Bad condition of Panchayat Samiti residences in Bhadgaon Road area. esakal
जळगाव

Jalgaon News : पंचायत समिती निवासस्थाने मोजताहेत अखेरच्या घटका; पाचोऱ्याच्या हरित पथाच्या सौंदर्याला दुरवस्थेचा डाग

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : येथील शहराचा देखणा व मुख्य रस्ता तसेच चौपाटी म्हणून नावारूपाला आलेल्या भडगाव रोड भागातील हरित पथाच्या सौंदर्याला पंचायत समितीच्या निवासस्थानांच्या दुरवस्थेचा डाग लागला असून, यामुळे परिसरातील व्यापारी, नागरिक व भाविक त्रस्त झाले आहेत. संबंधित यंत्रणा मात्र सुस्त असल्याने समाजमनातून संतप्त भावना व्यक्त होत आहेत. पालिकेने भडगाव रोड भागात रस्ते दुभाजक, त्यात रंगीबेरंगी फुलांची झाडे, रंगीबेरंगी विद्युत रोषणाई, प्रशस्त रस्ते अशा सुविधा देऊन या रस्त्याचे हरित पथ असे नामकरण केले आहे. ( bad condition of Panchayat Samiti residences )

असे असताना पंचायत समिती अधिकारी व कर्मचारी निवासस्थानांचा परिसर दुरवस्थेमुळे घाणेरडा व दुर्गंधीयुक्त झाल्याने हरितपथाच्या सौंदर्याला व शहराच्या वैभव आता डाग लागत असल्याचे चित्र आहे. या निवासस्थानांमध्ये प्रथम गटविकास अधिकारी, पंचायत समितीचे अभियंते, महिला व बालविकास अधिकारी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी राहत असत. परंतु हे निवासस्थाने सध्या शेवटच्या घटका मोजत आहेत.

या निवासस्थानांच्या परिसरात दुकानदार, रहिवासी, तसेच पालिका कर्मचारी घाण टाकतात. अनेक दुकानदारांनी या परिसरात अतिक्रमित दुकाने थाटली आहेत. मोकाट गुरे ढोरे यांचे येथे सातत्याने वास्तव्य असते. याच परिसरात नवसाचे साई मंदिर, महादेव मंदिर, हनुमान मंदिर असून. याच भागातून स्वामी समर्थ केंद्राकडे जाणारा रस्ता आहे. त्यामुळे भाविकांची या परिसरात सकाळ, सायंकाळ गर्दी असते. तसेच शहरातील प्रत्येक नागरिक दिवसातून एकदा तरी या रस्त्याने ये- जा करतो.

या जीर्ण निवासस्थानांमध्ये गुन्हेगारी सदृश्य कृत्य होण्याचे प्रकार व प्रमाण वाढले आहे. मागील बाजूने जाणाऱ्या रस्त्यावर महिलांची व तरुणींची छेड काढण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. या पडक्या निवासस्थानात एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गतकाळात घडली आहे. येथील एका लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यात याच क्वार्टर्सचा वापर झाल्याचे संबंधितांनी कबुली जबाब सांगितले आहे. दुरवस्था झालेल्या या निवासस्थानांचे दरवाजे व खिडक्या चोरून नेण्याचे प्रकारही वाढले आहेत. (latest marathi news)

प्रचंड दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिक वैतागले आहेत. पडक्या अवस्थेतील ही निवासस्थाने जमीनदोस्त करून हा संपूर्ण परिसर बंदिस्त व मोकळा करण्यात यावा. त्यामुळे निदान स्वच्छता तरी या भागात राहील. पंचायत समितीच्या अखतारीतील या निवासस्थानांच्या बाजूलाच तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, शिक्षण विभागाचे गटसाधन केंद्र, महिला व बालविकास विभागाचे कार्यालय तसेच महिला बचत गटासाठीचे व्यापारी संकुल आहे. त्यामुळे या कार्यालयांचे सौंदर्य व महत्त्व देखील कॉर्टर्सच्या दुरवस्थेमुळे डागाळले जात आहे.

परिसराला अतिक्रमणाचा वेढा

या परिसरातील अतिक्रमण काढण्यासंदर्भात मागील वर्षी गटविकास अधिकाऱ्यांनी मोहीम राबविली. अतिक्रमण धारकांना नोटीसा बजावल्या व आठ दिवसांत अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले होते. परंतु आजतागायत कोणतेही अतिक्रमण निघालेले नाही. संबंधित अतिक्रमण धारकांशी तत्कालीन गटविकास अधिकाऱ्यांनी अर्थपूर्ण व्यवहार करून अतिक्रमण ‘जैसे थे’ ठेवल्याचा आरोप या परिसरातील नागरिक व भाविकांकडून केला जात आहे.

''भडगाव रोड भागातील पंचायत समितीच्या निवासस्थानांची दुरवस्था, घाणीचे साम्राज्य व अतिक्रमण यामुळे सुंदर असलेला भडगाव रोड भाग अत्यंत घाण व दुर्गंधीयुक्त झाला आहे. पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी या गंभीर प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. पडक्या अवस्थेत असलेले सर्व निवासस्थाने जमीनदोस्त करून परिसराला कुंपण करून परिसर मोकळा करावा व नागरिकांच्या भावनांशी सुरू असलेला खेळ थांबवावा. अन्यथा सामाजिक संघटना सोबत घेऊन आंदोलन छेडण्यात येईल’''- अनिल येवले, सामाजिक कार्यकर्ते, पाचोरा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT