CM Shinde Jalgaon Daura : रावेरला जोडणाऱ्या तापी नदीवरील पुलाच्या कामासाठी ‘नाबार्ड’मधून निधी कमी पडू देणार नाही, असे स्पष्ट करीत मुक्ताईनगरच्या पर्यटन विकासासाठी ५० कोटी रुपयांचा निधी देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली.
रावेर व मुक्ताईनगर दोन तालुक्यांना जोडणाऱ्या तापी नदीवरील सुलवाडी- मेंढोळदे पुलाचे भूमिपूजन सोमवारी करण्यात आले, त्याप्रसंगी श्री. शिंदे बोलत होते. (Jalgaon Chief Minister Eknath Shinde statement Fund from NABARD for bridge work)
व्यासपीठावर पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसनमंत्री अनिल भाईदास पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील, आमदार संजय सावकारे, आमदार चिमणराव पाटील, भुसावळचे आमदार संजय सावकारे, डॉ. राजेंद्र फडके, जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष अशोक कांडेलकर.
माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, माजी आमदार दशरथ भांडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत सोनवणे व मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.
बांधावर जाणारे सरकार
कार्यक्रमाची सुरवात महाराष्ट्र गीताने झाली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी नागरिकांशी संवाद साधला. मुख्यमंत्री म्हणाले, की आम्ही फेस टू फेस बोलणारे व संवाद साधणारे आहोत. शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी नाते व संवाद साधणारे आहे.
आमचे सरकार विकासाच्या नव्या रूपाचे प्रारंभ करणारे सरकार आहे. मुक्ताईनगरला आजपर्यंत विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या पुलासाठी नाबार्डमधून पाहिजे तेवढे पैसे दिले जातील, असाही शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला. (latest marathi news)
ठाकरे सरकार नकारात्मक
दीड वर्षांपूर्वी जो उठाव केला तो तेव्हाच्या ठप्प सरकारविरोधात केला. ठाकरे सरकारला पॅरालिसिस झाला होता तसेच वातावरणात निगेटिव्हिटी मोठ्या प्रमाणावर होती. त्या वेळी सर्व सण-उत्सवांवर बंदी घालणाऱ्या सरकारविरोधात आम्ही बंड पुकारून जनतेचे सरकार आणल्याचा दावा त्यांनी केला.
दीड वर्षांत १२० प्रकल्पांना मान्यता
आमचे सरकार शेतकरी, कष्टकरी, महिला, वृद्ध, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी निर्णय घेणारे सरकार आहे. दीड वर्षात १२० प्रकल्पांना मान्यता देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. हे सरकार लोकांच्या मनाने, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी स्थापन केलेले आहे.
५० खोक्यांची घोषणा चुकीची : अनिल पाटील
पुनर्वसनमंत्री अनिल पाटील म्हणाले, ज्यावेळेस आम्ही विरोधामध्ये होतो, त्यावेळेस ५० खोक्यांची घोषणा मी तयार केली होती. ती घोषणा चुकीची असून, आज ती चूक झाल्याचे आम्ही मानतो व ती घोषणा विकासाची होती. ते विकासाचे हजारो खोके होते, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. माझ्या खात्याकडे पुनर्वसनाचा प्रस्ताव आल्यानंतर मी तत्काळ तो मंजूर करून जलसंपदा खात्याकडे सुपूर्द करेल, असेही ते म्हणाले.
चंद्रकांत पाटलांचे साकडे
मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी नाव न घेता एकनाथ खडसेंवर टीका केली. पुलासाठी ‘नाबार्ड’मधून शंभर कोटी रुपये देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करत केळीप्रक्रिया उद्योग आले तर शेतकऱ्यांचे व या भागातील युवकांना रोजगार मिळेल. विम्यापासून काही शेतकरी वंचित राहिले, त्यांना भरपाई मिळावी, बोदवड सिंचन योजनेच्या जामठी क्रमांक दोन प्रकल्प मंजूर करावा, अशी त्यांनी मागणी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.