Seventh Pay Commission esakal
जळगाव

Seventh Pay Commission : सातवा वेतन आयोगाच्या थकबाकीच्या पाचव्या हप्त्याची रक्कम होणार अदा

Jalgaon News : कोविडमुळे राज्याच्या महसूली जमेवर झालेला प्रतिकूल परिणाम विचारात घेऊन शासकीय, इतर पात्र कर्मचारी व निवृत्तीवेतनधारकांना एक जुलै २०२२ला देय असलेल्या सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या चौथ्या हप्त्याचे प्रदान २४ मे २०२३च्या शासन निर्णयानुसार केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

अमळनेर : राज्य शासकीय, इतर पात्र कर्मचारी व निवृत्त कर्मचाऱ्यांना एक जुलै २०२३ला देय सातव्या वेतन आयोगाच्या अनुक्रमे वेतन व निवृत्तीवेत्तनाच्या थकबाकीच्या पाचव्या हप्त्याची रक्कम अदा करण्यात येणार आहे. भविष्यनिर्वाह निधी योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या थकबाकीची रक्कम त्यांच्या भविष्यनिर्वाह निधीच्या खात्यात जमा करावी व राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना अथवा परिभाषित अंशदायी निवृत्तीवेतन योजना लागू असलेल्या कर्मचारी व निवृत्तीधारकाना थकबाकीची रक्कम रोखीने जून २०२४च्या वेतनासोबत अदा करण्याचे निर्देश वित्त विभागाचे उपसचिव विनायक धोत्रे यांनी नुकतेच जारी केले. (amount of fifth installment of arrears of Seventh Pay Commission paid)

कोविडमुळे राज्याच्या महसूली जमेवर झालेला प्रतिकूल परिणाम विचारात घेऊन शासकीय, इतर पात्र कर्मचारी व निवृत्तीवेतनधारकांना एक जुलै २०२२ला देय असलेल्या सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या चौथ्या हप्त्याचे प्रदान २४ मे २०२३च्या शासन निर्णयानुसार केले आहे. याच शासन निर्णयात उर्वरित देय हप्ते देण्याबाबत कोणताही निर्णय घेतला नव्हता.

याबाबतचा निर्णय विचाराधीन होता. या पार्श्वभूमीवर २० जूनला शासन निर्णय घेण्यात आला. शासन अधिसूचना ३० जानेवारी २०१९ अन्वये सातव्या वेतन आयोगाची थकबाकी २०१९-२०पासून पुढील पाच वर्षांत पाच समान हप्त्यांत कर्मचाऱ्यांच्या भविष्यनिर्वाह निधी योजनेच्या खात्यात व निवृत्त कर्मचाऱ्यांना रोखीने देण्याचा निर्णय झाला होता. याबाबतची कार्यपद्धती शासन परिपत्रक २० फेब्रुवारी २०१९ अन्वये विहित केली आहे. (latest marathi news)

असे होईल वितरण!

निवृत्तीवेतनधारक, राज्य शासकीय कर्मचारी, सर्व जिल्हा परिषदा, शासन अनुदानित शाळा व इतर सर्व शासन अनुदानित संस्थांमधील पात्र कर्मचाऱ्यांच्या थकबाकीच्या पाचव्या हप्त्याची रक्कम जून २०२४च्या वेतनासोबत अदा करण्यात येईल. भविष्यनिर्वाह निधी योजनेस पात्र कर्मचाऱ्यांची रक्कम त्यांच्या भविष्यनिर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा होईल.

राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना अथवा परिभाषित अंशदायी निवृत्तीवेतन योजनेस पात्र कर्मचाऱ्यांची थकबाकी रोखीने अदा करण्यात येईल. जे कर्मचारी (भविष्यनिर्वाह निधी योजना लागू असलेल्यांसह) एक जून २०२३ ते या शासन आदेशांच्या दिनांकापर्यंत निवृत्त झाले असतील अथवा मृत्यू पावले असतील अशा कर्मचाऱ्यांना थकबाकी रोखीने अदा करण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT