Jalgaon Smita Wagh : जळगाव लोकसभा मतदार संघाच्या भाजप उमेदवार स्मिता वाघ यांनी आमदार मंगेश चव्हाण, माजी सभापती कपिल पवार यांच्यासह भाजपचे जनजातीय क्षेत्राचे प्रमुख ॲड. किशोर काळकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. या वेळी भाजपसह मित्र पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी स्मिता वाघ यांचे जल्लोषात स्वागत केले. (Jalgaon BJP candidate Smita Wagh visit to Erandol)
जळगाव लोकसभा मतदार संघातून भाजपच्या उमेदवार म्हणून माजी आमदार स्मिता वाघ यांचे नाव जाहीर होताच भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शांतारामदादा चौकात आतषबाजी करून जल्लोष केला. पक्षाने त्यांच्या कार्याची दाखल घेऊन त्यांना न्याय दिल्याची प्रतिक्रिया यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या.
स्मिता वाघ यांनी चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण, माजी सभापती कपिला पाटील, भैरवी पाटील पलांडे यांच्यासह भाजपचे जनजातीय क्षेत्राचे प्रमुख ॲड. किशोर काळकर यांच्या निवासस्थानी भेट देऊन पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. या वेळी आमदार चव्हाण यांनी सर्व पदाधिकाऱ्यांनी स्वत: उमेदवार आहे असे समजून निवडणुकीच्या प्रचारात सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
स्मिता वाघ यांनी सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन यांच्या भावाचे निधन झाल्यामुळे श्रीमती वाघ, आमदार चव्हाण यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांचे सांत्वन केले.(latest marathi news)
या वेळी माजी नगराध्यक्ष रवींद्र महाजन, पांडवनगरी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष कुणाल महाजन, भाजप ओबीसी सेलचे माजी जिल्हाध्यक्ष अशोक चौधरी, माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष प्रा. मनोज पाटील, उद्योजक समाधान पाटील, गोटू ठाकूर, तालुका सरचिटणीस अमोल जाधव.
माजी नगरसेवक डॉ. नरेंद्र ठाकूर, डॉ. नरेंद्र पाटील, पांडववाडा संघर्ष समितीचे प्रमुख प्रसाद दंडवते, सुनील चौधरी, आबा चौधरी, भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष योगेश महाजन, संजय साळी, तुषार वाघ, मोंटी महाजन, बापू मराठे, अमोल तांबोळी, निखिलेश सूर्यवंशी, माजी तालुकाध्यक्ष संजय महाजन यांच्यासह मित्र पक्षांचे पदाधिकारी, पांडवनगरी बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.