MLA Chandrakant Patil at protest site esakal
जळगाव

Jalgaon News : रेल्वेक्रॉसींगवर ग्रामस्थांचा अडीच तास रास्ता रोको; आमदार चंद्रकांत पाटील आंदोलन स्थळी

Jalgaon : तालुक्यातील रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपुलावर नाडगाव, नांदगाव येथील ग्रामस्थांनी भीम आर्मी संघटनेच्या नेत्तृत्वाखाली अडीच तास रास्ता रोको आंदोलन केले.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : तालुक्यातील रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपुलावर नाडगाव, नांदगाव येथील ग्रामस्थांनी भीम आर्मी संघटनेच्या नेत्तृत्वाखाली अडीच तास रास्ता रोको आंदोलन केले.

राष्ट्रीय महामार्ग ७५३ वर आंदोलनामुळे वाहतूक ठप्प होऊन लांबच लांब रांगा लागल्या. रेल्वे क्रॉसिंगवर पादचारी पूल मंजूर करावा, प्रतिभानगर, दादानगर येथील नागरिकांना ये-जा करण्यासाठी बोगद्याची व्यवस्था करावी. मुक्ताईनगर व बोदवडहून सुटणाऱ्या बस उड्डाणपुलावरून न जाता नाडगांव, नांदगाव येथून जाव्यात आदी मागण्यांसाठी रास्ता रोको करण्यात आला. (Jalgaon Block way of villagers for two hours at railway crossing MLA Chandrakant Patil at protest site)

..तर रेल रोको

खासदार रक्षा खडसे बोदवडच्या दिशेने येत असताना आंदोलनाची माहिती मिळाल्यावर त्या माळेगाव फाट्यापासून माघारी परतल्या. आमदार चंद्रकांत पाटील यांनी आंदोलन स्थळी भेट देत आंदोलकांच्या मागण्या ऐकल्या. आमदार पाटील यांनी, तहसीलदार अनिल वाणी यांना बोलावून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी फोनवरून चर्चा केली.

तसेच रेल्वेच्या सहाय्यक प्रबंधक इति पांडे यांच्याशी फोनवरून चर्चा करत आंदोलकांच्या उपस्थितीत बैठक घेण्याची मागणी केली. त्यानंतर आंदोलकांशी संवाद साधून भक्कम लढा उभारण्यासाठी रेल रोको आंदोलन लावा. मी पाठीशी राहील असे आश्वासन दिले.

समस्यांचा पाऊस

आंदोलकांनी यावेळी आमदारांवर समस्यांचा पाऊस पाडला. मुक्ताईनगरहून येणाऱ्या बस नाडगांव मार्गे न जाता उड्डाणपुलावरून थेट बोदवडला जातात. त्यामुळे स्थानिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. विद्यार्थ्यांची गैरसोय होते. रेल्वे बोगद्यात विजेची सुविधा नाही.

बोगद्यात कायम पाणी साचण्याची समस्या असल्याने प्रतिभानगर, दादानगर, कोल्हाडी, आमदगांव, हिंगणा , शिरसाळा , चिंचखेड सिम येथून येणारे विद्यार्थी बोगद्यातून न जाता जीव धोक्यात घालून रेल्वे रुळ ओलांडून प्रवास करतात. उड्डाणपुलावरून जाण्याने २ किलोमीटरचा फेरा पडतो. त्यामुळे पादचारी पूल बांधण्याची मागणी आंदोलकांनी केली.

नांदगाव सरपंच प्रवीण पाटील , नाडगांव सरपंच पती नरेंद्र कुरपाडे , आमदगांव सरपंच संभाजी पारधी , भीम आर्मी तालुका प्रमुख सुरेश इंगळे , सामाजिक कार्यकर्ते अमोल तायडे , माजी उपसरपंच विकास पालवे , ग्रामपंचायत सदस्य दिलीप पौळ , सुधाकर राजपूत , नरेश इंगळे , विकी घुसळे, रोहन इंगळे , लखन सुरवाडे.

सूरज तायडे , शुभम वाघ ,रोहन रायपुरे , निखिल खरात , पवन इंगळे आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ होते. यावेळी खासदार रक्षा खडसे यांच्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. असा आरोप भीम आर्मी भारत एकता मिशनचे तालुकाप्रमुख सुरेश इंगळे यांनी केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : राहुल गांधी आणि नाना पटोले प्रचाराचा नारळ फोडणार

SCROLL FOR NEXT