Green nature hill area esakal
जळगाव

Jalgaon: महाश्रमदानातून आता बांबू लागवड चळवळ! ब्राह्मणशेवगेत पर्यावरण प्रकल्पाचा 25 हेक्टरवर विस्तार; निसर्ग टेकडीचा कायापालट

Jalgaon News : ओसाड व मुरमाड टेकड्यांच्या २५ हेक्टर क्षेत्रावर २०२१ पासून जल व पर्यावरणप्रेमी सोमनाथ माळी यांच्या संकल्पनेतून व प्रयत्नातून या प्रकल्पाला निसर्गटेकडी हे नाव दिले आहे.

सकाळ वृत्तसेवा

अजय कोतकर : सकाळ वृत्तसेवा

चाळीसगाव : तालुक्यातील ब्राह्मणशेवगे येथे लोकसहभागातून खानदेशातील पहिला पर्यावरण प्रकल्प साकारत आहे. शहरापासून पंधरा किलोमीटर अंतरावर डोण, पिंप्री, हिरापूर, माळशेवगे या गावांच्या सीमेवर हे ठिकाण आहे. येथील २५ हेक्टर क्षेत्रात टप्प्या टप्प्याने विस्तारणाऱ्या या जल व पर्यावरणीय प्रकल्पात आता सेवा सहयोग ग्रामोदय, भूजल अभियान ‘वृक्षदिंडी’ उपक्रमाअंतर्गत एक हजार मानवेल बांबूंची लागवड महाश्रमदानातून होणार आहे. या चळवळीला शनिवारपासून (ता. ३) प्रारंभ होणार आहे. (bamboo planting movement from Mahashramdan

ओसाड व मुरमाड टेकड्यांच्या २५ हेक्टर क्षेत्रावर २०२१ पासून जल व पर्यावरणप्रेमी सोमनाथ माळी यांच्या संकल्पनेतून व प्रयत्नातून या प्रकल्पाला निसर्गटेकडी हे नाव दिले आहे. सेवा सहयोग फाउंडेशनचे गुणवंत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सामाजिक वनीकरण विभागाच्या सहकार्याने व सेवा सहयोग ग्रामोदय, भूजल अभियान, वृक्षदिंडी उपक्रमांतर्गत व लोकसहभागातून २५ हजार झाडांचे टप्प्याटप्प्याने वृक्षारोपण करण्यात आले आहे.

या परिसरात वेंडर लॅन्ड कंपनीच्या आर्थिक मदतीने पाणलोट उपचारही करण्यात आले आहेत. चराईबंदी केली असल्याने गवत, काटेरी झाडे झुडपे वाढीस येऊन जैवविविधता वाढली आहे. त्यामुळे वन्यप्राणी ज्यात काळवीट हरीण, ससे, लांडगे, कोल्हे, तसेच वन्यपक्षी मोर, घार, शिकारा, घुबड, टिटवी आदींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

सामाजिक वनीकरण विभाग व सेवा सहयोग ग्रामोदय, भूजल अभियान अंतर्गत गेल्या तीन वर्षांपासून उन्हाळ्यात या झाडांना टँकरने पाणी देऊन संवर्धन करण्यात येत आहे. या साठी सामाजिक वनीकरण विभागाचे आरएफओ कोमलपिंडकुरवार, संजय जाधव, सूर्यवंशी, सेवा सहयोग फाउंडेशनचे महेश चव्हाण, तुषार निरगुडे, अनिल पाटील, प्रवीण राठोड, विलास चव्हाण तसेच ग्रामपंचायतचे सहकार्य लाभत आहे. (latest marathi news)

लागवड मोहिमेस शनिवारी सुरवात

ब्राम्हणशेवगे (ता. चाळीसगाव) येथे लोकसहभागातून २५ हेक्टर क्षेत्रात बहरणाऱ्या जल व पर्यावरणीय प्रकल्पात सेवा सहयोग ग्रामोदय, भूजल अभियान ‘वृक्षदिंडी’ उपक्रमांतर्गत एक हजार मानवेल बांबूंची लागवड महाश्रमदानातून लोकसहभागातून होत आहे.

या महाश्रमदान चळवळीला शनिवारी (ता. ३) सकाळी नऊला सुरवात होत आहे. या अविस्मरणीय पर्यावरणीय उपक्रमाचा आपणही एक भाग बनू शकता. बांबू रोपाचे वृक्षारोपण करून निसर्ग टेकडी एक प्रकल्प नसून एक पर्यावरणाची चळवळ बनावी, यासाठी महाश्रमदानाचे आयोजन करण्यात आले आहे.

या चळवळीत जास्तीत जास्त नागरिकांनी, पर्यावरण प्रेमींनी उपस्थित राहून या अविस्मरणीय क्षणाचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन आयोजक सेवा सहयोग ग्रामोदय, भूजल अभियान, चाळीसगाव ग्रामपंचायत, ब्राह्मणशेवगे माध्यमिक विद्यालय, ब्राह्मणशेवगे, मिशन ग्रीन ब्राह्मणशेवगे वृक्षटिमने केले आहे. अधिक माहितीसाठी व महाश्रमदानात सहभागी होण्यासाठी विलास चव्हाण, प्रवीण राठोड, सोमनाथ माळी यांच्याशी साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT