Cattles esakal
जळगाव

Jalgaon News: पाचोऱ्यात मोकाट जनावरे जप्तीची मोहीम! नागरिकांमधून समाधान; गुरांच्या मालकांवर दंडात्मक कारवाई

सकाळ वृत्तसेवा

पाचोरा : येथील पालिकेच्या विशेष पथकातर्फे पालिका क्षेत्रातील रहदारीस अडथळा निर्माण करणारी मोकाट जनावरे पकडून जप्त करण्याची मोहिम गुरुवारपासून (ता. २५) हाती घेण्यात आली आहे. या संदर्भात ‘सकाळ’ने गुरुवारी (ता. २५) वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेऊन पालिकेने मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम हाती घेतल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. (Jalgaon Campaign to confiscate stray animals in Pachora)

शहरातील प्रमुख रस्ते व शहरालगतच्या राष्ट्रीय महामार्गावर मोकाट गुरांचा उपद्रव दिवसा गणिक वाढत असल्याने अपघात होण्याचे प्रकार नित्याचे झाले होते. शहरातील भडगाव रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, देशमुखवाडी, जामनेर रस्ता, रेल्वे स्थानक रस्ता यासह राष्ट्रीय महामार्गावरील महाराणा प्रताप चौक, जारगाव चौफुली, कृष्णापुरी चौफुली, वरखेडी नाका, इंदिरानगर चौफुली, निर्मल रेसिडेन्सी, कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मोकाट गुरे मोठ्या संख्येने तास न तास भर रस्त्यात ठाण मांडून बसलेली असतात. या संदर्भात ‘सकाळ’मध्ये छायाचित्रासह वस्तुनिष्ठ वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर त्याची दखल घेत,

मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका पथकातर्फे मोकाट जनावरांवर कारवाई करण्यात आली आहे. शहरातील विविध ठिकाणाहून ११ मोकाट जनावरे पकडण्यात आली. नागरीकांनी आपल्या मालकीची जनावरे शहरात मोकाट न सोडता आपल्या खाजगी जागेत बांधून ठेवावीत. (latest marathi news)

मोकाट जनावरे रास्त्यावर दिसल्यास जप्त करण्यात येऊन त्यांच्या मालकांवर दंडात्मक कारवाईसह कायदेशीर कार्यवाही देखील करण्यात येईल तसेच मोकाट जनावरे जप्तीची मोहिम पुढे सुरुच राहील याची जनावरे मालकांनी नोंद घ्यावी, असा इशारा पालिकेने दिला आहे. या मोहिमेत तुषार नकवाल, अनिल पाटील, राजू लहासे, आकाश खैरनार, विशाल पवार, गोविंदा पारोचे, सुशील सोनवणे, तेजस सोपे, कैलास फतरोड, विशाल खरारे, दीपक ब्राह्मणे या पालिका कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT