Drainage Deepening work in progress. esakal
जळगाव

Jalgaon News : गांधलीत 18 कोटी लिटर्स पाणी जमिनीत जिरविण्याचा प्रयोग; ‘विप्रो’चा पुढाकार

Jalgaon News : विप्रो बंगळूरने मंजूर केलेल्या अडीच कोटीच्या निधीतून पहिल्या टप्प्यात अकराशे मीटर नाला खोलीकरण रुंदीकरण तयार झाले.

सकाळ वृत्तसेवा

गणपूर : शाश्वत शेतीसाठी 'संरक्षित पाणीपुरवठा' हा महत्त्वाचा घटक आहे. हे लक्षात घेऊन विप्रो बंगळूरच्या आर्थिक सहकार्यातून व मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेच्या मार्गदर्शनातून भले मोठे नाला खोलीकरण व साठवणूक बंधाऱ्यासह तलावाचे काम गांधली-पिळोद्यात पूर्णत्वास येत असून, त्याद्वारे सुमारे अठरा कोटी लिटर्स पाणी जमिनीत मुरविण्यात येणार आहे. (Jalgaon An experiment to soak 18 crore liters of water in ground in Gandhali)

गावातील जल स्रोतांचे सक्षमीकरण करणे, क्षमता वाढवणे यासाठी निधी खर्च करण्यास मर्यादा आहेत हे लक्षात आल्यावर गांधलीचे सरपंच नरेंद्र पाटील यांनी लोकसहभाग, ‘एनजीओ’ तसेच सामाजिक संघटना व कंपनी सीएसआर फंड मिळतात का? या संदर्भात सखोल माहिती घेऊन विप्रो कंपनीशी संपर्क साधला आणि विप्रोची सहमती व आर्थिक सहभागातून हा सुंदर प्रयोग पूर्णत्वास येत असून.

त्यामुळे या दोन्ही गावांचा पाणीप्रश्न मिटण्याच्या आशा वाढल्या आहेत. यात पाणी फाउंडेशनचे गावातील कार्यकर्ते, महिला बचत गटांचा देखील सहभाग करून घेतला आहे. आणि त्यातून जल चळवळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. (latest marathi news)

विप्रो बंगळूरने मंजूर केलेल्या अडीच कोटीच्या निधीतून पहिल्या टप्प्यात अकराशे मीटर नाला खोलीकरण रुंदीकरण तयार झाले. तसेच त्यातच दुसऱ्या टप्प्यात साधारण आठशे मीटरचे खोलीकरण झाले. लेंडी नाल्याचे देखील दीड किलोमीटर खोलीकरण झाले. गांधली, पिळोदे मिळून साडेतीन किलोमीटर अंतरातील नाला खोलीकरणात चार सिमेंट बंधारे बांधण्यात आले.

वरील दोन्ही नाल्यांचा संगम जिथे होतो तेथे गांधलीच्या स्मशानभूमीजवळ गांधली ते अमळगाव रस्त्यालगत साधारण अडीच एकर क्षेत्र आकाराच्या तलावाचे काम आता पूर्ण होत आहे. याच तलावात पुढे वॉटर रिचार्ज शाफ्ट देखील टाकण्याचे नियोजन आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT