doctor crime esakal
जळगाव

Jalgaon Crime News : महिला डॉक्टर विरुद्ध गुन्हा दाखल; प्रसूतीदरम्यान हलगर्जीपणाचा ठपका!

Crime News : डॉक्टरांच्या विरुद्ध मृताच्या कुटुंबीयांनी केलेल्या आरोपावरून चौकशी नंतर जिल्‍हापेठ पोलिस ठाण्यात महिला डॉक्टर विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील पोलिस अधीक्षक कार्यालयासमोरील गाजरे हॉस्पीटल येथे प्रसुतीसाठी दाखल महिलेचा मृत्यू झाल्याची घटना दोन वर्षांपूर्वी घडली होती. डॉक्टरांच्या विरुद्ध मृताच्या कुटुंबीयांनी केलेल्या आरोपावरून चौकशी नंतर जिल्‍हापेठ पोलिस ठाण्यात महिला डॉक्टर विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. (Case filed against female doctor Blame for laziness during delivery)

शहरातील श्रीकृष्ण कॉलनीतील २९ वर्षीय विवाहिता पूजा जयप्रकाश विश्वकर्मा (वय-२९) यांना प्रसुतीसाठी शहरातील गाजरे हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. प्रसूती झाल्यावर अतिरिक्त रक्तस्राव होवुन पूजा यांचा २२ जानेवारी २०२२ मृत्यू झाला.

मृताच्या कुटुंबीयांनी याबाबत डॉक्टरांवर आरोप करत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी करून लेखी तक्रार देखील दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीची दखल घेत वैद्यकीय समिती समक्ष मृत पूजा विश्वकर्मा यांचे शवविच्छेदन करण्यात आले होते. (latest marathi news)

मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी तज्ञ डॉक्टरांच्या पथकाने दिलेल्या अहवालानुसार उपचारात हलगर्जीपणा केल्याचा ठपका डॉ. तिलोत्तमा गाजरे यांच्यावर ठेववा होता. वैद्यकीय अहवाल आणि चौकशी अंती या प्रकरणी मृत विवाहितेचे पती जयप्रकाश जियालाल विश्वकर्मा यांच्या तक्रारीवरून जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मीरा देशमुख करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT