Vaccination Center crowd Vaccination Center crowd
जळगाव

जळगावात लसीकरण केंद्रावर गोंधळ सुरूच; नागरिकांची उसळली गर्दी

Jalgaon Vaccination Center News: लसीकरण केंद्रावर लशींचा साठा कमी उपलब्ध होत असल्याने काही केंद्रे लवकर बंद होत आहेत, तर काही केंद्रे सुरूच होत नाहीत.

सकाळ डिजिटल टीम


जळगाव ः शहरासह जिल्हयात लशींचा (vaccine Stok ) पुरेसा साठा उपलब्ध होत नसल्याने गोंधळ, होमगार्ड (Homgarde) , पोलिस (Police) कर्मचाऱ्यांना मारहाणीच्या घटना वाढत आहे. गेल्या शनिवारी (ता.२४) शहरातील सिंधी कॉलनीत असलेल्या चेतनदास मेहता रुग्णालयाच्या (Hospital) लसीकरण केंद्रावर (Vaccination Center) नागरिक, महिलांचा गोंधळ झाला होता. धक्काबुकी, रेटारेटी झाली होती. आज पुन्हा याच केंद्रावर नागरिकांनी लसीकरणासाठी गोंधळ केला. एकीकडे जिल्हा प्रशासन गर्दी न करण्याचे आवाहन करीत दुसरीकडे लसीकरण केंद्रावरच गर्दी होत आहे. यातून कोरोनाचा (Corona) फैलाव अधिक होणार आहे. मात्र याकडे महापालिका प्रशासन (Municipal administration), आरोग्य (Helth administration) प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.

(jalgaon city corona vaccination center again citizen large croud crowd)


शहरातील लसीकरण केंद्रांवर लस येणार असल्याचे कळताच आपला क्रमांक पहिला लागला पाहिजे यासाठी पहाटे पाच पासून मेहता रुग्णालयात रांगा लागल्या होत्या. सकाळी सकाळी नऊला पून्हा गर्दी वाढली. रेटारेटीत नागरिकांनी गोंधळ घालण्यास सुरवात केली. गोंधळ वाढल्याने पोलिसांना या वेळी पाचारण केल्यानंतर गोंधळ थांबला.



कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी एकमेव अस्त्र म्हणजे कोरेाना लसीकरण करून घेणे होय. याची जाणीव नागरिकांना झाल्याने नागरिक वाटेल त्या ठिकाणच्या लसीकरण केंद्रांवर जाऊन लसीकरण करताहेत. मात्र लसीकरण केंद्रावर लशींचा साठा कमी उपलब्ध होत असल्याने काही केंद्रे लवकर बंद होत आहेत, तर काही केंद्रे सुरूच होत नाहीत. अशात लस आल्याचे कळताच त्या केंद्रावर नागरिकांची गर्दी होत आहे. मेहता रुग्णालयाच्या लसीकरण केंद्रावर सिंधी कॉलनीसह जोशी कॉलनी, कंजरवाडा, तांबापुरा परिसरातील नागरिकांनी लस घेण्यासाठी एकच गर्दी केली होती.

...तर वैद्यकीय अधिकारी जबाबदार
लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी यातून कोरोनाचा उद्रेक होत नाही का ? अशी विचारणा जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांना केली असता ते म्हणाले की, आजच जळगावसह सर्व लसीकरण केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना लसीकरणावेळी गर्दी न होवू देण्याबाबत सूचना पत्रद्वारे दिल्या आहेत. केंद्रावर सोशल डिस्टन्स पाळले गेले पाहिजे, गर्दी नको व्हायला. जर त्यातून कोरोनाचा शिरकाव होवून रुग्ण वाढले तर संबंधित अधिकाऱ्यांना का जबाबदार धरू नये असे सूचना दिल्या आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: जितेंद्र आव्हाड यांची विजयाच्या दिशेने वाटचाल!

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील १३१०९ मतांची आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT