Jalgaon News : शहरात बकरी ईद सण उत्साहात साजरा करावा आणि पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन येथील पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक नीलेश वाघ यांनी केले. बकरी ईदनिमित्त आयोजित शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. सोमवारी (ता.१७) ‘बकरी ईद’ सण साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (ता.१४) सायंकाळी पोलिस ठाण्यात शांतता समितीची बैठक घेण्यात आली. (Celebrate Bakri eid festival with enthusiasm peace )
या वेळी शांतता समिती सदस्य, प्रतिष्ठित नागरिक, नगर पालिका अधिकारी, वीज वितरण कंपनीचे अधिकारी यांचा बैठकीत सहभाग होता. या वेळी सहाय्यक निरीक्षक वाघ यांनी ईदगाह मैदानावर बकरी ईदची नमाज अदा केली जाणार असल्याने इदगाह व इदगाह परिसरात साफसफाई व ईद सण काळात सुरळीत वीजपुरवठ्यासाठी पत्र दिले आहे.
तसेच दरवर्षाप्रमाणे बकरी ईद सण उत्साहात साजरा करावा, कोणाच्या भावना दुखणार नाही, याची काळजी घ्यावी. सण साजरा करताना पोलिसांना सहकार्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. व्यासपीठावरील प्रतिष्ठित नागरिक अब्दुल रऊफ जनाब यांनीही मनोगत व्यक्त केले. (latest marathi news)
या वेळी व्यासपीठावर सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश वाघ, रऊफ जनाब, महावितरणचे अभियंता प्रशांत सरोदे, तसेच अनंता नेहते, सय्यद जावेद अहमद, काँग्रेस काँग्रेस शहराध्यक्ष शेख रियाज, माजी उपनगराध्यक्ष केतन किरंगे, माजी उपनगराध्यक्ष कलीम खॉ मण्यार, माजी नगरसेवक शेख जफर, माजी नगरसेवक संजय रल, पंडित कोल्हे, मलिक आबीद, जावेद कुरेशी, माजी नगरसेवक अप्पा चौधरी, शेख जलील हाजी शेख सत्तार, मेंबर, इरफान मेंबर, वसीम जनाब, डॉ. दानिश शेख, शेख आसिफ मेकॅनिकल, हर्षल दानी, शेख मुदसर नजर, फिरोज खान, शेख इजाज, भास्कर सोनवणे, शाकीर शेख, रशीद बाबू तडवी यांच्यासह शांतता समिती सदस्य, प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. यशस्वितेसाठी गोपनीय पोलिस योगेश दुसाने, पोलिस कर्मचारी रवींद्र मोरे, दिनेश भोई आदींनी परिश्रम घेतले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.