Anandacha Shidha esakal
जळगाव

Anandacha Shidha : ‘आनंदा’च्या शिधा वाटपाला आचारसंहितेचा ’ब्रेक’! जून महिनाअखेरपर्यंत करावी लागणार प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा

Anandacha Shidha : राज्य शासनाने राज्यात सर्वत्र रेशन दुकानावर शंभर रुपयात आनंदाचा शिधा वाटप दर महिन्याला सुरू केले. २१ जानेवारीला ‘रामलल्ला’ची अयोध्येत प्राणप्रतिष्ठेनंतर सर्वच महिन्याला आनंदाचा शिधा वाटपाचा धोरण राज्य शासनाने अवलंबिले होते. शंभर रुपयात आनंदाचा शिधा मिळत असल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र आचारसंहिता सुरू झाल्याने गेल्या महिन्यापासून आनंदाचा शिधा मिळणे बंद झाले आहे. (jalgaon Anandacha shida distribution stop due to code of conduct for marathi news)

यंदा दिवाळीपूर्वीच आनंदाचा शिधा मिळाला होता. त्यानंतर येणाऱ्या सणापूर्वी आनंदाचा शिधा देण्याची योजना होती. सोबतच बीपीएल कार्ड धारकांना प्रती कार्ड एक साडी देण्याचे, दोन पिशव्या देण्याचे नियोजन होते. काहींनी साडी, पिशव्या देणे सूरू केले होते. तर काहींच्या रेशनदुकारांनावर साड्या, पिशव्या येणे बाकी होते.

आचारसंहितेची घोषणा होताच आनंदाचा शिधा, साडी, पिशव्या रेशनदुकानांतून देणे बंद करण्यात आले आहे. तसे आदेशच शासनाने काढले आहे. जळगाव जिल्ह्यासाठी ६ लाख १२ हजार ७६० कार्ड धारकांना दर महिन्याला आनंदाचा शिधा मिळत होता.

पंतप्रधानांची प्रतिमा

अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजना शिधापत्रिकाधारकांना दिवाळी सणानिमित्त एक किलो साखर, एक लिटर तेल, प्रत्येकी अर्धा किलो परिमाणात रवा, चनाडाळ, मैदा व पोहा असे सहा वस्तूंचा समाविष्ट असलेला ‘आनंदाचा शिधा’ हा संच १०० रुपये दरात ई-पॉस प्रणालीद्वारे वितरित करण्यात येत होता. मात्र शिधापत्रिकाधारकांना देण्यात येणाऱ्या आनंदाच्या शिधा ज्यात दिला जात त्या पिशवीवर पंतप्रधानांचे छायाचित्र असल्याने हा विषय आचारसंहितेत बसणारा नाही. त्यामुळे आचारसंहिता लागू होताच शिधा वाटप बंद झाले आहे. (latest marathi news)

आनंदाच्या शिध्याचे तालुकानिहाय मंजूर संच

पारोळा ३० हजार १०५

पाचोरा ४५ हजार

चोपडा ४४ हजार ४४३

बोदवड १५ हजार १९५

धरणगाव २९ हजार ७१०

अमळनेर ४६ हजार ३०७

भडगाव २६ हजार ८८५

चाळीसगाव ६१ हजार ८३

जळगाव ८३ हजार ९८८

जामनेर ४७ हजार ५८२

मुक्ताईनगर १७ हजार ६६५

कुऱ्हा ९ हजार ४३५

यावल ३७ हजार २६५

एरंडोल २५ हजार ३६३

भुसावळ ३८ हजार ५००

रावेर ३५ हजार ४५२

सावदा १८ हजार ७८२

एकूण ६ लाख १२ हजार ७६०

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT