BUS  esakal
जळगाव

Jalgaon News : अखेर ‘कोरोना’पासून बंद बसफेऱ्या पूर्ववत; मुक्ताईनगर, बोदवड तालुकावासीयांना दिलासा

Jalgaon : रोहिणी खडसे यांनी राज्य परिवहन महामंडळाचे जळगाव विभागिय नियंत्रक भगवान जगनोर यांची २७ जूनलाभेट घेऊन लेखी निवेदनाद्वारे केली होती.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या भुसावळ आगारांतर्गत बोदवड तालुक्यातील विविध गावांसाठी सोडण्यात येणाऱ्या कोरोना कालावधीपासून बंद असलेल्या बसफेऱ्या पूर्ववत सुरू कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी राज्य परिवहन महामंडळाचे जळगाव विभागिय नियंत्रक भगवान जगनोर यांची २७ जूनलाभेट घेऊन लेखी निवेदनाद्वारे केली होती. त्यांच्या या मागणीला यश आले असून, मुक्ताईनगर, बोदवड तालुक्यातील या बसफेऱ्या पूर्ववत नियमित सुरू झाल्या आहेत. ( closed bus trips due to Corona are restored Relief to residents of Muktainagar Bodwad taluka )

भुसावळ आगारातून कोरोना लॉकडाऊन लागण्यापूर्वी भुसावळ ते बोदवड, भुसावळ ते लोणवाडी, सोयखेडा, वाकी, सुरवाडा, विचवा अशा बसफेऱ्या नियमित सोडण्यात येत होत्या. परंतु कोरोना लॉकडाऊन कालावधीपासून या बसफेऱ्या बंद करण्यात आल्या होत्या तसेच मुक्ताईनगर आगार अंतर्गत मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांसाठी बसफेऱ्यांचे नियोजन केले जाते. परंतु उन्हाळ्यात लग्नसोहळे आणि इतर प्रासंगिक करारासाठी बसची मागणी जास्त असल्याने आणि शाळा महाविद्यालयांना सुट्या असल्याने ग्रामीण भागातील बहुतांशी बसफेऱ्या बंद करण्यात आल्या होत्या. (latest marathi news)

बसफेऱ्या बंद असल्याने विद्यार्थी व नागरिकांची गैरसोय होत होती. प्रसंगी जादा प्रवास भाडे खर्च करून खासगी प्रवासी वाहनाने विद्यार्थी व नागरिकांना प्रवास करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन रोहिणी खडसे यांनी २७ जूनला विभागीय नियंत्रक भगवान जगनोर यांची भेट घेऊन त्यांना बंद असलेल्या बसफेऱ्या नियमित सुरू कराव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे केली होती. याला अनुसरून विभागीय नियंत्रक भगवान जगनोर यांनी भुसावळ व मुक्ताईनगर आगार प्रमुखांना सदर बसफेऱ्या पूर्ववत नियमित सुरू करण्याबाबत लेखी सूचना केल्या आहेत.

...बसफेऱ्या पूर्ववत

त्या अनुषंगाने भुसावळ आगरातून भुसावळ ते बोदवड सुरवाडा मार्गे (सकाळी साडेअकरा, दुपारी १.४० वाजता), भुसावळ ते लोणवाडी (सायंकाळी सात), सोयखेडा (सकाळी साडेसात), वाकी (सकाळी आठ, दुपारी ४.१० वाजता), सुरवाडा (सकाळी साडेपाच व दुपारी २.१० वाजता), विचवा (दुपारी ३.४० वा) अशा बसफेऱ्या पूर्वी प्रमाणे नियमित सुरू झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT