चोपडा : चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखान्यातील कर्मचाऱ्यांचे कारखान्याकडे थकीत असलेले वेतन, भविष्यनिर्वाह निधीची रक्कम, विम्याची रक्कम इतर सर्व रक्कमा अद्यापही मिळाल्याच नाहीत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी येणाऱ्या सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी करण्याचा निर्णय राष्ट्रीय साखर कामगार संघाने घेतला आहे. (All party leaders will banned by chopada sugar factory workers)
याबाबत राष्ट्रीय साखर कामगार संघाच्या चोपडा शाखेच्या वतीने चोपडा येथील तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, चोपडा साखर कारखाना कामगारांचे मागील वर्षापासून वेतन थकीत आहे. शासन प्रशासन व कारखाना संचालक यांना अनेक वेळा विनंती करूनही त्यांचे वेतन व भविष्यनिर्वाहाची रक्कम, विम्याची रक्कम व इतर सर्व रकमा अजूनही मिळालेल्या नाहीत.
सत्ताधारी पक्षासह विरोधी पक्षाच्या नेत्यांना विनंती करून, वेळोवेळी आंदोलने करून कोणताच मार्ग निघत नाही. हक्काच्या वेतनासह विमा रक्कम इतर रकमांपासून वंचित ठेवण्यात येत आहे. कामगारांकडे पैसे नसल्याने त्यांच्या मुला-मुलींचे लग्न इच्छा असतानादेखील करता येत नाहीत.
कामगार आर्थिक अडचणीत सापडले आहेत, कर्मचाऱ्यांच्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती अनेक व्याधींनी ग्रस्त झालेले आहेत. त्यांच्या औषधी उपचारासाठी पैसे नाहीत. म्हणून संतप्त झालेल्या चोपडा साखर कारखाना कामगारांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी येणाऱ्या तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांना गावात येण्यास मज्जाव म्हणजे गावबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. (latest marathi news)
गळीत हंगाम सुरू होऊ देणार नाही!
चोपडा साखर कारखाना बारामती ॲग्रोला भाडेतत्त्वावर दिलेला आहे. तरीदेखील कामगारांच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. हक्काच्या रकमांपासून वंचित ठेवण्यात येत आहे. म्हणून या वर्षाच्या कारखान्याच्या गळीत हंगाम सुरू होऊ देणार नाही, असा इशारा चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखान्यातील राष्ट्रीय कामगार संघाने ‘चोसाका’चे अध्यक्ष व तहसीलदार यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
यापूर्वी राष्ट्रीय कामगार संघ चोपडाद्वारा प्रादेशिक सहसंचालक व साखर आयुक्त पुणे यांना याबाबत पत्र दिले होते. त्यांनी चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याचे पत्र राष्ट्रीय कामगार संघास दिल्याचेही निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर अध्यक्ष भागवत मोरे, उपाध्यक्ष विश्वनाथ सोनवणे, सचिव सुनील पाटील, रामकृष्ण पाटील, धोंडू पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.