Farmers tending summer cotton Women weeding esakal
जळगाव

Jalgaon Agriculture News : तालुक्यात कापसाचा पेरा वाढणार; चांगल्या पावसाच्या अपेक्षेने आशा उंचावल्या

Jalgaon Agriculture : तालुक्यात मागील खरीप हंगामात ५६ हजार ४७३ हेक्टरवर पेरण्या झाल्या होत्या.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Agriculture News : तालुक्यात मागील खरीप हंगामात ५६ हजार ४७३ हेक्टरवर पेरण्या झाल्या होत्या. त्यात सर्वाधिक पेरा कापसाचा ३४ हजार ७०० हेक्टर होता. यंदा पाऊस चांगला होणार असल्याने खरिपाच्या पेरण्या ५७ हजार हेक्टरपर्यंत जातील, असा अंदाज आहे. जिरायती पिकांची उत्पादकता ८७६ किलो प्रतिहेक्टरी, तर बागायत पिकांची उत्पादकता १०३१ किलो प्रतिहेक्टरी आहे. ( Cotton sowing will increase in district )

तालुक्यात कपाशीचे क्षेत्र अधिक असल्याने एक लाख ७२ हजार बियाण्यांच्या पाकिटांची मागणी केली होती. ती सर्व उपलब्ध झाली आहेत. जळगाव जिल्ह्याचे ठिकाण असल्याने खतांची मुबलकताही आहे. यामुळे शेतकऱ्यांना बियाणे, खतांची टंचाई जाणवणार नाही. शेतकऱ्यांनी केवळ एकाच कापूस वाणाची मागणी करू नये. उत्पादकता अधिक असलेली इतर अनेक वाणही आहेत.

बियाण्यांची टंचाई करून काळाबाजार करणाऱ्या सुमारे सात बियाणे विक्रेत्यांवर कारवाई झाली आहे. अजित ५००, अंकुर यासह लांब धागा देणाऱ्या बियाण्यांना मागणी आहे. जादा दराने बियाणे विक्री करणाऱ्यांवर कृषी विभागाने कारवाई सुरू केली आहे. जिल्ह्यात खरीप कर्जाचे उद्दिष्ट ३९९९ कोटी आहे. त्यात जिल्हा बँकेचे १२०९ कोटी, तर राष्ट्रीयकृत बँकांचे २७९० कोटी आहे. जिल्ह्यात ४५ हजार ६०० शेतकऱ्यांनी पीकविमा काढला आहे. (latest marathi news)

त्यात २५ टक्के अग्रीम मंजूर झाला असून, ८२ कोटी मंजूर झाले आहेत. त्यापैकी ७९ कोटी शेतकऱ्यांना वितरित झाले आहे. ३ कोटी देणे बाकी आहे. यात अनेक शेतकऱ्यांचे केवायसी पूर्ण नाही, काहींचे बॅंकेतील नाव व आधार कार्डावरील नावाचे स्पेलिंग जुळत नाही आदी समस्या आहेत. त्या मिटविण्यात येत आहेत. जिल्हा परिषदेने पशुसंवर्धन विभागाला पशूंना लसीकरण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार लसीकरण सुरू झाले आहे.

''जिल्ह्यात बियाणे, खतांची उपलब्धता आहे. शेतकऱ्यांनी कापसाच्या एकाच वाणाची मागणी करू नये. इतर अनेक वाण आहेत, जे चांगले उत्पादन देतात. त्याची पेरणी करावी. पेरणीची घाई न करता ६७ मिलिमीटर पाउस झाल्यानंतर पेरण्या कराव्यात.''-कुर्बान तडवी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

''यंदा चांगल्या पावसाचा अंदाज आहे. यामुळे कपाशीचा पेरा अधिक राहील. शेवटी अतिवृष्टी न झाल्यास कापसाचा दर्जा टिकेल. पेरणीची तयारी पूर्ण केली आहे. दमदार पावसाची आवश्‍यकता आहे.''-खेमचंद्र महाजन, शेतकरी, असोदा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT