Jalgaon Traffic Rule : दोन-तीनशे कोटींच्या निधीतून जळगाव शहरातील बहुतांश प्रमुख व गल्लीबोळातील रस्त्यांची कामे गेल्या काही वर्षांत झालीत. प्रमुख रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण सध्या सुरू असून, बरेचसे रस्ते गुळगुळीत झालेत. हे चकाचक रस्ते वाहनांना सुसाट धावण्यास आणि पर्यायाने अपघातांना निमंत्रण देतात. या रस्त्यांवर वाहनांच्या अनियंत्रित वेगाला आवर घालण्यासाठी गतिरोधक मात्र एकाही ठिकाणी आढळून येत नाही. ( road works are going on at faster pace for past few months )
त्यामुळे गेल्या काही दिवसांत त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून, तातडीने या रस्त्यांवर गतिरोधक टाकणे गरजेचे आहे. जळगाव शहरात गेल्या काही महिन्यांपासून रस्त्यांची कामे वेगाने सुरू आहेत. सुरवातीला १०० कोटी, नंतरच्या टप्प्यात ८२ कोटी व पुन्हा काही कोटींची कामे मंजूर करण्यात आली. या वेगवेगळ्या निधींच्या टप्प्यात शहरातील जवळपास सर्वच भागांमध्ये कमी अधिक प्रमाणात रस्त्यांची कामे प्रगतिपथावर आहेत. यात डांबरीकरणासह कॉंक्रिटीकरण, तसेच जुन्या रस्त्यांची दुरुस्ती आदी कामे समाविष्ट आहेत.
प्रमुख रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण
सध्या जळगाव शहरात राज्य शासनाकडून मंजूर ८२ कोटींच्या निधीतून प्रमुख रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण करण्यात येत आहे. त्या अंतर्गत अजिंठा चौक ते चित्रा चौक या टप्प्यातील काम अजिंठा चौकापासून नेरीनाका स्मशानभूमीपर्यंत पूर्ण झाले आहे. दुसरीकडे काव्यरत्नावली चौक ते आकाशवाणी चौकातील दोन्ही बाजूंचे कॉंक्रिटीकरण पूर्ण झाले असून, आकाशवाणी चौक ते स्वातंत्र्य चौकापर्यंत व पुढे चिमुकले श्रीराम मंदिरापर्यंत एका बाजूचे कॉंक्रिटीकरण झाले आहे.
लोकसभा निवडणुकीदरम्यान हे काम बंद होते, ते आता पुन्हा आकाशवाणी चौकापासून स्वातंत्र्य चौकापर्यंत दुसऱ्या बाजूने सुरू झाले आहे. त्यातील काव्यरत्नावली चौक ते आकाशाणी चौकापर्यंतचा रस्ता पूर्ण होऊन या गुळगुळीत रस्त्यावर कुठेही गतिरोधक नसल्याने वाहने सुसाट धावताना दिसतात. (latest marathi news)
स्मशानभूमी ते मानराज चौक
स्मशानभूमी ते अजिंठा चौकापर्यंतचा रस्ताही दोन्ही बाजूंनी कॉंक्रिटचा झाला आहे. पुढे अजिंठा चौक ते मानराज चौकापर्यंत व पुढेही महामार्गा चौपदरीकरणांतर्गत दुतर्फा रस्त्याचे कॉंक्रिटीकरण पूर्ण झालेय. मात्र या रस्त्यावर स्मशानभूमीपासून थेट रेमंड चौकापर्यंत कुठेही गतिरोधक नाही. रेमंड चौकात हनुमान मंदिराजवळ छोटे गतिरोधक आहे तेवढेच. त्यामुळे या रस्त्यांवरुन जाणाऱ्या वाहनांचा वेगही अनियंत्रित आहे.
रामानंदनगर ते डी-मार्ट
गेल्या वर्षी व त्याआधी जवळपास वर्षभर असे शहरातील काही रस्त्यांचे डांबरीकरणाचे कामही झाले. त्यात महत्त्वाच्या रामानंदनगर ते काव्यरत्नावली व पुढे डी-मार्टपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. अमृत जलवाहिनीचे काम, व्हॉल्व्हसाठी वारंवार होणाऱ्या खोदकामामुळे अनेक वर्षे ही कामे रखडली. मात्र, ती पूर्ण झाल्यानंतरही महापालिकेचे नवीन रस्ते खोदण्याचे काम बंद झाले नाही.
ते अद्यापही सुरूच आहे. अशात रामानंदनगर ते डी- मार्टपर्यंतच्या रस्त्याचे सीलकोट झाले नव्हते. ते कसेबसे आता पूर्ण झाले. मात्र, या गुळगुळीत रस्त्यावरही कुठेही गतिरोधक नाही. त्यामुळे वाहनांच्या वेगाला आवर घालणारे कुणी नाही. गणेश कॉलनी ते चित्रा चौकापर्यंतच्या रस्त्यावर एकाही ठिकाणी गतिरोधकाचा पत्ता नाही.
चकाचक रस्ते अन् रॅश ड्रायव्हिंग
शहरातील गुळगुळीत व चकाचक रस्त्यांवर वाहने चालविणाऱ्या तरुणाईला वेगाचा मोह आवरता येत नाही. या रस्त्यांवर सुसाट वाहने धावताना दिसतात. तरुण, अगदी मिसरुड फुटलले कार्टेही दुचाकी भन्नाट वेगाने दामटत असल्याचे चित्र या रस्त्यांवर नियमितपणे पाहायला मिळते. पोलिस अधीक्षकांच्या निवासस्थानासमोरून रोज अनेक वाहने सुसाट धावतात.
त्यांच्या वेगाला कुठेही मर्यादा नसते. त्यातून लहान-मोठे अपघात नित्याचेच झाले आहेत. शिवाय, तरुण मुले रेसिंग बाईक चालविताना रस्त्याच्या स्थितीचा विचार न करता ॲक्सिलेटर वाढवतच जात असतात. त्यांना रोखणारे वाहतूक पोलिसही ठिकाणावर आढळून येत नाहीत.
अनियंत्रित कारने डॉक्टरचा बळी
काव्यरत्नावली चौक ते आकाशवाणी चौकाचे कॉंक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. या रस्त्यावर कुठेही गतिरोधक नसल्याने वाहने सुसाट धावतात. सुसाट कारने मध्यरात्री एका डॉक्टरचा बळी घेतल्याची घटना ताजीच आहे. त्यामुळे वाहनांच्या वेग नियंत्रणासाठी शहरातील प्रमुख रस्त्यांवर तरी किमान काही ठिकाणी गतिरोधक बसविणे गरजेचे आहे. शिवाय, वाहतूक पोलिसांची नियुक्तीही आवश्यक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.