेतकऱ्यांनी जवळच्या आपले सरकार केंद्रावर, संबंधित तालुका कृषी कार्यालय, तालुक्यातील कृषी सहाय्यकांशी संपर्क साधावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार यांनी केले आहे.

नैसर्गिक आपत्तींसह अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील २ लाख ६३ हजार ६८५ शेतकरी बाधित झाले आहे. त्यात चाळीसगाव (९६०५४), पारोळा (६०२६८) व मुक्ताईनगर (३३०६९) या तालुक्यातील शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे, तर भुसावळ तालुक्यात सर्वांत कमी बाधित आहेत. या शेतकऱ्यांसाठी शासनाने भरपाईची रक्कम उपलब्ध केली आहे.

"केवायसी न केल्यामुळे प्रशासनाला या मदतीची रक्कम अदा करण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. त्यामुळे केवायसी न केलेल्या शेतकऱ्यांनी तातडीने प्रक्रिया पूर्ण करून लाभ घ्यावा."

-सोपान कासार, निवासी उपजिल्हाधिकारी

(latest marathi news)

तालुकानिहाय नुकसान बाधित शेतकरी व केवायसी नसलेले

तालुका--बाधित--केवायसी बाकी

पारोळा--६०२६८--३७८७

यावल--२८४८--५८२

जळगाव--२४३६--४८२

रावेर--१४३१९--१२७५

जामनेर--९९६१--११५९

अमळनेर--३२८७--५५८

भुसावळ--२२८२--२५६

चोपडा--५९१०--१२११

बोदवड--३५८४--५२५

पाचोरा--१४८७७--५६३

मुक्ताईनगर--३३०६९--४१३८

भडगाव--३८५१--८०

एरंडोल--३३१२--१७१

धरणगाव--७६२६--२१२

चाळीसगाव--९६०५४--९२७३

एकूण--२६३३८५--२४२७२

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

Wayanad Loksabha ByElection : ‘बनवाबनवी’त भाजप पटाईत; वायनाडच्या व्हायरल व्हिडिओवरून काँग्रेसचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Elections 2024 : मोदींच्या सभांचा राज्यात धडाका ?

Bomb Attack : इराक, सीरियावर तुर्किएचा बॉम्बवर्षाव; कुर्दिश दहशतवाद्यांची ठिकाणे केली नष्ट

अग्रलेख : उघड्यावरचे वाघडे!

SCROLL FOR NEXT