Jalgaon News : शहराच्या मध्यवर्ती भागातून बलबल काशी म्हणून ओळख निर्माण केलेला नाला पूर्वीपासून वाहत आहे. या नाल्याची लांबी जवळपास आठ किलोमीटर आहे. नाल्याच्या दोन्ही बाजूने दाट वस्थी आहे. नाल्याची सफाई झाल्याचे प्रशासनाकडून सांगितले जाते. मात्र, प्रत्यक्षात नाला घाणीने तुुडुंब भरल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होत असल्याने कीटकजन्य रोगांच्या आजारात वाढ झालेली आहे. ( Citizens health in danger due to lack of sanitation in Bhusawal )
स्वच्छतेवर पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याने भुसावळकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शिवाय नगरपालिकेचा स्वच्छतेवरील खर्चही पाण्यात गेल्याचे दिसून येत आहे. भुसावळ नगरपालिका क्षेत्रात बलबलकाशी, पंधरा बंगला, आनंदनगर, आंब्रेजभाई या नावांची ओळख घेऊन चार ओढ्यांनी मार्गक्रमण केला आहे. पावसाळ्यापूर्वी या नालेसफाईला वेग यावा, यासाठी कंत्राटे दिली जातात.
मात्र, यंदा सार्वत्रिक लोकसभा निवडणूक आचारसंहिता असल्यामुळे शहरात असलेल्या नाल्यांच्या सफाईला विलंब होत असल्याचे सांगितले जात आहे. शहराच्या मध्यभागातून बलबलकाशी हा नाला शिरपूर कन्हाळा डोंगराळ क्षेत्रातून पावसाळ्याचे नैसर्गीक प्रवाह वाहून नेण्याचे कार्य पूर्वी करीत असे कालांतराने नैसर्गीकप्रवाह ठिकठिकाणी अडवले गेल्याने या नाल्यात आता नैसर्गाक ऐवजी सांडपाण्याचा मोठया प्रमाणात प्रवाह आहे.
नाल्याच्या दोन्ही बाजूने दाट वस्थी असून, या नाल्यात नागरीकाकडून मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. हा नाला कचऱ्याने तुडूंब भरला असून, सांडपाणी जाण्यास मार्ग नसल्याने ठिकठिकाणी मोठमोठे डबके निर्माण झाले आहेत. पावसाळ्यात बहुधांवेळा जाममोहल्ला भागातील नागरिकांच्या राहत्या घरांमध्ये नाल्याचे कमरेपर्यंत सांडपाणी शिरून अन्नधान्य संसारो पयोगी वस्तूची नासधूसही होत असते. (latest marathi news)
सध्या या नाल्यात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा वाढल्याने डासांची उत्पत्ती होत आहे. यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक लिक्विड टाकले जात नाही. तसेच बहुतेक भागात धूरळणी व फवारणी फक्त फोटो सेशन पुरतीच केली जात असल्याची स्थिती आहे. सदर नाल्यासंदर्भात वारंवर प्रश्न उपस्थीत झाले. मात्र, नगरपालिकेचे प्रयत्न अर्धवट पडल्याचे आजपर्यत तरी दिसून येत आहेत.
याच बलबल काशी नाल्यातील सांडपाण्याने साचलेल्या डबक्यात काही दिवसांपूर्वी एक सहावर्षीय बालकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानादेखील प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा आहे. नगरपालिकेकडून सर्वांत जास्त खर्च आरोग्य व स्वच्छता विभागावर होत आहे. तसे पाहता, प्रत्येक प्रभागात दरमहा लाखो रुपये स्वच्छतेवर खर्च होत असताना परिणाम किती साध्य होतो, हा संशोधनाचा विषय आहे. प्रत्येक प्रभागातील या समस्येवर आतापर्यंत पदाधिकारी व आपापल्या प्रभागातील माजी नगरसेवकांची चुप्पी का आहे, असा नागरिकांचा प्रश्न आहे.
''भुसावळ शहरातील नाले नगरपालिकेच्या माध्यमातून पावसाळापूर्वी स्वच्छ करण्यासंदर्भात निविदा काढल्या जातात. मात्र, यंदा लोकसभा निवडणूक आदर्श आचारसंहिता असल्यामुळे निविदांसाठी विलंब होत आहे. मात्र, निवडणूक संपताच निविदा काढून नाले स्वच्छ केले जातील.''-दीपक चौधरी, आरोग्य व पाणीपुरवठा, अभियंना, नगरपालिका, भुसावळ.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.