A pond in the bus stand area. In the second photo, the rough path leading to the driver's and porter's restrooms esakal
जळगाव

Amalner MSRTC Depot: अमळनेर येथील बसस्थानक असुविधांचे आगार! प्रवाशांचे हाल; परिसरात पायाभूत सुविधांची वाणवा, कर्मचाऱ्यांचीही गैरसोय

Latest Jalgaon News : अमळनेर बसस्थानक असुविधांचे आगारच बनले असून, परिसरात सर्वदूर अस्वच्छतेचे चित्र पाहायला मिळत आहे.

सकाळ वृत्तसेवा

आर. जे. पाटील : सकाळ वृत्तसेवा

अमळनेर : येथील बसस्थानक परिसरात पायाभूत सुविधांची वाणवाच आहे. विद्यार्थी, प्रवासी, वाहक, चालक सर्वांनाच समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अमळनेर बसस्थानक असुविधांचे आगारच बनले असून, परिसरात सर्वदूर अस्वच्छतेचे चित्र पाहायला मिळत आहे. (Amalner MSRTC Depot inconvenience plight of passengers)

अमळनेर बसस्थानक हे जळगाव, धुळे व नंदुरबार या तीन जिल्ह्यांना जोडणारे मोठे आगार आहे. त्यामुळे बसस्थानकात प्रवासी संख्या नेहमीच लक्षणीय असते. विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांची संख्या त्यात अधिक असते. मात्र, त्यांना मूलभूत सुविधा पुरविण्यात आगार प्रशासन कमी पडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

गणपती उत्सवानंतर सणासुदीच्या दिवसांना सुरवात झाल्याने आगारातील प्रवासी संख्या वाढली आहे. मात्र, आगारातील बसगाड्यांची संख्या मर्यादित असल्याने फेऱ्यांवर व उत्पन्नावर देखील त्याचा परिणाम जाणवत आहे. त्यातच अमळनेर आगारालाच पारोळा आगार जोडलेला आहे. सध्या आगारात फक्त ६९ बसगाड्या कार्यान्वित आहेत.

कोरोनाच्या आधी हीच संख्या ९०पेक्षा होती. एका दिवसात याच उपलब्ध बसगाड्यांच्या माध्यमातून ६१६ फेऱ्या मारल्या जातात. त्यातून एका दिवसात अंदाजे पाच ते सहा लाखांचे उत्पन्न आगाराला प्राप्त होते. आगारातून सुरत, इंदोर, पुणे, अकोला या लांब पल्ल्यांच्या बसगाड्या सुरू आहेत. नाशिकपर्यंत बसगाड्या जात असल्याने मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना तेही सोयीचे होते.

बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. पावसाळ्यात सर्वदूर चिखलाचे साम्राज्य पसरलेले असते. बसस्थानक परिसरातील पिण्याच्या पाण्याचा जलकुंभ बाराही महिने कोरडाठाकच पडलेला आहे. त्यामुळे प्रवासी नागरिकांचे पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याचे चित्र पाहायला मिळते.

बसचालक व वाहकांनादेखील असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो. आराम कक्षाची अवस्था ही दयनीय आहे. पावसाळ्यात प्रसाधनगृहाकडे जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याचे काही कर्मचाऱ्यांनी नाव छापण्याच्या अटीवर सांगितले. (latest marathi news)

"अनेक बसचालक व वाहक विद्यार्थ्यांना बसमध्ये बसविण्यासाठी नकार देत असतात. त्यामुळे शाळेला येताना व घरी जातानाही उशीर होत असतो. म्हणून पर्यायाने आमची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते."- गोपाल पाटील, विद्यार्थी.

"अमळनेर बसस्थानकावर बसगाड्या नेमून दिलेल्या फलाटावर न लागता, इतरत्र कुठेही लागतात. त्यामुळे अनेकदा प्रवाशांचे हाल होतात व त्यातच बस निघून जाते. म्हणून गैरसोयीला तोंड द्यावे लागते." -दिलीप जाधव, प्रवासी.

"अमळनेर आगाराच्या अंतर्गत असलेल्या बसस्थानकांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कुठल्याही पद्धतीची गैरसोय होणार नाही, याबाबतची काळजी घेतली जाईल."

-प्रमोद चौधरी, आगार व्यवस्थापक, अमळनेर.

प्रमुख समस्या अशा

-पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही

-बसस्थानक परिसरात खराब रस्ता

-बसगाड्यांची अपुरी संख्या

-कर्मचारी आराम कक्षाची दूरवस्था

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

Latest Maharashtra News Updates : एक्झिट पोलनुसार महायुतीचे सरकार स्थापन होणार : रामदास आठवले

SCROLL FOR NEXT