Trainees present with District Collector Ayush Prasad while guiding in the training organized in connection with the Lok Sabha elections esakal
जळगाव

Jalgaon News : अमळनेरला शंभर दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांना नोटिसा!

Jalgaon News : लोकसभा निवडणुकीत मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर मतदार संघातील दीड हजारावर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

अमळनेर : लोकसभा निवडणुकीत मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली अमळनेर मतदार संघातील दीड हजारावर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणाला दांडी मारलेल्या १०० कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या. सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी महादेव खेडकर,तहसीलदार रुपेशकुमार सुराणा उपस्थित होते.

शहरातील ग्लोबल व्हीव इंग्लिश मीडियम स्कूल येथे दोन सत्रात १६५० कर्मचाऱ्यांनी निवडणूक पूर्व प्रक्षिक्षण घेतले. प्रशिक्षणातून लोकसभा निवडणुकीत केंद्राध्यक्ष,प्रथम मतदान अधिकारी, द्वितीय मतदान अधिकारी तसेच सहाय्यक मतदान अधिकारी यांच्या कामांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

एका विधानसभा मतदारसंघातील ५० टक्के मतदान केंद्रावर वेब कास्टिंग द्वारे कॅमेऱ्याची नजर राहणार असून तालुक्यात एकूण ३२० मतदानकेंद्रे आहेत, यापैकी ५ मतदानकेंद्रे ही अतिसंवेदनशील आहेत. प्रशिक्षणावर आधारित २५ प्रश्नांची बहूपर्यायी प्रश्नपत्रिका देखील उपस्थित अधिकारी तसेच कर्मचारी यांच्याकडून सोडवून घेण्यात आली.याद्वारे किती माहिती प्रशिक्षणातून कर्मचाऱ्यांनी घेतली याची जणू परीक्षाच प्रशासनाने घेतली. (latest marathi news)

टपाली मतदान

मतदानासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी मतदानापासून वंचित राहू नये यासाठी त्यांना टपाली मतपत्रिकेद्वारे तसेच प्रत्यक्ष मतदान केंद्रावरच (इडिएस) पद्धतीने मतदान करता येणार आहे.शासकीय कर्मचाऱ्यांसोबतच अशासकीय कर्मचारी देखील पोस्टल मतदानाचा वापर करू शकणार आहेत.

यात निवडणूक कामात कार्यरत विविध वाहनांवरील चालक,निवडणूक कामकाजासाठी असलेले छायाचित्रकार तसेच इतरांना पोस्टल मतदान बजावता येणार असून पहिल्यांदाच ८५ व त्यापेक्षा जास्त वयोमान असलेल्या वृद्धांना टपाली मतदानाद्वारे मतदान करण्यात येणार आहे. नायब तहसीलदार प्रशांत धमके,प्रशिक्षण प्रमुख राजेंद्र जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल चे ६० पेक्षा जास्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण कामी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT