Crowd of citizens outside the supply section of Tehsil office. esakal
जळगाव

Jalgaon News : भुसावळ ‘तहसील’मध्ये उसळली गर्दी! शिधापत्रिकांची ऑनलाइन कामे बंदचा फटका; नागरिकांचे कार्यालयात हेलपाट

Latest Jalgaon News : सुविधा केंद्रांमध्ये ऑनलाइन प्रक्रिया बंद आहे तर दुसरीकडे निवडणुकीच्या तोंडावर कार्यालयातील यंत्रणा आणखी व्यस्त होणार असल्याने कामे आणि कागदाचा गठ्ठा हातात घेऊन आपला नंबर केव्हा लागेल, या प्रतीक्षेत नागरिकांनी मंगळवारी (ता. १५) प्रचंड गर्दी केली.

सकाळ वृत्तसेवा

भुसावळ : येथील तहसील कार्यालयातील पुरवठा विभागामध्ये शिधापत्रिकेवर नाव कमी करणे व नवीन नावे समाविष्ट करणे तसेच तीच नावे ऑनलाइन करण्याच्या प्रक्रियेसाठी दररोज प्रचंड गर्दी होताना दिसत आहे. सुविधा केंद्रांमध्ये ऑनलाइन प्रक्रिया बंद आहे तर दुसरीकडे निवडणुकीच्या तोंडावर कार्यालयातील यंत्रणा आणखी व्यस्त होणार असल्याने कामे आणि कागदाचा गठ्ठा हातात घेऊन आपला नंबर केव्हा लागेल, या प्रतीक्षेत नागरिकांनी मंगळवारी (ता. १५) प्रचंड गर्दी केली. (Bhusawal tehsil office crowded)

शिधापत्रिकेत नाव कमी आणि नवीन नाव समाविष्ट करण्यासाठी भुसावळ तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाकडे शेकडो नागरिकांचा धावा सुरू आहे. त्यात शासनाने सुरू केलेल्या विविध योजनांचा लाभ मिळावा म्हणून ज्यांच्याकडे शिधापत्रिकेत नाव असूनही ऑनलाइन नाही, असे अर्जदार तहसीलच्या पुरवठा कार्यालयात येऊन वेळेत आपले काम करून घेण्यास पाहात आहेत.

मात्र कार्यलयात येऊन फक्त अर्ज देण्यासाठी पूर्ण दिवस जात आहे. या बाबीमुळे नागरिक संतप्त झाले आहेत. शिधापत्रिका ऑनलाइन करण्यासाठी नागरिकांना मोलमजुरी बुडवून हेलपाटे मारावे लागत आहेत. यासाठी अनेक दिवसांपासून ऑनलाइन कामे सुरू असताना ही कामे व्यवस्थितरित्या होत नसल्याने नागरिक या कार्यालयाच्या पायऱ्या झिजवत आहे.

शासनाने सर्वसामान्यांना आरोग्याच्या सुविधा देताना महात्मा जोतिबा फुले आरोग्य प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे याचा लाभ घेण्यासाठी नागरिक प्रयत्न करीत आहेत. मात्र, शिधापत्रिका ऑनलाइन असल्यानंतरच लाभ मिळेल, त्यामुळे रेशन कार्डात कुटुंबातील सदस्यांची नावे ऑनलाइन असतील तरच प्रमाणपत्र मिळेल. (latest marathi news)

त्यासाठी ऑफलाइन प्रमाणपत्र दिले तरच लाभार्थीचे दवाखान्यातील काम मार्गी लागणार आहे. मात्र पुरवठा विभागाच्या म्हणण्यानुसार ऑनलाइन शिधापत्रिकेमध्ये नावे असल्यावरच प्रमाणपत्र मिळेल नाही तर मिळणार नाही. यामुळे शिधापत्रिका ऑनलाइन करण्यासाठी शेकडो नागरिक दररोज भुसावळ तहसीलच्या पुरवठा विभागात गर्दी करीत आहेत. तर ही प्रक्रिया

केल्यानंतर ४५ दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे नागरिक या कामासाठी हैराण झाले आहेत. शासनाने नागरिकांची होत असलेली गैरसोय थांबवून तालुक्यातील गावागावात शिबिरे घेऊन ऑनलाइनची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

"शिधापत्रिकेतील नावे ऑनलाइन करणे बंधनकारक आहेत. तहसील विभागाला गावांमध्ये शिबिरे घेणे अवघड आहे. आता विधानसभेची आचारसंहिता लागल्याने सर्व कर्मचारी निवडणूक प्रक्रियेत राहतील. त्यामुळे तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागातील शिधापत्रिकेची ऑनलाइन कामे सुद्धा थांबविली जातील."- नीता लभडे, तहसीलदार, भुसावळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidhansabha Election 2024: "पुतण्याला पुढे करून काकांनी मिळवली उमेदवारी," सोशल मीडियावर नेमकी कुठल्या चुलत्याची चर्चा?

मोठी बातमी! बारावीच्या विद्यार्थ्यांची 11 फेब्रुवारी तर दहावीची 21 फेब्रुवारीपासून बोर्डाची परीक्षा; प्रात्यक्षिक, लेखी परीक्षा कधी? वाचा...

Pune: मोठी बातमी, पुण्यात पकडली लाखोंची रोकड! मालक नक्की कोण?

Maharashtra Assembly Elections 2024: काँग्रेसमध्ये थोरातांच्या नावाची चर्चा

Maharashtra Assembly Elections 2024: ‘इलेक्शन ड्यूटी’ नाकारल्यास जावू शकते नोकरी

SCROLL FOR NEXT