Railway esakal
जळगाव

Jalgaon News : भुसावळ रेल्वेला जूनमध्ये 129 कोटींचा महसूल; डीआरएम इति पांडे यांच्या नेतृत्वाखाली उत्कृष्ट कामगिरी

Jalgaon : भुसावळ विभागाने जूनमध्ये महसुलाच्या विविध क्षेत्रात लक्षणीय वाढ करून चांगली कामगिरी केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : भुसावळ विभागाने जूनमध्ये महसुलाच्या विविध क्षेत्रात लक्षणीय वाढ करून चांगली कामगिरी केली आहे. विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) इति पांडे यांच्या नेतृत्वाखाली आणि वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक अजय कुमार यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे विभागाला उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रशंसा मिळाली आहे. भुसावळ विभागाने जूनमध्ये १२९ कोटी रुपयांचा महसूल मिळविला आहे. प्रवासी महसुलाबाबत भुसावळ विभागाला जूनमध्ये ७१ कोटी ७० लाखांचा महसूल मिळाला. (Bhusawal Railway revenue of 129 crore in June )

यात तिकीट तपासणीकांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले असून, एकूण ६५ हजार केसेसद्वारे ५ कोटी ८३ लाख रुपयांच्या महसूल मिळाला आहे. विविध कोचिंगमधून मिळणाऱ्या महसुलातही लक्षणीय वाढ झाली असून, ती ४ कोटी ७७ लाखांवर पोहोचली आहे. विविध सेवा देण्याच्या विभागाच्या वचनबद्धतेमुळे मालवाहतुकीद्वारे ४६ कोटी ५७ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. (latest marathi news)

मालगाड्यांनी कार, पेट्रोलियम उत्पादने, कांदे, अन्नधान्य आणि सिमेंट वॅगनसह विविध मालाची कुशलतेने वाहतूक केली. पार्सल सेवेने एकूण ४ कोटी रुपयांचा महसूल मिळविला. यातून ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्याची भुसावळ मंडलाची बहुमुखी प्रतिभा दर्शविते. याव्यतिरिक्त इतर विविध व्यावसायिक क्रियाकलापांमधून विविध २ कोटींचा महसूल मिळाला आहे. यामुळे विभागाच्या आर्थिक यशात आणखी भर पडली.

''गैरसोय टाळण्यासाठी आणि सन्मानाने प्रवास करण्यासाठी प्रवाशांनी योग्य आणि वैध रेल्वे तिकीट घेऊनच प्रवास करावा. प्रवाशांनी जास्तीत जास्त प्रमाणात यूटीएस ॲपचा वापर करावा.''-इति पांडे, डीआरएम, भुसावळ रेल्वे विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT