Collector Ayush Prasad, MP Smita Wagh, MLA Lata Sonwane, former mayor Seema Bhole etc. while flagging off Bharat Gaurav Tourism Railway. esakal
जळगाव

Bharat Gaurav Railway: ‘भारत गौरव’ रेल्वे अयोध्येकडे रवाना! जिल्ह्यातील आठशे यात्रेकरू; ढोलताशांचा गजर, पारंपरिक नृत्याने स्वागत

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंतर्गत जिल्ह्यातील आठशे यात्रेकरूंची विशेष वातानुकूलीत भारत गौरव पर्यटन रेल्वे सोमवारी (ता. ३०) अयोध्येकडे रवाना झाली. ढोलताशांचा गजर, पारंपरिक नृत्य करून यात्रेकरूंचे स्वागत झाले. खासदार स्मिता वाघ यांच्या हस्ते या सेवेचे उद्‌घाटन झाले. (Bharat Gaurav train leaves for Ayodhya)

आमदार लता सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, माजी महापौर सीमा भोळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अंकित, प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी वेवोतोलू केझो, सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील, माजी नगरसेवक उज्ज्वला बेंडाळे यांनी झेंडा दाखवून स्पेशल ट्रेन जळगाव स्थानकावरून अयोध्येकडे रवाना झाली.

जळगाव रेल्वेस्थानकाच्या फलाट क्रमांक चारवर सकाळी लवकर सजावटीसह वातानुकूलीत भारत गौरव पर्यटन रेल्वे सज्ज होती. मुख्यमंत्री तीर्थदर्शन यात्रेची स्वागत कमान लावली होती. राम, लक्ष्मण, सीता, हनुमान यांच्या वेशभूषेतील कलाकार व्यासपीठावर होते.

त्यांनी पारंपरिक नृत्य केले. ही रेल्वे जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसीमार्गे अयोध्येकडे जाणार आहे. रेल्वे १ ऑक्टोबरला रात्री साडेआठला अयोध्येत पोचणार असून, २ ऑक्टोबरला यात्रेकरू श्रीरामांचे दर्शन घेतील. त्यानंतर २ ला रात्री जळगावकडे रेल्वे निघेल. जळगावला ४ ऑक्टोबरला सकाळी पोहोचेल.

यात्रेकरूंना पाणी, चहा, बिस्किट, नास्ता, जेवणही त्यांच्याकडून असेल. अयोध्येत राहण्याची व्यवस्था आयआरसीटीसी करणार आहे. यात्रेकरूंना कोणत्याही गोष्टीची कमतरता पडू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तहसीलदार (सर्वसाधारण) सुरेश कोळी आणि त्यांच्यासोबत वैद्यकीय पथक, इतर सहाय्यक टीम असणार आहे. (latest marathi news)

केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे, ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, जिल्ह्यातील सर्व आमदारांनी सर्व यात्रेकरूंना चित्रफितीद्वारे शुभेच्छा दिल्या.

मुख्यमंत्र्यांनी नियोजित केलेल्या तीर्थदर्शन योजनेचा आम्ही लाभ घेतोय, याचा खूप आनंद आहे, असे उमाळे येथील नामदेव पाटील यांनी सांगितले. रमेश पाटील म्हणाले, की मी यात्रेला जातोय, याचा मला खूप आनंद होत आहे. महाराष्ट्रातील मंत्र्यांनी केलेल्या तळमळीनंतर आम्हाला तीर्थदर्शनाचा लाभ घ्यायला मिळतोय.

विमलबाई निकम म्हणाल्या, की या यात्रेला जात आहे, याचा आनंद होतोय. या वयात मला रामाचे दर्शन होतयं. आम्ही आयोध्या यात्रेला जातोय, शासनाने खूप सोयी केलेल्या आहेत, असे सावरखेड्याच्या सरलाबाई यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News: पुण्यातही बदलापूर! चालत्या स्कूलबसमध्ये सहा वर्ष चिमुरडींवर लैंगिक अत्याचार

Prakash Ambedkar : जनता विचारते आहे, पाच वर्ष झोपले होते का? मोदी-शहा यांच्या भूलथापांना जनता बळी पडणार नाही : प्रकाश आंबेडकर

Spam Call Block Feature : स्पॅम कॉल्सना कायमचं ब्लॉक करणं झालं सोपं; मोबाईलमध्ये लपलेलं 'हे' फीचर एकदा वापरुन बघाच

Pawan Kalyan Daughter: तिरुपती बालाजीचे दर्शन फक्त हिंदूंनाच घेता येते का? मंदिर प्रवेशापूर्वी उपमुख्यमंत्र्यांच्या मुलीकडून काय लिहून घेतले?

Share Market Opening: शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 800 अंकांनी खाली, निफ्टी 200 अंकांनी घसरला; सर्व क्षेत्रात लाल रंगाचे वर्चस्व

SCROLL FOR NEXT