raksha khadse esakal
जळगाव

Jalgaon Banana Cluster: जळगाव जिल्ह्यात वर्षभरात ‘बनाना क्लस्टर’ : केंद्रीय राज्यमंत्री खडसे; अंदाजपत्रकात मंजुरीची प्रतिक्षा

Jalgaon News : त्याला येत्या केंद्रीय अंदाजपत्रकात मंजुरी मिळेल. यामुळे केळी उत्पादकांच्या केळीला चांगला दर मिळू शकेल. जळगाव केळी एक्स्पोर्ट करता येईल, अशी माहिती केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी दिली.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादक शेतकरी अधिक आहेत. राज्यासह देशभरात केळी जळगाव जिल्ह्यातून जाते. यामुळे आगामी वर्षभरात ‘बनाना क्लस्टर’ची निमिर्ती करण्याचा प्रस्ताव आहे. त्याला येत्या केंद्रीय अंदाजपत्रकात मंजुरी मिळेल. यामुळे केळी उत्पादकांच्या केळीला चांगला दर मिळू शकेल. जळगाव केळी एक्स्पोर्ट करता येईल, अशी माहिती केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी दिली. (Banana Cluster in Jalgaon district raksha khadse statement)

खासदार स्मिता वाघ, आमदार राजूमामा भोळे, आमदार संजय सावकारे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हेही उपस्थित होते. मंत्री खडसे म्हणाल्या, की ‘ बनाना क्लस्टर मॉडेल’ मुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या केळीसाठी कोल्ड स्टोअरेज, रायपनिंग सेंटरची निमिर्ती करण्यात येईल. टिश्‍यू कल्चर रोपे स्वस्त दरात तयार करण्यात येतील.

शेतकऱ्यांना केळी निर्यातीसाठी काय करावे लागते याचे प्रशिक्षण देण्यात येईल. यामुळे शेतकऱ्यांच्या केळी चांगला भाव मिळेल. परदेशात केळी निर्यातमुळे देशाला परकीय चलन मिळेल. सध्या संत्री बाबत क्लस्टर’ योजना राबविली जात आहे.

जिल्ह्यातील क्रीडा संकुलासाठी दिलेल्या निधीचा चांगला उपयोग व्हावा. तालुकास्तरापासून जिल्हास्तरावर चांगले खेळाडू घडावेत यासाठी क्रीडा संकुले योग्य स्थितीत ठेवण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. जळगाव जिल्ह्यात जिल्हा पातळीवर, राज्य पातळी, व देश पातळीवरील चांगले खेळाडू तयार होण्यासाठी सुविधा देण्याची व्यवस्था मी क्रीडा मंत्री या नात्याने करेल. (latest marathi news)

शेतकऱ्यांनी काढलेल्या पिक विम्याचा लाभ सर्व शेतकऱ्यांना मिळावा यासाठी माझा प्रयत्न आहे. पीक विमा काढताना सॅटेलाईटद्वारे फाटो काढण्यापेक्षा प्रत्यक्ष जागेवर जाऊन झालेल्या नुकसानीचे फोटो काढावेत, त्याद्वारे पीकविमा मिळावा यासाठी प्रयत्नरत आहे.

सातपुड्याच्या पायथ्याशी मेगा रिचार्ज प्रकल्प उभारण्यात येणार आहे. हा मोठा प्रकल्प आहे. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरातचा काही भाग अशा तीनही राज्याशी संबंधित हा प्रकल्प आहे. लवकरच त्याबाबतची कार्यवाही सुरू होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tingre: शरद पवार ईडीला घाबरले नाहीत, तुमच्या नोटिशीला काय घाबरणार! सुप्रिया सुळेंचा टिंगरेंना टोला

DY Chandrachud: सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांचा कार्यकाळ अखेर संपला! ‘या’ महत्वाच्या खटल्यांवर दिले निर्णय

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर....

Vadgaon Sheri News : पोर्शे अपघात प्रकरणी टिंगरेंनी दिली शरद पवार यांना नोटीस - सुप्रिया सुळे

Sakal Natya Mahotsav 2024 : संकर्षण कऱ्हाडे यांच्या उत्तमोत्तम नाटकांची रसिकांना मेजवानी १५ ते १७ नोव्हेंबरला

SCROLL FOR NEXT