Bribe Crime  esakal
जळगाव

Jalgaon Bribe Crime: पीएफ कार्यालयातील मुख्य वित्त, लेखाधिकाऱ्यास अटक; 25 हजारांची लाच घेताना पुणे सीबीआय पथकाचा छापा

Bribe Crime : लाच घेणाऱ्या एमआयडीसी पीएफ कार्यालयातील मुख्य वित्त व लेखाधिकाऱ्याला पुण्याच्या सीबीआय पथकाने सापळा रचून मुद्देमालासह अटक केली.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : पीएफ ऑडिट रिपोर्ट देण्याच्या मोबदल्यात २५ हजारांची लाच घेणाऱ्या एमआयडीसी पीएफ कार्यालयातील मुख्य वित्त व लेखाधिकाऱ्याला पुण्याच्या सीबीआय पथकाने मंगळवारी (ता. ८) सायंकाळी सातला सापळा रचून मुद्देमालासह अटक केली. रमण वामन पवार (वय ५८, रा. बलिराम पेठ, जळगाव) असे लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे. बुधवारी (ता. ९) दुपारी तीनला त्याला जिल्हा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने शुक्रवार (ता. ११)पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. (Chief Finance Accountant in PF office arrested for accepting bribe of 25 thousand )

जळगाव शहरातील तक्रारदार सचिन माळी यांच्या वडिलांच्या नावाने कामगार पुरवठा करणारी फर्म आहे. ती दोन वर्षांपासून बंद आहे. फर्मचे लेखापरीक्षण करण्यासंदर्भात पीएफ कार्यालयाकडून माळी यांना नोटीस बजावली होती. त्यानुसार रमण पवार यांच्यामार्फत लेखापरीक्षणही केले. मात्र, त्यांनी सचिन माळी यांना लेखापरीक्षणाचा अहवाल दिला नाही. याबाबत विचारणा केली असता, रमण पवार यांनी त्यात काही त्रुटी असल्याचे सांगितले. मार्च २०२३ च्या ‘पीएफ’च्या पेमेंटमध्ये चूक आहे.

फर्मच्या पीएफ ऑडिट रिपोर्टसाठी सुरुवातील ५० हजारांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती २५ हजार रुपये देण्याचे ठरले. याबाबत सचिन माळी यांनी पुण्यातील ‘सीबीआय’कडे तक्रार केली. तक्रारीची शहनिशा केल्यानंतर मंगळवारी सायंकाळी सातला सापळा रचून संशयित रमण वामन पवार यांना अटक केली. सीबीआय पथकाने बुधवारी दुपारी पवार यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने संशयित रमण पवार यांना ११ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Rane : आमदार होताच निलेश राणेंची धमकी, म्हणाले, ...तर त्याचा जागेवरच बंदोबस्त करु

Pune Fake Voting: पुणे शहरातील सर्व ८ मतदारसंघांत फेक मतदान! कोथरुड अन् वडगावशेरीत सर्वाधिक

Ladki Bahin Yojana: आनंदाची बातमी, या तारखे पासून लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये, मोठी अपडेट आली समोर!

Mumbai Fire: रात्रीच्या वेळी मुंबईजवळ भीषण आग; ६ बस जाळून खाक, वाचा नक्की काय घडलं

IPL Mega Auction 2025: Mumbai Indians ने पायावर धोंडा मारून घेतला; 32.5 cr खिशात असूनही चांगला खेळाडू जाऊ दिला

SCROLL FOR NEXT