चोपडा : राज्य शासनाच्या वतीने हिंदुहृयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान स्पर्धेत चोपडा आगाराचा राज्यात प्रथम क्रमांक आला. यात राज्यपातळीवरील ५० लाखांचे, प्रादेशिक विभागाचे दहा लाखांचे असे एकूण ६० लाख रुपयांचे बक्षीस चोपडा बसस्थानकाला मिळाले. मात्र, एवढे पुरस्कारप्राप्त सुंदर स्वच्छ बसस्थानकात बसगाड्यांचा तुटवडा असल्याने प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. (chopda Shortage of buses in top depots of state is causing inconvenience to passengers and lack of facilities )
प्रवाशांना चांगल्या सुविधा, सुरक्षित प्रवास, उत्त्पन्न, इंधन बचत यांसह दहा बाबींच्या अनुषंघाने राज्य परिवहन महामंडळाच्या जळगाव विभागातील चोपडा आगारास रैंकिंगमध्ये १००पैकी ९२ गुण मिळाले होते. मात्र, चोपडा आगारात प्रवाशांना घरपोच जाण्यासाठी चांगल्या सुविधा असलेल्या बसगाड्यांची गरज आहे. चोपडा आगाराला बक्षीस तर मिळालेच परंतु, महामंडळाने अडचणीदेखील सोडविल्यास अजून आगार नफ्यात येणार आहे. प्रवाशांना वाहतुकीसाठी जाणाऱ्या बसगाड्या अक्षरशः खिळखिळ्या झालेल्या आहेत.
त्यांची मुदत संपली असूनही त्या काम करीत आहेत, याचा त्रास प्रवाशी, सहवाहक व चालकांदेखील होत आहे. सध्या चोपडा आगारात फक्त ७३ बसगाड्या आहेत. कमीत कमी ९० बसगाड्यांची आवश्यकता आहे. मात्र, १७ बसगाड्यांची कमतरता आहे. यात तालुक्यातील रस्त्यांची अवस्था अजूनही वाईटच आहे. नवीन बस अथवा अपूर्ण वाहनसंख्येमुळे अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. लांबपल्ल्याच्या अनेक बसगाड्या बंद आहेत. (latest marathi news)
त्यात शिर्डी, बऱ्हाणपूर, अकोला या लांबपल्ल्यांच्या बसगाड्यांचा समावेश असून, मागणी करूनही बसगाड्यांअभावी प्रवासी वाहतूक बंद आहे. आगाराजवळ चोपडा पीपल्स बँकेने जलकुंभ बांधला. मात्र, त्यात नियमित पाणी राहत नाही. शिक्षणासाठी हजारो विद्यार्थी शहरात येतात. त्यांना ये-जा करण्यास बसगाड्यांची अडचणी आहेत. काही गावांत व फाट्यांवर हात दाखवूनही बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होते.
''चोपडा बसस्थानकात स्वच्छता व लोकवर्गणीतून सौंदर्यीकरण करण्यात आले. मात्र, नवीन बस वा अपूर्ण बससंख्येमुळे प्रवाशांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. चोपडा आगारातून अकोला, शेगाव, तुळजापूर, इंदोर, अहमदाबाद, ओंकारेश्वर, बऱ्हाणपूर, नवी मुंबई, वसई-विरार, मुंबई, पनवेल, छत्रपती संभाजीनगर, पंढरपूर, वापी, सुरत, नवापूर, नंदुरबार, चाळीसगाव या लांबपल्ल्याच्या बसफेऱ्या नाहीत. आणखीन बसगाड्या मिळाल्यास आगाराचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल.''- श्रीकांत नेवे, अध्यक्ष, प्रवासी संघटना, चोपडा.
''प्रवाशांच्या सर्व सोयीसुविधा पुरविण्याचा प्रयत्न आहे. मात्र, बसगाड्यांअभावी किंवा इतर किरकोळ समस्यांअभावी अडचणी आहेत. आगारास मिळालेल्या बक्षिसांतून विभाग नियंत्रक यांच्याशी चर्चा करून काय सोयीसुविधा करता येतील, याचा प्रयत्न आहे.''- महेंद्र पाटील, आगार व्यवस्थापक, चोपडा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.