Field spraying by drones. esakal
जळगाव

Jalgaon Drone Farming : ‘ड्रोन’ फवारणीमुळे वेळ, पाणी, औषध अन् पैशांची बचत! बोदवड परिसरात एकरी 300 रुपये भाडे

Agriculture News : शंभर लिटर पाणी दहा पंपाला लागते आणि मजूर फक्त दिवसात दहा पंप फवारणी करतो तर यासाठी शेतकऱ्याला सहाशे रूपये मजुरी, पाणी वाहतूक खर्च चारशे रूपये, पंप भाडे शंभर रूपये लागते.

अमोल आमोदकर

बोदवड : येथे ड्रोन फवारणीमुळे शेतकऱ्यांचा वेळ, पाण्यासह मजुरीची बचत होत असून, खिशाला लागणारी कात्रीही थाबली आहे. खरिपाची पेरणी होऊन दोन महिने झाले. मागील दहा, बारा दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने शेतीची कामे करण्यासाठी शेतात वाफ नाही. सर्व शेतात चिखल मोठ्या प्रमाणात असल्याने चिखलात चालताही येत नाही.

यामुळे शेतकऱ्यांच्या मका पिकावर लष्करी अळी तर कपाशीवर बोंडअळी, मावा, कपाशी दाडी लाल पडणे, असा प्रादुर्भाव दिसत आहे. परिणामी, शेतकरी राजा चिंतेत आहे. त्यात कीटकनाशक किंवा तणनाशक फवारणीसाठी एकरी एक मजूर, एका पंपाला २० लिटर पाणी लागते.

म्हणजे शंभर लिटर पाणी दहा पंपाला लागते आणि मजूर फक्त दिवसात दहा पंप फवारणी करतो तर यासाठी शेतकऱ्याला सहाशे रूपये मजुरी, पाणी वाहतूक खर्च चारशे रूपये, पंप भाडे शंभर रूपये लागते. तरी देखील एकच एकर शेती फवारणी होते. यात औषधांचा खर्च भावाप्रमाणे असतो. या आर्थिक पिळवणूकमधून शेतकऱ्यांना आता दिलासा मिळाला आहे. (drone spraying 300 per acre rent in Bodwad area)

फवारणी ‘ड्रोन’ आल्याने दहा लिटर पाण्यात एक एकर शेती फवारणी होते. शेतात चिखलात जाण्याची गरज नाही. बाधावर उभे राहून फवारणी शक्य होते. तर पंपामध्ये लागणाऱ्या फवारणीपेक्षा ड्रोनमध्ये औषध फक्त चाळीस टक्केच लागते आणि दहा मिनिटात फवारणी करून मोकळे.

या मुळे शेतकऱ्यांचे औषध, पाणी, वेळही वाचतो आणि आर्थिक कात्री थांबते, हे फवारणी ड्रोन अनिल खंडेलवाल यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना फायदा व्हावा, यासाठी आणले असून, यासाठी इम्रान नामक तरूणाला हे ड्रोन हाताळणीसाठी प्रशिक्षण घेण्यासाठी पुणे पाठविण्यात आले होते. (latest marathi news)

इम्रान याने आजपर्यंत रमेश अग्रवाल, कैलास खंडेलवाल, अमित सुराणा, अनिल चौधरी यांच्या शेतात ड्रोन फवारणी केली आहे. ड्रोन फवारणीसाठी खंडेलवाल हे एकरी तीनशे रुपये भाडे आकारत असून, शेतकरी समाधानी आहे. या ड्रोन फवारणी यंत्र हाताळणी करीत असताना इम्रान याला पायलट असे नामकरण संबोधले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT