Vaibhav Wagh esakal
जळगाव

Jalgaon News : ‘वैभव’ पाहण्यावेळीच वैभव यांना हिरावले; वाघ कुटुंबात कर्ता पुरुष जाण्याच्या घटनेची पुनरावृत्ती

Jalgaon News : मुलाच्या नावाप्रमाणे ‘वैभव’ पाहण्याच्या वेळीच नियतीने मुलालाही हिरावून नेल्याची घटना पांढरद (ता. भडगाव) येथील वाघ कुटुंबीयांवर ओढवल्याने संपूर्ण गाव दुःखात बुडाले आहे.

सुधाकर पाटील

भडगाव : मुलगा १२ दिवसांचा असतानाच वडिलांचे छत्र हरपले. आईने हिंमत न सोडता मुलाला उच्चशिक्षित केले. तो पोलिस दलात कार्यरत झाला. मुलाच्या नावाप्रमाणे ‘वैभव’ पाहण्याच्या वेळीच नियतीने मुलालाही हिरावून नेल्याची घटना पांढरद (ता. भडगाव) येथील वाघ कुटुंबीयांवर ओढवल्याने संपूर्ण गाव दुःखात बुडाले आहे. अकोले (जि. अहमदनगर) येथे प्रवरा नदीत बचावकार्य करताना ‘एसडीआरएफ’च्या जवानांची बोट बुडून तिघांचा मृत्यू झाला. त्यातील जवान वैभव वाघ हे पांढरद (ता. भडगाव) येथील आहेत. (Jalgaon Akole three died boat sank rescue operation in Pravara river)

सुगाव बुद्रुक (ता. अकोले, जि. अहमदनगर) येथील प्रवरा नदीत बुडालेल्या तरुणांच्या शोधासाठी धुळे येथील ‘एसडीआरएफ’च्या पथकाला पाचारण करण्यात आले होते. बोटीच्या सहाय्याने बचावकार्य करताना अचानक बोट उलटली. त्यात पोलिस उपनिरीक्षक प्रकाश शिंदे, पोलिस शिपाई वैभव वाघ, राहुल पावरा यांचा बुडून मृत्यू झाला.

ही घटना आज सकाळी घडली. वैभव वाघ हे मूळचे दहिवद (ता. चाळीसगाव) येथील आहेत. मात्र, त्यांचे कुटुंब पांढरद येथे स्थायिक झाले. वैभव हे १२ दिवसांचे असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे आईनेच वडिलांचीही जबाबदारी स्वीकारून मुलाला वाढविले. त्यांना शिक्षित केले.

आईचे वडील निवृत्त शिक्षक (कै.) दिनकर भामरे, मामा गणेश भामरे व वडिलांच्या वडिलांसह भावाने त्यांना साथ दिली. आई गावातच अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहेत. वैभव यांचे डी. एड.चे शिक्षण झाल्याने त्यांना शिक्षक म्हणून नोकरीही मिळाली. मात्र, त्याचवेळी पोलिस व ‘एसडीआरएफ’ जवानाची ऑर्डरही आली. वैभव यांनी पोलिस दलात रुजू होण्याचा निर्णय घेतला. (latest marathi news)

सुखी संसारात नियतीचा घाला

वैभव नोकरीला लागल्यावर आईसह कुटुंबीय स्थिरावले होते. त्यांच्या संसारवेलीवर मुलगा मितांशू (वय ६) व मुलगी कृतिका (३) फुलले होते. अशातच या सुखी कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळल्याने पांढरद गावात आज चूल पेटली नाही. त्यांच्या आई संगीता वाघ यांचा आक्रोश मन हेलावणारा होता.

अगोदरच पतीच्या जाण्याने त्या मुलाकडे पाहत आशेने जीवन जगत होत्या. आता एकुलता मुलगाही गमावल्याने त्यांच्या दुःखाला सीमा उरली नाही. १९९३ मध्ये वैभवच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यांच्या जाण्याने वैभवच्या आईवर जो प्रसंग ओढवला, तसाच प्रसंग तीन दशकांनंतर वैभव यांच्या पत्नीच्या वाट्याला आल्याने वाघ कुटुंबात कर्ता पुरुष जाण्याच्या घटनेची पुनरावृत्ती झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात आली.

जवानावर आज अंत्यसंस्कार

सेवा बजावताना वीरमरण आलेल्या जवान वैभव वाघ यांच्यावर शुक्रवारी (ता. २४) सकाळी आठला पांढरद गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. अकोले येथून त्यांचे पार्थिव सुरवातीला धुळे येथे आणण्यात येईल. तेथे मानवंदना दिल्यावर पांढरद येथे नेण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT