Water entered the fields due to heavy rains. esakal
जळगाव

Jalgaon Cloud Burst : चाळीसगाव तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Cloud Burst : माळशेवगे (ता. चाळीसगाव) परिसरात आज (शुक्रवारी) दुपारी साडेचारच्या सुमारास ढगफुटीसदृश पाऊस झाला. येथील नाल्याला पूर आल्याने आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले. शहरासह परिसरात साडेचारच्या सुमारास पावसाला सुरवात झाली. त्यापूर्वी ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने पाऊस होण्याची चिन्हे दिसत होती. माळशेवगे परिसरात साडेचारला सोसाट्‍याच्या वाऱ्यासह पावसाला सुरवात झाली. (Cloudburst like rain in Chalisgaon taluka )

काही वेळातच पावसाचा जोर वाढल्याने मुसळधार पाऊस सुरु झाला. अचानक वाढलेल्या पावसामुळे गावातील मंदिरालगतच्या नाल्याला मोठ्‍या प्रमाणावर पाणी वाढले. बघता बघता नाल्याला पूर आल्यानंतर त्यात नाल्यातील झाडेझुडपे व कचरा मोठ्‍या प्रमाणावर असल्याने नाल्यातील पाणी आजूबाजूच्या शेतांमध्ये शिरले. ज्यामुळे शेतकरी सीताराम पाटील, काशिनाथ पाटील, चंद्रकांत पाटील, पुंडलिक बोरसे, अमोल पाटील यांच्यासह इतरही काही शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये पाणी घुसल्याने अक्षरशः शेती वाहून गेल्याचे दिसून आले. (latest marathi news)

काही शेतकऱ्यांनी नुकतेच लागवड केलेले कपाशीचे बियाणे देखील या पाण्यात वाहून गेले. या भागात तब्बल दोन तास मुसळधार झालेल्या पावसाने ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण केली होती. माळशेवगेतील नाल्याला पाणी आल्यानंतर त्याचा व्हिडिओ विविध व्हॉट्‍सअप ग्रुपवर व्हायरल होत असताना ढगफुटी झाल्याचा मेसेज प्रसारित करण्यात आला. मात्र, ढगफुटी नसून पहिलाच मुसळधार पाऊस झाल्याने ग्रामस्थांकडून सांगण्यात आले. दरम्यान, या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. अनेक शेतकऱ्यांनी शनिवारी(ता.१४) कपाशी लागवडीचे नियोजन केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: नवीन रक्तगटाचा शोध ते येत्या पंधरा दिवसात आचार संहिता लागणार

Maratha Reservation : आता वेळ वाढवून देणार नाही; मनोज जरांगे पाटील

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Vaman Mhatre यांच्या अडचणी वाढणार! FIR व्हायरल केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची पीडित मुलीच्या आईची मागणी

AFG vs SA 1st ODI : अफगाणिस्तानने इतिहास घडवला, दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला

SCROLL FOR NEXT