fertilizers esakal
जळगाव

Jalgaon News : पक्के बिल घेऊनच कीटकनाशकांची खरेदी करा : कृषी विभागाचा सल्ला; कीटकनाशकांची अंतिम मुदत तपासून घ्या

Agriculture News : सध्या पिकांवर कीडरोग न होण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जिल्ह्याचे कापूस मुख्य पीक आहे. त्यासोबत मका व सोयाबिन पिकाच्या लागवडीत वाढ झाली आहे. खरीप हंगामात आतापर्यंत चांगला पाऊस झाला आहे. सध्या पिकांवर कीडरोग न होण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. (Jalgaon Buy Pesticides Only With Firm Bill)

कीटकनाशकांची खरेदी अधिकृत विक्रेत्यांकडून पक्के बिल घेऊनच करावी व कीटकनाशकांची अंतिम मुदत तपासून घ्यावी, असा सल्ला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी के. एम. तडवी यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. ते म्हणाले, की कीटकनाशक फवारणी करताना नेहमी स्वच्छ पाणी वापरावे.

कीटकनाशक फवारणी करताना संरक्षक कपडे वापरावे. हातमोजे, चेहऱ्यावर मास्क, गॉगल, टोपी, पूर्ण विजार, ॲप्रन आदी नाक, कान, हात, डोळ्यांना कीटकनाशकांचा स्पर्श होणार नाही, याची काळजी घ्यावी. कीटकनाशकाच्या बाटली, पाकिटावर लिहलेले निर्देश वापरण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावेत.

पूड स्वरूपात असणारी कीटकनाशके अशीच वापरावीत. ते पाण्यात मिसळू नयेत. कीटकनाशकाचे गरजेपुरतेच द्रावण तयार करावे. लेबलवर दिलेल्या प्रमाणातच कीटकनाशकाचा वापर करावा, तसेच एकापेक्षा अधिक कीटकनाशकांचे एकत्रित मिश्रण करू नये. फवारणीची टाकी भरताना कीटकनाशक आजूबाजूला सांडणार नाही, याची दक्षता घ्यावी. (latest marathi news)

अतिउष्ण, अतिवेगाने वारा असलेल्या दिवशी फवारणी करू नका. शांत आणि थंड दिवशी फवारणी करा. वाऱ्याच्या उलट दिशेने फवारणी न करता वाऱ्याच्या दिशेने फवारणी करावी. फवारणी पूर्ण होईपर्यंत काहीही खाऊपिऊ नका. धूम्रपान किंवा तंबाखू चघळू नका. फवारणी झाल्यानंतर उपकरणे आणि बादल्या स्वच्छ पाणी व साबण वापरून धुवावीत.

फवारणी झाल्यानंतर लगेचच व्यक्तीला/पाळीव प्राण्याला शेतात जाऊ देऊ नये. प्रत्येक फवारणीसाठी आवश्यक ते फवारणी यंत्र वापरा. कीटकनाशकाचे रिकामे डबे स्वच्छ मिसळून नंतर त्याची प्रचलित व सुयोग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी. कीटकनाशक विषबाधेची लक्षणे आढळून आल्यास, विषबाधा झालेल्या व्यक्तीस तत्काळ रुग्णालयात दाखल करून वापरलेल्या कीटकनाशकाची बॉटल/पाकिट सोबत न्यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

Latest Maharashtra News Updates : एक्झिट पोलनुसार महायुतीचे सरकार स्थापन होणार : रामदास आठवले

SCROLL FOR NEXT