Garbage Depot in Bhadgaon Road area. esakal
जळगाव

Jalgaon News : भडगाव रोडच्या सौंदर्याला कचरा डेपोचा डाग! पाचोरा येथील नागरिकांसह भाविकांमधून संतप्त प्रतिक्रिया

Jalgaon News : भडगाव रोड भागाच्या सौंदर्याला पालिकेच्या वतीने तयार करण्यात येत असलेल्या कचरा डेपोचा डाग लागला असून, यामुळे नागरिक व भाविकांमधून संतप्त भावना व्यक्त होत आहेत.

प्रा. सी. एन. चौधरी

पाचोरा : येथील शहराच्या सौंदर्याचा प्रमुख भाग व शहराचा हार्ट मानल्या जाणाऱ्या भडगाव रोड भागाच्या सौंदर्याला पालिकेच्या वतीने तयार करण्यात येत असलेल्या कचरा डेपोचा डाग लागला असून, यामुळे नागरिक व भाविकांमधून संतप्त भावना व्यक्त होत आहेत. पालिकेने या संदर्भात योग्य ती कारवाई करावी व न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे. (Jalgaon beauty of Bhadgaon Road is stained by garbage depot)

पालिकेच्या वतीने विविध नाविन्यपूर्ण व आकर्षक अशा सोयी सुविधा करून, आकर्षक विद्युत रोषणाई करून, शंभर फुटी तिरंगा या भागात उभारून, रस्ता दुभाजकांमध्ये रंगीबेरंगी फुल झाडे लावून भडगाव रोड भागाचे सुशोभीकरण केले आहे. हरितपथ असे नामकरण या भागाचे केले आहे.

या परिसरात शाळा, महाविद्यालय, भाविकांचे श्रद्धास्थान असलेले कैलादेवी मंदिर, दत्त मंदिर, पोलिस मदत केंद्राचे दत्तधाम, पश्चिम मुखी विजयी हनुमान मंदिर, महादेव मंदिर, नवसाचे साई मंदिर, बाजार समिती, पोलिस वसाहत अशी प्रमुख ठिकाणे आहेत. सायंकाळी या भागाला चौपाटीचे स्वरूप येते.

या भागात शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांची विविध कारणा निमित्ताने सतत गर्दी होते. असे असताना पालिकेच्या वतीने पंचायत समिती कर्मचारी वसाहतीच्या परिसरात सुका कचरा टाकून तयार केलेला कचरा डेपो या भागाच्या सौंदर्याला डाग लावणारा ठरला आहे. पालिकेचे कर्मचारी या परिसराची झाडझूड करून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा टाकतात. (Latest Marathi News)

विशेष म्हणजे, कचरा डेपो जवळून श्री स्वामी समर्थ केंद्राकडे जाणारा एकमेव रस्ता आहे. पश्चिम मुखी विजयी हनुमान मंदिर ,महादेव मंदिर व नवसाचे साई मंदिर यांच्या परिसरातच पालिका कचरा डेपो तयार करू पाहत आहे. या भागात कचरा टाकू नये असे शहरातील प्रतिष्ठित नागरिक , व्यापारी, दुकानदार, मंदिरात येणारे पुरुष व महिला भाविक यांनी पालिकेला अनेकदा सांगितले. परंतु या गंभीर प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष द्यायला पालिका प्रशासनाला वेळ नाही.

या कचरा डेपोजवळच सायंकाळी ग्रामीण भागातील शेतकरी भाजीपाला विक्रीसाठी बसतात. कचऱ्यावरील डास, चिलटे, किडे यासह दुर्गंधीयुक्त धूळ भाजीपाल्यावर बसते. तसेच मंदिरात येणाऱ्या भाविकांना चिलटे व दुर्गंधीचा त्रास व मनस्ताप सोसावा लागतो. विशेष म्हणजे, या भागात पंचायत समितीचे गट साधन केंद्र, अल्पबचत भवन, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय आहे.

अनेक शासकीय कार्यक्रम या परिसरात होत असल्याने शासकीय अधिकारी, पालिकेचे अधिकारी व कर्मचारी येथे येतात. त्यांना कचरा डेपो दिसत नाही का? असा प्रश्न नागरिकांकडून संतप्त भावनेने उपस्थित केला जात आहे. येथे कचरा डेपो तयार करण्याचा असलेला प्रयत्न संपुष्टात आणावा. पालिका कर्मचाऱ्यांना येथे घाण टाकण्यास मज्जाव करून नागरिकांच्या जीविताशी सुरू असलेला खेळ थांबवून नागरिकांना न्याय द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

"भडगाव रोड भागातील पंचायत समिती क्वार्टर्स परिसरात नगरपालिकेचे कर्मचारी कचरा आणून टाकतात. त्यामुळे मोकाट जनावरांचे वास्तव्य वाढून डास, चिलटे, दुर्गंधी यांचा उपद्रव वाढला आहे. पालिकेने येथील कचरा उचलावा व पुन्हा कचरा टाकू नये." - सुदेश पाटील, रहिवासी

"भडगाव रोड भागात महादेव मंदिर, हनुमान मंदिर, नवसाचे साई मंदिरा मागे नगरपालिकेचे कर्मचारी कचरा आणून टाकतात. हवेने तो कचरा पसरतो. मोकाट जनावरे तो देखील कचरा पसरवतात. त्यामुळे या भागाचे सौंदर्य नष्ट झाले असून मंदिरात येणाऱ्या भाविकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. नगर पालिकेने या संदर्भात कठोर कारवाई करावी."- सुलक्षणा पाटील, भाविक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT