rural hospital raver  esakal
जळगाव

Jalgaon News : अंध महिलेची रेल्वे फलाटावरच प्रसूती... बाळंतीण तासभर विव्हळली; दया कुणा ना आली!

दिलीप वैद्य

Jalgaon News : वेळ रात्री दहाची..नुकतीच बाळंत झालेली महिला सातव्या महिन्यात बाळ जन्माला आल्याने ग्रामीण रुग्णालयात उपचाराच्या प्रतीक्षेत. तिला जळगावला नेण्यासाठी रुग्णवाहिकाही तयार; मात्र ती अंध असल्याने व तिचा अंध पतीही बाहेरगावी गेल्याने उपलब्ध नव्हता. तिच्यासोबत जाण्यासाठी रेल्वेचा आरपीएफ जवान किंवा संबंधित यंत्रणा, येथील ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी किंवा तिच्या घराजवळील परिसरात राहणारे कोणीही तयार नसल्याने तासभर ती असहाय्यपणे तशीच पडून होती. (Blind woman gives birth on railway track in raver )

अखेर रेल्वे फलाटावर तिचे बाळंतपण करणाऱ्या २ महिला पुन्हा पुढे सरसावल्या आणि तिला नवजात अर्भकासह उपचारासाठी जळगावला रवाना करण्यात आले. एरवी माणुसकीच्या गप्पा मारणाऱ्या विविध खात्याच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना खाली पाहायला लावणारी घटना येथे काल (मंगळवारी) रात्री घडली. रावेर रेल्वेस्थानक परिसरात रेणुका करण राठोड (वय २९, रा. पुसद, जि. यवतमाळ) ही अंध महिला तिच्या अंध पतीसह राहते.

रेल्वेत आणि रेल्वे फलाटावर भीक मागून जगण्याचा त्यांचा व्यवसाय! मंगळवारी (ता. १) रात्री नऊच्या सुमारास सात महिन्यांची गरोदर असलेल्या रेणुकाचे पोट अचानक दुखू लागले. तिचा पती भीक मागण्यासाठी मध्य प्रदेशमधील दर्यापूर (ता. बऱ्हाणपूर) येथे गेलेला असल्याने तिच्याजवळ कोणीच नव्हते. मात्र तेथील काही महिलांच्या लक्षात हा विषय आल्यावर रेल्वेस्थानक परिसरात राहणाऱ्या येथील माऊली हॉस्पिटलच्या नर्स सोनम पवार आणि आशा वर्कर रत्ना कदम यांनी आडोसा करून रेल्वे फलाटावरच तिची प्रसूती केली.

सातव्या महिन्यातच प्रसूती झाल्याने या महिलेला रावेरच्या ग्रामीण रुग्णालयात रेल्वेस्थानकावरील रेल्वे पोलिसांनी भरती केले. खासगी रुग्णवाहिका चालक वासुदेव महाजन यांनी तिला दवाखान्यात नेले. बाळाचे वजन अवघे १२०० ग्रॅम असल्याने व त्याला ऑक्सिजनसह अन्य उपचाराची गरज असल्याने जळगाव येथे पाठविण्याचा निर्णय तेथील डॉक्टरांनी घेतला. (latest marathi news)

मात्र आई अंध असल्याने आता या लहान बाळाला घेऊन तिच्यासोबत कोण जाईल, असा प्रश्न निर्माण झाला. रेल्वे पोलिसांनी याबाबत असमर्थता दर्शविली तर ग्रामीण रुग्णालयाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही कानावर हात ठेवले. रेल्वे स्थानक परिसरात राहणाऱ्या व सोबत तिथे आलेल्या संतप्त नागरिकांनी याबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताच ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांनी बंदोबस्तासाठी पोलिसांना पाचारण केले.

‘सकाळ’ला फोन अन् कोंडी फुटली

ग्रामीण रुग्णालय परिसरात काहीसा तणाव निर्माण झाला. अखेर उपस्थितातील एकाने ‘सकाळ’च्या बातमीदारांशी संपर्क साधला असता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता पत्रकार येतील याची जाणीव झाली आणि त्यांनी विनवणी करून फलाटावरच प्रसूती करणाऱ्या नर्स आणि आशा वर्कर यांनाच या महिलेसोबत जळगावला जाण्यासाठी विनंती केली. अखेर त्या विनंतीला मान देऊन आणि मानवता दर्शवत या दोन्ही महिला या अंध महिलेबरोबर जळगावला रवाना झाल्या खऱ्या पण तिच्यासोबत जळगावला कोण जाईल, या अनुत्तरीत प्रश्नासाठी तिथे तासभर वाया गेला.

...अन् माणुसकीच मेली

आधीच या अंध महिलेची फलाटावर प्रसूती झाली. त्यानंतर पुढील उपचारासाठी तासभर विव्हळत पडून राहावे लागले. या सर्व प्रकारामुळे त्या महिलेची किंवा बाळाची तब्येत बिघडून एखादा जीव गेला असता तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न यातून निर्माण झाला आहे. एरवी मानवतेच्या गप्पा मारणाऱ्या रेल्वे पोलिस आणि ग्रामीण रुग्णालय यांच्याबद्दल रेल्वे स्थानकावरील रहिवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नेहमीची चौकट सोडून माणुसकीच्या नात्याने एखाद्या परिचरिकेला सोबत पाठविले असते तर काय बिघडले असते? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT