Anjani Dam  esakal
जळगाव

Jalgaon: अंजनी प्रकल्प वाढीव उंचीचे काम रखडले! पद्मालय प्रकल्प दोनच्या कामालाही ‘ब्रेक’, 40 हजार एकर क्षेत्र सिंचनापासून वंचित

Jalgaon News : या रखडलेल्या दोन्ही प्रकल्पाचे कामे त्वरित पूर्ण करण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे

आल्हाद जोशी

एरंडोल : पळासदड (ता. एरंडोल) येथील अंजनी प्रकल्पाचे वाढीव उंचीसह काम पूर्ण झाले आहे. मात्र वाढीव उंचीत बुडीत होणाऱ्या दोन गावांचे पुनर्वसन न झाल्यामुळे प्रकल्पात पूर्ण क्षमतेने जलसाठा करण्यात अडचण निर्माण होत आहे. तसेच पद्मालय प्रकल्प दोनचे सुमारे पन्नास ते साठ टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित कामे रखडल्यामुळे एरंडोल व धरणगाव तालुक्यातील सुमारे चाळीस हजार एकर क्षेत्र सिंचनापासून वंचित राहत आहे. या रखडलेल्या दोन्ही प्रकल्पाचे कामे त्वरित पूर्ण करण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे. (Jalgaon Anjani Project High Rise Work Stalled news)

अंजनी प्रकल्पाचे वाढीव उंचीचे रखडले काम आणि पद्मालय क्रमांक दोनचे अपूर्णावस्थेत असलेले काम याबाबत माजी आमदार महेंद्रसिंह पाटील यांनी माहितीच्या अधिकारात मिळवलेल्या माहितीत दोन्ही प्रकल्पांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. पळासदड येथील अंजनी प्रकल्पाचे काम वाढीव उंचीसह पूर्ण झाले आहे. प्रकल्पाच्या वाढीव उंचीसाठी लागणारा सुमारे ३२ कोटी

रुपयांचा निधी देखील खर्च करण्यात आला आहे. मात्र वाढीव उंचीत बुडीत होणाऱ्या हनमंतखेडे आणि सोनबर्डी या दोन गावांचे पुनर्वसन न झाल्यामुळे प्रकल्पात पूर्ण क्षमतेने जलसाठा करण्यात अडचण निर्माण होत आहे. अंजनी प्रकल्पाच्या वाढीव उंचीनुसार जलसाठा झाल्यास एरंडोल तालुक्यातील सहा गावातील तर धरणगाव तालुक्यातील १९ गावातील सुमारे अठरा हजार एकर क्षेत्र

ओलिताखाली येणार आहे. वाढीव उंचीत धरणगाव तालुक्यातील बांभोरी बुद्रुक, जवखेडे खुर्द, हिंगोणा बुद्रुक, सोनवद बुद्रुक, अहिरे बुद्रुक, कल्याणे खुर्द, भोद बुद्रुक, पिंप्री खुर्द, वाघळूद, पिंपळेसीम, वंजारी खपाट, सतखेडा, झुरखेडा, बोरगाव खुर्द आणि बुद्रुक, बांभोरी बुद्रुक, अंजनविहीरे, वाकटुकी, चमगाव, बाभूळगाव, जवखेडा बुद्रुक या गावांना लाभ होणार आहे तर एरंडोल तालुक्यातील पळासदड, एरंडोल, नांदगाव बुद्रुक, टोळी बुद्रुक आणि बांभोरी बुद्रुक या गावांना लाभ होणार आहे.

पद्मालय प्रकल्प दोन प्रकल्पामुळे एरंडोल तालुक्यातील वैजनाथ, रवंजे खुर्द, नागदुली, खेडगाव, खडके बुद्रुक, पिंपळकोठा खुर्द, चोरटक्की, खर्ची बुद्रुक, रिंगणगाव, दापोरी, खेडी खुर्द, पिंपळकोठा प्र.चांदसर, सावदे, कढोली, खर्ची खुर्द, वरखेडी या सोळा गावातील आठ हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येऊन शेतकऱ्यांच्या जीवनात हरितक्रांती होणार आहे तर धरणगाव तालुक्यातील टहाकळी बुद्रुक आणि खुर्द, पाळधी खुर्द आणि बुद्रुक, भोकणी, वंजारी, बांभोरी, आव्हाणे, एकलग्न, लाडली, पथराड खुर्द आणि बुद्रुक, शेरी, धार, दोनगाव, फुलपाट, चांदसर या सतरा गावातील सुमारे अठरा हजार एकर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. (Latest Marathi News)

पद्मालय क्रमांक दोनचा समावेश पंतप्रधान जलसिंचन योजनेत केला असता तर आतापर्यंत प्रकल्प पूर्ण झाला असता. मात्र शासनाच्या उदासीनतेमुळे दोन्ही प्रकल्पांचे कामे रखडले असून, शेतकरी सिंचनापासून वंचित राहत आहेत. अंजनी प्रकल्पावर सुमारे तीनशे कोटी रुपये खर्च करण्यात आलेले असून, वाढीव उंचीसाठी ३२ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. अंजनी प्रकल्पाच्या वाढीव उंचीत बुडीत होणाऱ्या क्षेत्रासाठी

सुमारे ४९ कोटी ५७ लाख रुपयांची भरपाई द्यावी लागेल. या कारणास्तव वाढीव उंचीचे काम शासनाने रद्द केले आहे. मात्र जिल्हा कृषी अधिकारी यांनी ५ ऑगस्ट २००८ रोजी तापी पाटबंधारे महामंडळास अंजनी प्रकल्पाच्या वाढीव उंचीत बुडीत होणाऱ्या फळझाडांची नुकसान भरपाई ८ कोटी २९ लाख १९ हजार रुपये असल्याचे पत्राद्वारे कळविले आहे. सानुग्रह अनुदान व व्याज अशी नुकसान भरपाईची रक्कम १३ कोटी ७६ लाख रुपये असल्याचे कळविले आहे.

धरणगाव तालुक्याला सर्वाधिक लाभ

यापूर्वी प्रकल्पाच्या वाढीव उंचीत बुडीत होणाऱ्या क्षेत्राची नुकसान भरपाई ४९ कोटी ५७ लाख रुपये दाखविण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्षात कृषी अधिकाऱ्यांनी कळवलेली भरपाई रक्कम १३ कोटी ७६ लाख असल्यामुळे वाढीव उंचीचे काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

अंजनी प्रकल्पाचे वाढीव उंचीत तसेच पद्मालय क्रमान दोन प्रकल्पाचा सर्वाधिक लाभ धरणगाव तालुक्याला सर्वाधिक होणार असल्यामुळे त्यांनी या दोन्ही प्रकल्पांच्या शासकीय स्तरावरील अडचणी दूर करून काम पूर्ण करण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT