Jalgaon Lok Sabha Constituency : लोकसभेच्या रावेर मतदारसंघात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या चोपडा विधानसभा निवडणुकीत हा तालुका आघाडी अथवा युतीला यश देत आला असला तरी लोकसभा निवडणुकीत सातत्याने भाजपलाच यश देत आलेला आहे. गेल्या निवडणुकीतही या मतदारसंघात भाजप उमेदवार रक्षा खडसेंना ७७ हजारांहून अधिक मताधिक्य होते.. या वेळी ते कायम राहतेय की वाढते, हे पाहावे लागेल. ( Chopda Assembly Constituency is most important in Raver Lok Sabha Constituency )
रावेर लोकसभा मतदारसंघातील सर्वांत महत्त्वपूर्ण असे चोपडा विधानसभा क्षेत्र. सातपुड्याच्या कुशीतील आदिवासी पट्ट्याच्या पायथ्याशी असलेल्या चोपडा तालुक्याची एकूणच सामाजिक व सांस्कृतिक रचना वेगळी आहे. मराठाबहुल मानल्या जाणाऱ्या या मतदारसंघात गुजर समाजाचीही मोठी गावे आहेत. रेवा गुजर व दोडे गुजर अशा दोन्ही समाजासह कोळी, आदिवासींची मतेही निर्णायक आहेत.
राष्ट्रवादीचा बालेकिल्ला
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा शरद पवारांचे निकटवर्तीय म्हणून अरुणभाई गुजराथींचा हा तालुका मानला जातो. मतदारसंघ अनु. जमातीसाठी राखीव होण्याआधी अरुणभाईंनी या मतदारसंघातून सातत्याने विजय मिळविला. मंत्री, विधानसभा अध्यक्ष पदापर्यंत ते पोहोचले. त्यामुळे स्वाभाविकच राष्ट्रवादीचा हा गड मानला जातो.
लोकसभेत ‘कमळा’ला साथ
पण, एक दोन वेळा वगळता लोकसभेसाठी नेहमीच भाजपला मताधिक्य दिले आहे. भाजपच्या यशाचे श्रेय सर्वसामान्य कार्यकर्त्यांनाच द्यावे लागेल पक्षाच्या दृष्टीने तालुक्यात एकही मातबर नेतृत्व नसताना तालुका नेहमीच देशपातळीवर मतदानाच्या वेळेस मताधिक्य देत आलेला आहे. गत लोकसभा निवडणुकीत या लोकसभा मतदार संघातील चोपडा तालुक्याने श्रीमती रक्षा खडसे यांना ७७ हजारांच्या वर मताधिक्य दिले होते. मात्र, या वेळी मतदारांकडून संमिश्र कौल मिळण्याची शक्यता आहे. (latest marathi news)
आमदारांचा गट होणार सक्रिय
महायुतीतील घटकपक्ष शिवसेना शिंदे गटाच्या आमदार म्हणून लता सोनवणे ह्या आहेत. महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसेंच्या प्रचारात शिंदे गट आतापर्यंत सक्रिय नव्हता. मात्र श्रीमती खडसे यांनी नुकतीच लता सोनवणे व माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांची भेट घेतली. त्यामुळे आमदारांसह त्यांचे समर्थक व शिवसेना शिंदे गट ही प्रचारात लवकरच सक्रिय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मताधिक्यावर राखण्याचे आव्हान
२०१९ लोकसभेच्या निवडणुकीत या तालुक्याने रक्षा खडसेंना ७७ हजारांचे मताधिक्य दिले होते. मात्र या निवडणुकीत ते टिकवणे अवघड आहे. मताधिक्य मिळेल पण काही प्रमाणात फरक पडणार असल्याचे सांगितले जात आहे. सामाजिक गणिते ही काही अंशी उपयोगी ठरणार असल्याचे दिसून येत आहे. हा सर्व खेळ मतदारांवर अवलंबून आहे.
खाली ‘भाई’.. वर ‘वाजपेयी’
मतदारसंघांच्या पुनर्रचनेआधी चोपडा विधानसभा क्षेत्र पूर्वाश्रमीच्या एरंडोल लोकसभा मतदारसंघाचा भाग होते. शिवाय हा मतदारसंघ अनारक्षित होता. अरुणभाई गुजराथींनी त्याचे अनेकदा प्रतिनिधीत्व केले. १९९६, १९९८, १९९९ व पुन्हा २००४ अशा लोकसभेच्या निवडणुका पुनर्रचनेआधी झाल्या.
त्या प्रत्येक निवडणुकीत या मतदारसंघाने भाजपच्या उमेदवारालाच मताधिक्य दिले. मात्र, प्रत्येक विधानसभा निवडणुकीत २००४चा अपवाद वगळता (कैलास पाटील आमदार झाले) मतदारसंघाने अरुणभाई गुजराथींना निवडून दिले. त्यामुळे त्या काळी खाली ‘भाई’ अन् वर ‘वाजपेयी’ असे म्हटले जायचे..
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.