Balaji Utsav esakal
जळगाव

Jalgaon : बालाजी उत्सवाचे भाविकांना आकर्षण; धरणगावातील 1986 च्या बॅचमधील विद्यार्थ्यांनी बोलीत घेतले आजचे चंद्राचे वहन

Jalgaon : श्री बालाजी वहनोत्सवाला अनेक वर्षांची परंपरा आहे. या उत्सवाचं शहरासह परिसराबाहेरील भाविकांनाही मोठे आकर्षण असते.

डी. एस. पाटील

धरणगाव : येथील श्री बालाजी वहनोत्सवाला अनेक वर्षांची परंपरा आहे. या उत्सवाचं शहरासह परिसराबाहेरील भाविकांनाही मोठे आकर्षण असते. वहनोत्सवात बैलजोडी लावण्यासाठी जाहीरपणे लिलाव होतो. यात अनेकजण बोली लावतात. यातून आपल्या भावना व्यक्त करतात. येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात १९८६मध्ये शिकलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन उद्या रविवारी (ता.१३) निघणारे चंद्राचे वहन बोलीत घेतले. यानिमित्ताने नोकरी, व्यवसाय आदी कारणांनी बाहेर असलेल्यांनी एकत्र येऊन भगवान बालाजींवरील आपली श्रद्धा व्यक्त केली. (Balaji Utsav attracts devotees Students of 1986 batch of Dharangaon bid today moon movement )

धरणगावसह परिसरातील विद्यार्थ्यांसाठी ही एक प्रेरणा आहे. माणूस बाहेर कुठेही गेला तरी गावाशी, गावाच्या परंपरांशी त्याची नाळ जोडलेली असते. शिवाय १९८६पासून या सर्व मित्र परिवाराचा मैत्रीचा धागा अतूटपणे टिकून आहे, हेदेखील महत्त्वाचे आहे. शहराची सांस्कृतिक परंपरा पुढे नेण्यासाठी सर्वच लहानथोर विद्यार्थी बाहेरगावी असलेले सज्जन यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात. हे यानिमित्ताने दिसून येते. या मित्र परिवाराच्या वतीने तेजेंद्र चंदेल यांनी लिलावात बोली लावून चंद्राचे वहन घेतले.

श्री बालाजी मंदिरापासून रविवारी (ता.१३) वहन निघेल. त्यानंतर शहीद अनिल बयस चौक, बालाजी रोड, धरणी, बाजार पेठ, कोट दर्गा, कोट बाजार, किसन गबा महाजन यांचे दुकान, कासार गल्ली, प्रोफेसर कॉलनी, दीक्षित महाराज यांचे घर, गुजराथी गल्ली, ईच्छा माता चौक, परत दीक्षित महाराज यांचे घर, धोंडिराम कुमट यांचे घर, डॉ. सुहास वैद्य यांचे, घर ते जुने सिटी सर्व्हे ऑफिस, विठ्ठल मंदिर, परिहार चौक, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, सावित्रीबाई फुले उड्डाण पुल, जिजामाता चौक, मातोश्रीनगर, ग. स. सोसायटी. (latest marathi news)

श्री मंगल कार्यालय, गणेशनगर, डॉ. हेडगेवारनगर, महात्मा फुलेनगरवरून उड्डाण पुलाकडे, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, पी. आर. हायस्कूल, ईच्छाकृपा कलेक्शन, लक्ष्मी फोटो स्टुडिओ, भावे गल्ली, जैन गल्ली, महावीर चौक, जस्मिना स्टोअर्स, धरणी, वाणी गल्ली, बालाजी रोड ते श्री बालाजी मंदिर असा या वहनाचा मार्ग आहे. श्री बालाजी वहन उत्सवाचं कामकाज व्यवस्थापक मंडळाचे अध्यक्ष प्रा. डी. आर. पाटील व त्यांचे संचालक मंडळ, पोलिस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस चोखपणे जबाबदारी पार पाडत आहेत.

''आम्ही मित्रपरिवार साधारण वर्षातून एकदा तरी एकत्र येतो. यावेळी आमच्या चर्चेत आपण श्री बालाजी वहन उत्सवात आपल्या बॅचचे नावे वहन घ्यावे, असे ठरले. त्यानुसार एक वर्षापासून या वहनासाठी आवश्यक निधी आमच्याकडे जमा होता. यावर्षी संधी मिळाली व आम्ही चंद्राचे वहन घेतले. श्री बालाजी भगवानविषयी आमच्या मनात श्रद्धा आहे. गावातील सांस्कृतिक परंपरेचा आपणही एक हिस्सा व्हावे, ही आमची भावना आहे. वहन मिरवणुकीत सहभागी लेझीम पथकाला आकर्षक बक्षीसही आम्ही देणार आहोत.''- एस. के. पाटील, निवृत्त शिक्षक, पनवेल व धरणगावच्या १९८६ च्या बॅचचे विद्यार्थी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT