drug esakal
जळगाव

Jalgaon Crime News : जळगाव शहर अंमली पदार्थांच्या विळख्यात; 2 पोलिस ठाण्यात एकाच दिवसांत 7 गुन्हे दाखल

Jalgaon Crime : शहरात सार्वजनिक ठिकाणांवर गांजा-चरस आणि ड्रग्सची नशा करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : शहरात सार्वजनिक ठिकाणांवर गांजा-चरस आणि ड्रग्सची नशा करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नशेच्या आहारी गेलेल्या मंडळींकडून आता सार्वजनिक ठिकाणे नशेखोरीचा अड्डा बनली आहेत. एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत तीन आणि जिल्‍हापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत चार, अशा सात ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करून गुन्हे दाखल केले आहेत.(city 7 crimes registered in 2 police stations in same days in case of narcotics )

मेहरुण उद्यानात उद्यानात एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने दुपारी चारला तिघे गांजा ओढताना मिळून आले. शेख मशरूम शेख अब्दुल कादीर (वय ४२, रा. गवळीवाडा), वसीम शेख तलत मेहबूब (३९, रा. शनिपेठ) आणि फय्याज शेख शमशू (३६, रा. तांबापुरा), अशी त्यांची नावे असून, तिघांजवळ गांजा, चिलम, माचिस जप्त केली आहे. याबाबत एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

अजय कॉलनीतील वीज उपकेंद्रच्या भिंतीजवळ किरण भगवान सकट (वय ३१, रा. हरिविठ्ठलनगर) दुपारी सव्वाबाराला चिल्लम ओढताना मिळून आला. जिल्‍हापेठ पोलिसांनी त्यास अटक करून गुन्हा दाखल केला. बहिणाबाई उद्यानामागे योगेश रमेश बाविस्कर (३४, रा. हरिविठ्ठलनगर) चिलम ओढताना मिळून आला. पोलिस नाईक हरीश परदेशी यांनी त्याला चिलम आणि गांजाच्या पुडीसह ताब्यात घेतले व जिल्‍हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

नवीन बसस्थानकामागे अनिल रघुनाथ राणे (६३, रा. भिकमचंदनगर) याला पोलिस नाईक राजेश मेंढे यांनी गांजा ओढताना ताब्यात घेतले असून, जिल्हापेठ पोलिसांत गुन्ह्याची नोंद झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या भिंतीला लागून गांजा ओढणाऱ्या गणेश शालीग्राम धांडे (वय ४१) याला पोलिस नाईक हरीश परदेशी यांनी अटक केली व जिल्‍हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

दरम्यान, मेहरुण उद्यान गांजा, चरस ओढणाऱ्यांचे केंद्र बनले आहे. त्यापाठोपाठ शाहूनगर मीर शुक्रुल्ला उद्यान, जळकी मिलचा परिसर, बहिणाबाई उद्यानामागे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाया भिंतीला लागून दिवसा, सायंकाळी की, रात्री गांजा ओढणारे सहज नजरेस पडतात. शाहूनगरात एमडी, पांढरी पावडर, गांजा सर्रास विक्री होत आहे. शाहूनगरात रात्रभर ड्रग्ज विक्रेते ट्रॅफिक गार्डनच्या आडोश्यात ग्राहकांना माल पुरवतात. पान टपऱ्यांवर गांजाची सिगारेट पन्नास रुपयाला मिळत आहे.

एलसीबीचा सेक्शन ड्राईव्ह

एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ३ गुन्हे, प्रत्येकी एक संशयित, जिल्‍हापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत चार गुन्हे, प्रत्येकी एक संशयित, अशा पद्धतीने केवळ कागदावर कारवाई दिसावी, म्हणून ठरवून हे गुन्हे नोंदविल्याचे वेळ, काळ आणि पद्धत पाहून स्पष्ट जाणवते. एकुण सात गुन्ह्यांमध्ये जिल्‍हापेठच्या हद्दीत राजेश मेंढे, नितीन बाविस्कर, हरीश परदेशी, रवी नरवाडे यांनी पहिली कारवाई अजय कॉलनीत दुपारी सव्वाबारा, दुसरी कारवाई बहिणाबाई उद्यानामागे १२ वाजून ३५ मिनिटाला, तिसरी कारवाई १२ वाजून ५५ मिनिटाला आंबेडकर उद्यानाजवळ केली.

१ वाजून २० मिनिटाला बसस्थानकाजवळ कारवाई झाली. एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पहिली कारवाई तरणतलावालगत ४ वाजून ५ मिनिनटांनी, मेहरुण उद्यानात विहिरीजवळ ४ वाजून १० मिनिटांनी कारवाई झाली.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाच मिनिटांच्या अंतरावर एक चिलमधारी पकडला. या हिशेबाने साडेपाच लाख लोकसंख्येच्या जळगावात एका दिवसात हजार गुन्हे सहज दाखल होतील आणि तशी परिस्थिती नसेल, तर अस्तित्व दाखविण्यासाठी अनेक गुन्हे अनडिटेक्टेड आहे. त्यांचा तपास, खून, बलात्काराच्या गुन्ह्यातील पळून गेलेले संशयितांना कोण अटक करेल, हा प्रश्न आत्मचिंतन करणारा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT