Assembly Constituency  esakal
जळगाव

Jalgaon Assembly Constituency : विधानसभेच्या जागांवरून महाविकास आघाडीत रस्सीखेच

देविदास वाणी

Jalgaon Assembly Constituency : लोकसभा निवडणुकीतील यशानंतर महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. विधानसभा निवडणुकीला तीन-चार महिने अवधी असला, तरी महाविकास आघाडीने आतापासूनच विधानसभेच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर भर दिला आहे. राज्यात हा फॉर्म्युला ठरला असला, तरी जिल्ह्यात तो कसा असेल, याबाबत राजकीय स्तरावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत ३० जागांवर यश मिळविले. ()

हे सकारात्मक वातावरण विधानसभेतही कॅश करण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न आहे. तिन्ही प्रमुखपक्षांनी २८८ जागांवर स्वतंत्र चाचपणी चालविली असली, तरी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी एकत्रच लढणार आहे, हे स्पष्ट आहे. राज्यस्तरावर जागा वाटपाचा फॉर्म्युला काहीअंशी ठरला आहे. काँग्रेसने लोकसभेत एका जागेवरून तब्बल १३ जागांवर झेप घेतल्याने काँग्रेसला सर्वाधिक म्हणजे १०० ते १०५ जागा दिल्या जाऊ शकतात.

त्याखालोखाल ९० ते ९५ जागा शिवसेना (उबाठा) पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला ८० ते ८५ जागा मिळू शकतात. हा प्राथमिक फॉर्म्युला असल्याचे बोलले जात असून, पुढे होणाऱ्या बैठकांमध्ये त्याला अंतिम स्वरूप प्राप्त होईल. जळगाव जिल्हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. खासदार, आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समितीत काँग्रेसची सत्ता होती. नंतर मात्र काँग्रेसला योग्य नेतृत्व न मिळाल्याने भाजपचे वर्चस्व वाढले.

आता लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसला मिळालेल्या यशामुळे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा उत्साह वाढला आहे. सध्या रावेर मतदारसंघाचे काँग्रेसचे एकमेव आमदार आहेत. तरी जिल्ह्यात ११ जागांवर लढण्याचा मानस व्यक्त केला जात आहे. काँग्रेसकडून अकराही मतदारसंघात निरीक्षक पाठवून राजकीय परिस्थिती जाणून घेतली जात आहे. इच्छुक, पदाधिकारी, मतदारांमध्ये जाऊन वातावरणाचा अंदाज घेतला जात आहे. (latest marathi news)

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातर्फे विधानसभेची जोरात सुरू झाली आहे. अद्याप जागा वाटप ठरले नसले, तरी जळगाव ग्रामीणमध्ये मुक्ताईनगर, भडगाव-पारोळा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवारही निश्चित झाले आहेत. काँग्रेस ११ जागांवर दावा करीत असेल, तर काँग्रेसने महाविकास आघाडीचा धर्म पाळावा. सोबतच काँग्रेसची जिल्ह्यात ताकद किती आहे, याचा अंदाज घ्यावा नंतरच जागा मागाव्यात, असे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

शिवसेना (उबाठा) पक्षाला जळगाव लोकसभा निवडणुकीत यश मिळाले नसले, तरी पक्षाचे ‘मशाल’ चिन्ह घराघरांत पोचविण्यात यश आले आहे. दुसऱ्या क्रमांकाचे मताधिक्य मिळाल्याने जिल्ह्यात आपल्यालाही जागा मिळाल्या पाहिजेत, असा दावा या पक्षाचे इच्छुक, पदाधिकारी, कार्यकर्ते करीत आहेत. नुकतीच उद्धव ठाकरे यांनी मुंबईत लोकसभा निवडणुकीच्या पराभवाच्या कारणांसाठी चिंतन बैठक घेऊन पराभव विसरा, झालेल्या चुका टाळा अन् विधानसभेसाठी जोमाने कामाला लागा, असा सल्ला पदाधिकाऱ्यांना दिला आहे.

यामुळे ‘उबाठा’चे पदाधिकारीही विधानसभेच्या कामाला लागले आहेत. जळगाव शहर, चाळीसगाव मतदारसंघासह इतर काही मतदारसंघ आम्हाला मिळायला हवेत, अशी आग्रही भूमिका त्यांची आहे. मात्र, महाविकास आघाडीत जिल्ह्यात कोणत्या पक्षाला किती जागा दिल्या जातील, ते अजून ठरायचे बाकी आहे. जळगाव जिल्ह्यातील जागा वाटपाचा फार्म्युला महाविकास आघाडीने अद्याप न ठरविल्याने आघाडीच्या जिल्हा पदाधिकारी, कार्यकर्त्यांत जागा मिळण्याविषयी मोठी उत्सुकता आहे.

''लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने राज्यात १३ जागा मिळविल्या आहेत. यामुळे जिल्ह्यात पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात आम्ही लढू. सध्या निरीक्षकांद्वारे सर्वच मतदारसंघात जाऊन आढावा घेतला जात आहे. अधिकाधिक जागांवर ‘काँग्रेस’ला निवडून आणू.''-प्रदीप पवार, जिल्हाध्यक्ष, कॉंग्रेस,

''महाविकास आघाडीने जळगाव जिल्ह्यात जागा वाटपाचा फार्म्युला अजून ठरविलेला नाही. राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील सर्वच नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. त्यात निरीक्षकही येत आहेत. कॉंग्रेसने अकरा जागांवर लढण्याचे ठरविले असले, तरी त्यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळावा. जिल्ह्यातील काँग्रेसची परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा.''-ॲड. रवींद्र पाटील, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष

''शिवसेना (उबाठा) पक्षाच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची उद्धव ठाकरे यांनी बैठक घेऊन विधानसभेच्या कामाला लागण्याचे सांगितले आहे. किती जागा, उमेदवार अद्याप ठरायचे बाकी आहे. श्री. ठाकरे सांगतील. त्याप्रमाणे आम्ही आदेश पाळू.''-विष्णू भंगाळे, जिल्हाप्रमुख, शिवसेना (उबाठा) पक्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: मलिदा गँग, बारामती अन् इंदापूर... हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशावेळी शरद पवार नेमकं काय म्हणाले?

Rahul Gandhi : राहुल गांधी यांच्यात दैवी शक्ती! महाराष्ट्रातील काँग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा

Latest Maharashtra News Updates : आर्थिक संबंध मजबूत करण्यासाठी आम्ही मुक्त व्यापार करारावर चर्चा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी

Stock Market Crash: पंतप्रधान मोदींनी ज्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा दिला होता सल्ला तेच शेअर्स कोसळले

मारुती सुझुकी आणि टोयोटा एकसारख्याच गाड्या वेगळ्या नावाने का विकतात? या सणासुदीला नवीन कार घेण्याआधी ही बातमी नक्की वाचा..

SCROLL FOR NEXT