Forest department staff while filling the artificial water bodies in the forest with the help of tankers. esakal
जळगाव

Jalgaon News : वन्य प्राण्यांसाठी कृत्रिम पाणवठे ठरताहेत संजीवनी; जंगलात नैसर्गिक स्त्रोत आटल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा

Jalgaon : तालुक्यातील जंगलांमधील नैसर्गिक पाणवठे आटले असून, प्राण्यांसाठी उभारण्यात आलेल्या कृत्रिम पाणवठ्यांद्वारे उन्हाळ्यात वन्यप्राण्यांची तहान भागवली जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : तालुक्यातील जंगलांमधील नैसर्गिक पाणवठे आटले असून, प्राण्यांसाठी उभारण्यात आलेल्या कृत्रिम पाणवठ्यांद्वारे उन्हाळ्यात वन्यप्राण्यांची तहान भागवली जात आहे. उन्हाळ्यात तापमानाचा पारा वाढत असून, जिल्ह्याच्या तापमानाने ४३ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला असून, ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या झळा सर्वांना बसत आहेत. एक हंडा पाण्यासाठी ग्रामीण भागातील महिलांना पायपीट करावी लागत आहे. (Jalgaon Artificial water bodies are lifesaver for wild animals marathi news)

वन्य प्राण्यांना देखील उन्हाळ्यात पाण्यासाठी भटकावे लागत असून, उन्हाळ्याच्या तीव्र झळा प्राण्यांना देखील बसत असून जंगलातील बहुतेक सर्वच नैसर्गिक पाणवठे आटले आहेत. उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता वन विभागातर्फे उभारण्यात आलेल्या कृत्रिम पाणवठयांद्वारे वन्य प्राण्यांची तहान भागवली जात आहे. (latest marathi news)

तालुक्यात जानवे शिवारातील जंगलात ९ तर रामेश्वर, हेडावे, खेडी, जुनोने या जंगलात तीन असे एकूण १२ कृत्रिम पाणवठे वन विभागातर्फे तयार करण्यात आले आहेत. जानवे शिवारातील जंगलाचा विस्तार हा जवळपास १२०० हेक्टर असून, जुनोने, हेडावे, रामेश्वर या भागात देखील वन विभागाचे जंगल आहे. खासगी टँकर मालकांद्वारे या जंगलातील पाणवठे नियमित भरण्याचे काम वन विभागातर्फे केले जात असल्याने वन्यप्राण्यांची तहान भागविली जात आहे.

प्राण्यांसाठी संजीवनी

तालुक्यातील जंगलामध्ये हरण, काळवीट, निलगायी, रान डुकरे, मोर, ससे, कोल्हे, माकड या प्राण्यांचा अधिवास पहायला मिळतो. तीव्र उन्हाळ्यात कृत्रिम पाणवठे जणू या प्राण्यांसाठी संजीवनी ठरत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: अजितदादांच्या राष्ट्रवादीचा फडणवीसांना CM पदासाठी पाठिंबा! शिंदेंसाठी दोन पर्याय कोणते? राजकारणातील मोठे संकेत

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Sakal Podcast : बंद होणार जुनं पॅनकार्ड! ते दिग्दर्शक नागराज मंजुळेंना समन्स

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Amit Thackeray: 'हे फक्त शब्द नाहीत तर इशारा आहे !' अमित ठाकरेंची पोस्ट 'या'मुळे चर्चेत

SCROLL FOR NEXT