Animal Adhar Card esakal
जळगाव

Jalgaon News: प्राण्यांना 12 अंकी टोकन आवश्यक! पशुसंवर्धन विभागाची मोहीम; मालकी हक्क, उपचारासह खरेदी-विक्रीसाठी उपयुक्त

Jalgaon News : रेशन घेताना मतदान करताना, पीकविमा काढताना, बसचा पास मिळविताना, रेल्वे प्रवास सवलतीसह अनेक ठिकाणी शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी त्याचा उपयोग होता

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहरासह जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांकडे शेतीसोबत दुग्ध व्यवसायासाठी गायी, म्हैस, शेळी, मेंढी आदी पशुधन आहे. यापैकी बहुतांश पशुधनाच्या कानाला ‘टोकन’ (बिल्ला) आहे. मात्र, काही नवजात वासरे वा गोवंशीय पशुधनाची बारा अंकी टोकनविना भटकंती सुरू आहे. या पशुधनाला पशु आधारकार्ड देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून मोहीम राबविण्यात येत आहे. (Jalgaon Animals Need 12 Digit Token Animal Husbandry Department Campaign)

आधार कार्डमुळे लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येक भारतीयाची ओळख सोपी झाली. रेशन घेताना मतदान करताना, पीकविमा काढताना, बसचा पास मिळविताना, रेल्वे प्रवास सवलतीसह अनेक ठिकाणी शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी त्याचा उपयोग होता. यातून फसवणुकीच्या प्रकारांना आळा बसला आहे.

केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या गाई, म्हशींसह अन्य पशुधनालाही पशु आधारकार्ड देण्याची सुविधा २०२०-२१ पासून सुरू केली आहे. पूर्वी इनाफ प्रणालीवर नोंद होती. त्यात सुधारणा होऊन आता एनडीएलएम या प्रणालीवर घेण्यात येत आहे.

बाजारपेठ विस्तार

दुग्धोत्पादन उपयुक्त पशुधनाच्या आरोग्यासोबत दुग्धजन्य पदार्थांशी संबंधित बाजारपेठ विस्तारण्यास याद्वारे मदत होणार आहे. जळगाव जिल्ह्याचा विचार करता जिल्ह्यात गोवर्ग पशुधन ८ लाख ९५ हजार ५०, तर म्हैसवर्गीय पशुधन २ लाख २१ हजार २३४, असे एकूण ११ लाख पशुधन आहे. या सर्व गोवंश व म्हैसवर्गीय, तसेच शेळी मेंढी वा अन्य पशुधनाचे या मोहिमेंतर्गत पशु आधार कार्ड काढले जाणार असून, त्याचा लाभ जिल्ह्यातील पशुपालकांना होणार आहे.

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याचा मानस

देशात दुग्धजन्य प्राण्यांचा सर्वांत मोठा डेटाबेस तयार केला जात असून, डेअरी क्षेत्राशी निगडित प्रत्येक पशुधनाला टॅग केले जाणार आहे. आधार कार्डसाठी बोटांचे ठसे, डोळे आदी बायोमेट्रिक माहिती घेतली जाते. त्याप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पशुधनाची बायोमेट्रिक माहिती संकलित होत असून, एकत्रित ठेवण्यासाठी डेटाबेस तयार केला जात आहे. पशुधनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. (latest marathi news)

‘पशु आधार कार्ड’ टॅगचे फायदे

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत गायी, म्हशी, वराह, शेळ्या, मेंढ्यांच्या कानात टॅग लावण्याची मोहीम सुरू आहे. ते लावण्यापूर्वी प्राण्यांचे कान स्पिरीटने स्वच्छ करूनच त्यानंतर हा प्लॅस्टिक ‘पशु आधार कार्ड टॅग ॲप्लिकेटरद्वारे कानाच्या मोठ्या नसांना सुरक्षित ठेवतो.

लसीकरणासह मिळणार अन्य माहिती

केंद्रीय पशुपालन विभागाकडून पाळीव प्राणी, त्यांचे मालक, जात, उत्पादकतेबाबत माहितीसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केला आहे. यात एक युनिक आयडी देण्यात येत आहे. पशुधनाच्या कानात ८ ग्रॅम वजनाचा पिवळा टॅग व पशुधनाचे टॅगिंगच त्यांचे आधार कार्ड टॅगवर १२ आकडी पशु आधार क्रमांक, सोबत कार्डमध्ये एक युनिक नंबर, मालकाचे विवरण, मोबाईल क्रमांक, पशुधनाचे केलेले लसीकरण आणि ब्रीडिंगची माहिती असेल.

देशातील प्रत्येक गाय अथवा म्हैस अन्य प्राण्यांसाठी एक युनिक आयडेंटिफिकेशन नंबर आहे. त्याद्वारे जनावरांचे मालक घरबसल्या आपल्या प्राण्यांबाबत माहिती मिळवू शकतात. लसीकरण, जात, सुधारणा कार्यक्रम, उपचारांसह पशुधनाची खरेदी-विक्रीही हस्तांतरण प्रक्रियेमुळे सोपी होणार आहे. - डॉ. श्यामकांत पाटील, उपायुक्त, पशुसंवर्धन विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ..तर जाऊ शकते मनसेची मान्यता; राज ठाकरेंचे भवितव्य जनतेच्या हाती

Delhi Weather: दिल्लीची हवा बनली विषारी...! श्वास घेणंही कठीण; AQI 460 पार, GRAP-4 लागू...

Mallikarjun Kharge : उत्तरप्रदेशात आगीत 10 मुलांचा मृत्यू झाला तरी योगींच्या महाराष्ट्रातील सभा थांबल्या नाहीत, खर्गेंचा हल्लाबोल

आज सायंकाळी 6 वाजता थंडावणार प्रचाराच्या तोफा! मतदानापूर्वीच्या 30 तासातील हालचालींवर भरारी पथकांचा वॉच; बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान

Amit Shah : राज्यात १६० पेक्षा जास्त जागांवर महायुतीचा विजय निश्चित..! : अमित शाह

SCROLL FOR NEXT