Idol of Vitthala in Pandurang Temple. esakal
जळगाव

Ashadhi Ekadashi 2024 : 250 वर्षांची परंपरा असलेले श्री पांडुरंग मंदिर; पारोळ्यातील भाविकांचे श्रद्धास्थान

सकाळ वृत्तसेवा

Ashadhi Ekadashi 2024 : येथील श्री पिले यांचे श्री पांडुरंग मंदिर हे २५० वर्षांपासून विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून बुधवारी (ता.१७) आषाढी एकादशीनिमित्त दिवसभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यात परिसरातील भागविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मंदिराच्या वतीने करण्यात आले आहे. ()

येथील पिले घराण्याचे मूळ पुरुष पांडुरंग बुवा कुलकर्णी अमळनेरकर मूळ सखाराम महाराज यांचे समकालीन किंवा तत्पूर्वीचे संत होते. पांडुरंग बुवांनी आपल्या अंतकाळी आपल्याजवळील देवांच्या मूर्त्या दामोदर बुवा पिले यांच्या स्वाधीन करून आपला देह ठेवला. हे पांडुरंग बुवांचे मंदिर श्री पांडुरंग मंदिर म्हणून प्रचलित झाले. त्यानंतर १८२५मध्ये दामोदर बुवा पिले यांनी पांडुरंग मंदिराचे बांधकाम करून पांडुरंगाची सेवा अखंडितपणे सुरू ठेवली.

पुढे १८६३ पासून दामोदर बुवांचे चिरंजीव गोविंद बुवा पिले यांनी पांडुरंग मंदिराचा कारभार सांभाळला. त्यांनी मंदिराचा जीर्णोद्धार करून उत्सव सुरू केले. त्यानंतर गोविंद बुवांचे चिरंजीव अनंत बुवा पिले यांनी १८१८पासून मंदिराचा कार्यभार सांभाळला. पारोळा येथे माध्यमिक शिक्षण घेऊन पुढे १९१७ मध्ये आळंदी येथे वारकरी शिक्षण संस्थेत प्रथम विद्यार्थी म्हणून प्रवेश घेऊन वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर यांच्याबरोबर महाराष्ट्रभर कीर्तनासाठी दौरा केला.

त्यानंतर अनंतबुवांचे चिरंजीव रमेश पिले यांनी १९४४पासून मंदिराचे कार्यक्रम सुरू केले. त्यांनी संस्कार पाठशाळा संस्कृत पाठशाळा सुरू केली. मंदिरात दर शनिवारी व रविवारी दुपारी चारला संस्कार पाठशाळा दर एकादशीस वारकरी भजन कीर्तन संतांच्या पुण्यतिथी व जयंती उत्सव साजरे केले जातात. (latest marathi news)

उन्हाळ्याच्या सुट्टीत १५ एप्रिल ते १५ जूनपर्यंत रोज सायंकाळी पाच ते सहा वासंती का अभ्यास वर्ग घेतला जातो. दिवाळीच्या सुट्टीत शारदीय अभ्यासवर्ग विनामूल्य घेतला जातो. या वर्गात विविध स्तोत्रपठण देशभक्तीपर गीते योग शिबिर, पंचतंत्र, कथा, भजन, प्रवचन आदी शिकवले जाते. आता मंदिरात पिले घराण्याची सातवी पिढी संजय पिले, दीपक पिले, त्यांचे चिरंजीव हिमांशू, आदित्य मंदिर सांभाळीत आहेत.

यावर्षी संस्कार पाठशाळेला सेवा भारती संस्थेतर्फे सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. मंदिराचा सामाजिक वारसा जपून ठेवण्याचे काम पिले घराणे करीत आहे. या पांडुरंग मंदिर संस्कार पाठशाळेतून अनेक विद्यार्थी वारकरी व संस्कार शिक्षण घेऊन तयार झाली आहेत.

सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन

आषाढी एकादशीनिमित्त बुधवारी (ता.१७) या मंदिरात महापूजा, भजन, पूजन, आरती आदी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. या मंदिरात दिवस आयोजित करण्यात आलेल्या या विविध उपक्रमांत मोठ्या संख्येने परिसरातील भाविकांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा, अशी विनंती मंदिराचे संचालक संजय पिले व दीपक पिले यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT