bjp party esakal
जळगाव

Jalgaon Lok Sabha Constituency : ‘जळगाव’साठी भाजपत इच्छुकांच्या पुन्हा हालचाली

Jalgaon News : ठाकरे गटाने तुल्यबळ उमेदवार दिल्यामुळे भाजप जळगाव लोकसभा मतदार संघात उमेदवारीसाठी इच्छुकांच्या पुन्हा हालचाली सुरू झाल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : भारतीय जनता पक्षाचे खासदार उन्मेष पाटील, करण पवार यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला, त्यानंतर पक्षातर्फे करण पवार यांची शिवसेना ठाकरे गटातर्फे जळगाव लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली. ठाकरे गटाने तुल्यबळ उमेदवार दिल्यामुळे भाजप जळगाव लोकसभा मतदार संघात उमेदवारीसाठी इच्छुकांच्या पुन्हा हालचाली सुरू झाल्या आहेत. जळगाव लोकसभा मतदार संघ हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. (Jalgaon Lok Sabha Constituency)

पक्षातर्फे या मतदार संघातून विद्यमान खासदार उन्मेष पाटील, माजी खासदार ए.टी.पाटील, माजी आमदार स्मिता वाघ, जिल्हा दूध संघाचे संचालक व भाजपचे उपाध्यक्ष रोहित निकम इच्छुक होते. मात्र पक्षाने विद्यमान खासदार उन्मेष पाटील तसेच इतर इच्छुकांतून माजी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केली.

त्यामुळे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर खासदार उन्मेष पाटील यांच्यासह त्यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर ही नाराजी कमी होईल असे वाटत होते. परंतु ती अधिकच वाढत गेली अखेर खासदार उन्मेष पाटील, पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांच्यासह भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. ठाकरे गटातर्फे करण पवार यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली.

भाजपत खळबळ

खासदार उन्मेष पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला तसेच ठाकरे गटातर्फे उन्मेष पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्याने ते भाजपला कडवे आव्हान देणारे उमेदवार असतील. जळगाव जिल्ह्यात भारतीय जनता पक्षात पडलेली ही मोठी फुट आहे. अशा स्थितीत भारतीय जनता पक्षापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. (jalgaon political news)

इच्छुक पुन्हा हालचाली

भारतीय जनता पक्षातून खासदारांसह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते गेले आहेत. तसेच ठाकरे गटातर्फे करण पवारांसारखा प्रबळ उमेदवार देण्यात आल्यामुळे आता भाजपमध्ये पुन्हा एकदा हालचाली सुरू झाल्या आहेत. भारतीय जनता पक्ष जळगाव व रावेर मतदार संघातून कोणताही उमेदवार बदलला जाणार नाही असे स्पष्ट विधान नेते गिरीश महाजन यांनी केले आहे. परंतु आता पक्षात मोठ्या प्रमाणात उलथापालथ झाल्याने इच्छुक उमेदवारांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

ए.टी पाटील इच्छुक

माजी खासदार ए.टी. पाटील उमेदवारीबाबत अद्यापही खात्री बाळगून असल्याचे सांगण्यात येत आहे, दिल्लीत ते तळ ठोकून होते, दिल्लीतील नेत्यांचा त्यांना हिरवा कंदील होता असे त्यांचे म्हणणे होते. या बदलत्या परिस्थितीत आपण यशस्वी होवू शकतो असा त्यांचा दावा असून त्यांनी पुन्हा प्रयत्न सुरू केले असल्याचे सांगण्यात येत आहे. तर इतर इच्छुकांनीही मुंबईत नेत्यांच्या भेटीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

वाघांची विश्‍वासाने वाटचाल

भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी मात्र मोठ्या विश्‍वासाने पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यासोबत प्रचार सुरू केला असून समोर उमेदवार कोणीही असला तरी पक्ष कार्यकर्त्यांचा बळावर आपला विजय निश्‍चीत असल्याचा त्यांचा दावा आहे. ठाकरे गटाच्या उमेदवारी नंतर भाजप आपल्या उमेदवाराच्या पाठीमागे भक्कम उभा राहणार की उमेदवार बदलाच्या दिशेने जाणार याकडेच आता लक्ष आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: '...तर उद्धव येतोच कसा आडवा?', भोंग्यांवरून राज ठाकरेंनी सुनावलं, नेमकं काय म्हणाले?

Biotech IPO : 'ही' बायोटेक कंपनी आणणार 600 कोटीचा आयपीओ,अधिक जाणून घेऊयात...

Fact Check : इस्लामिक झेंडे फडकवत निघालेली बाईक रॅली अकोल्यातील काॅंग्रेस उमेदवाराच्या प्रचाराची नाही, व्हायरल दावा खोटा

'मुश्रीफ खूप प्रामाणिक नेता, त्यांना कोणतेही लेबल लावू नका'; शरद पवारांना उद्देशून काय म्हणाले प्रफुल्ल पटेल?

Aditya Thackeray : महाविकास आघाडी जिंकली नाही तर गुजरात जिंकेल; आदित्य ठाकरेंचा घणाघात

SCROLL FOR NEXT