shopping educational material esakal
जळगाव

Jalgaon News: वह्या पुस्तकांसह शैक्षणिक साहित्यही महागले! पालकांची आर्थिक कोंडी; कच्चामाल अन् वाहतूक खर्चवाढीचा परिणाम

किशोर पाटील

वावडे (ता. अमळनेर) : यावर्षीच्या शैक्षणिक सत्रात नववी, दहावीसह इंग्रजी माध्यमाच्या खालच्याही वर्गातील पुस्तके, वह्या, पिशव्या, कंपास पेटी, जेवणाचा डबा, पाण्याची बाटली यांच्या दरात वाढ झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून कच्च्या मालाच्या दरात झालेली वाढ व इंधनाच्या वाढलेल्या दरामुळे विक्रेत्यांबरोबरच पालकांचीही आर्थिक कोंडी झालेली आहे. (Jalgaon Books educational materials become expensive)

गेल्या वर्षीदेखील शैक्षणिक साहित्याच्या किमतींमध्ये २० ते ३० टक्क्यांनी वाढ झालेली होती. यंदाही बाजारात शैक्षणिक साहित्याच्या किमतीत १५ ते २० टक्क्यांची वाढ झाली आहे. नववी व दहावीसाठी लागणाऱ्या दोन्ही पुस्तकांचा विषयनिहाय संच उपलब्ध आहे. नववीचा संच हा गतवर्षी ६५० रुपयांना मिळायचा. त्यात आठ पुस्तके असतात.

तो आता ७२९ रुपयांपर्यंत पोहोचला आहे. दहावीच्या पुस्तकांचा संच हा ७५० रुपयांवरून ८४४ रुपये इतका झाला. त्यात नऊ पुस्तके असतात. शंभर पानांची वही २५ रुपये, २०० पानांच्या वहीची किमत ३५ रुपये आहे. यंदा पाच ते सात रुपये प्रतिवहीमागे वाढले आहेत.

शंभर पानांची (लॉग बुक) ४० रुपये, तर दोनशे पानांची ८० रुपयांना मिळत आहे. प्रत्येक लाँग बुकमागे दहा ते १५ रुपये यंदा वाढलेले आहेत. गतवर्षीपेक्षा यंदा दरात वाढ झाली आहे. नर्सरी, प्ले ग्रुपमध्ये जाणाऱ्या चिमकुल्यांचा शैक्षणिक खर्चदेखील यंदा वाढलेला दिसून येत आहे. विशेषतः लहान मुलांच्या स्कूल बॅग, चॉटर बॅग महागल्या आहेत. इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे गणवेशही महाग झाले आहेत. (latest marathi news)

"कंपास पेटी ७० ते १५० रुपये, जेवणाचा डबा (प्लास्टिक) २० ते ३०० रुपयांपर्यंत, पाण्याची बाटली ५० पासून ते २५० रुपयांपर्यंत, दफ्तर दोनशे ते सातशे रुपयांपर्यंत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा शैक्षणिक साहित्याच्या भावात थोडीशी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे लहान मुलांच्या शैक्षणिक साहित्याच्या किमतीत दरवर्षी काही ना काही वाढ होत असते."

- दुर्वास पाटील, शालेय साहित्य विक्रेते, वावडे.

"इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या मुला मुलींच्या शैक्षणिक साहित्यांचे दर वाढल्याने बजेटवर परिणाम होत आहे. सरकारचे महागाईवर नियंत्रण नसल्याचे दिसून येते. म्हणून दिवसेंदिवस शिक्षणाचा खर्च करणे पालकांना आर्थिक अडचणीचे व असह्य होत आहे."

- दिनेश माळी, पालक, वावडे.

"जिल्हा परिषदेच्या शाळेत मोफत व दर्जेदार शिक्षण मिळते. शहर असो की, ग्रामीण भागातील पालकांनी आपल्या पाल्यांना जवळच्या जिल्हा परिषदेच्या शाळेतच दाखला घ्यावा, शासन जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून मोफत व दर्जेदार शिक्षण देत आहे."

- छगन पाटील, केंद्रप्रमुख, वावडे केंद्र.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast : तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! ते राज्यात तिसरी आघाडी जाहीर

RG Kar Doctors Strike Down : कोलकात्यातील डॉक्टरांचा संप अखेर मागे! तरीही आरजी कर कॉलेजच्या डॉक्टरांनी सरकारला दिला इशारा

IND vs BAN: विराट कोहलीने सर्वांसमोर कुलदीप यादवला मैदानात खेचत नेलं, ऋषभ पंतनेही दिली साथ, पाहा Video

Donald Trump Third Attack: ट्रम्प यांच्यावर पुन्हा जीवघेणा हल्ला? अॅरिझोना इथल्या निवडणूक रॅलीत नेमकं काय घडलं?

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

SCROLL FOR NEXT