Akshaya Tritiya 2024 esakal
जळगाव

Akshaya Tritiya 2024 : आखाजीचा झोका दिसेनासा... गेल्या सखी कुणीकडे! जीवनशैली बदलाचा परिणाम

ॲड. बाळकृष्ण पाटील

Akshaya Tritiya 2024 : खानदेशात आखाजी म्हणजेच अक्षय तृतीया. ग्रामीण भागात सासूरवासिनींचा खूप मोठा सण. या सणाला सासरी गेलेली मुलगी माहेरी येते आणि अक्षय्य तृतीयेच्या सणाच्या निमित्ताने माहेरच्या गोतावळ्यात गोडधोड खात आनंद उपभोगते. आखाजीच्या पंधरा दिवस अगोदरच घरात, झाडाला, मळ्यात बांधलेल्या झोक्यावर आपल्या सखींना घेऊन अक्षय्य तृतीयेची गाणी म्हणते. (jalgaon akshaya tritiya celebrated in khandesh )

उंचच उंच आणि लांबच लांब झोका, अशा प्रकारचा हा सण. मात्र, अक्षय तृतीया येऊन गेली, तरी झोका दिसेनासा झाला आहे. जणू काही सखीच कुठेतरी गेल्या, हे समजेना असे झाले आहे. पारंपरीक पद्धतीने गेल्या असंख्यपिढ्या अक्षय्यतृतीयेचा सण साजरा करतात. या सणाला घागरी भरल्या जातात. बरेच कुटुंब नव्या आंब्याच्या रसाचा नैवैद्य दाखवीत रस खाण्याची सुरवात करतात. आदल्या दिवशी कुंभाराच्या घरून शंकर आणि पार्वती आणतात.

हा शंकर म्हणजे जावई व पार्वती, गौराईचा हा सण साजरा करताना दांडिया गाणी म्हणतात. हे सर्व होतच असते. परंतु, अक्षयतृतीयेचा पंधरवडा असतो, तो खरे म्हणजे सासूर वास सोडून माहेरी आलेल्या आणि घरातील बालिकांसोबत, सखींसोबत झोक्यावर गाणी म्हणण्यासाठी. खरं म्हणजे अक्षय तृतीया आली परंतु, लोकसभेच्या धामधूमीत जसा प्रचार आणि प्रसार काही ठिकाणी पोहोचलाच नाही, तशीच गत या वर्षाच्या आखाजीची दिसून येते.

गेली अनेक दशके पारंपरिक पद्धतीने झोक्यावरच्या गाण्यांनी गाजणारी आखाजी यावर्षी तशी सुनी-सुनी वाटू लागली आहे. गल्लीतील प्रत्येक झाडाला असलेला झोका, खळ्यात अन्‌ मळ्यात दिसणारा झोका, त्यावर होणारी माहेराचे आणि शेतीभातीचे महत्व सांगणारी गाणी कुठे हरवली?, हे समजेना असे झाले आहे. ( latest marathi news )

खरं म्हणजे काळ बदलला, सासरी गेलेल्या मुली दिवाळी व आखाजीलाच येतील, असेही राहिले नाही. कामानिमित्ताने त्यांचे जाणे-येणे होत असते. रुढी व परंपरांमध्ये काळानुसार बदल होत असतात, तसेच म्हणावे की काय, पण या वर्षाच्या आखाजीला उंच जाणारा झोका तसा दिसेनासाच झाला आहे.

‘आथानी कैरी, तथानी कैरी..!’

सखी अक्षय तृतीयेची असंख्य गाणी गेली, अनेक पिढ्या म्हणत आलेली आहेत. ‘'आथानी कैरी, तथानी कैरी, कैरी झोका खाय वं, कैरी तुटणी, खडक फुटना, झुई झुई पाणी व्हाय वं....... झुई झुई पाणी व्हाय तठे कसाना बजार वं....’’ या एका गाण्याभोवती फिरणारी आखाजी ‘'चैत्र वैशाख नं ऊन व माय’’ अशी असंख्य गाणी घेऊन सखी झोक्यावर दंग होतात अन्‌ एक-एक गाणी म्हणत पुरणपोळीच्या जेवणाची वेळही विसरतात.

अशा प्रकारचा हा सण म्हणजे आखाजी. परंतु, यावर्षी ग्रामीण भागात सर्वत्र किरकोळ अपवादवगळता हे दृश्याचं दिसणे तसे कठीण झाले आहे. याच आखजीला पूर्वी सालदारांचं साल (वर्षाचा मेहेनताना) ठरत असे. आता साल सोडा महिनदारही मिळत नाही. त्यामुळे पूर्वीची आखाजी आता पार बदलली, असेच म्हणावे लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT