Majhi ladki Bahin Yojana esakal
जळगाव

CM Majhi Ladki Bahin Yojana : जिल्ह्यात 2 लाख बहिणींचे अर्ज; केवळ 9 टक्के काम

Jalgaon News : एकूण पात्र महिलांच्या केवळ ९.८५ टक्के महिलांनी अर्ज भरले आहेत. सर्व्हर बंद, तांत्रिक कारणामुळे अद्यापही ९० टक्के काम या योजनेचे अपूर्ण आहे.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’चे आतापर्यंत १ लाख ९९ हजार ६१९ अर्ज मिळाले आहेत. एकूण पात्र महिलांच्या केवळ ९.८५ टक्के महिलांनी अर्ज भरले आहेत. सर्व्हर बंद, तांत्रिक कारणामुळे अद्यापही ९० टक्के काम या योजनेचे अपूर्ण आहे. (CM Majhi Ladki Bahin Yojana Applications of 2 lakh sisters in jalgaon district)

राज्य शासनाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी ही योजना सुरू केली. मुख्यमंत्र्यांच्या या महत्त्वाकांक्षी योजनेत जिल्हा अग्रेसर राहण्यासाठी मिशन मोडवर काम करा, असे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले होते. या योजनेच्या नोंदणीसाठी शहरात वॉर्डनिहाय नियोजन करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. तरी या योजनेचे अर्ज भरण्यासाठी बहिणींची फरफट सुरूच आहे.

जन्माचा दाखला घेण्यासाठी त्यांना माहेरी जावे लागत आहे. संबंधित शाळांमध्ये अनेक अर्ज महिलांनी जन्म दाखल्यासाठी केले आहेत. यामुळे संबंधित शाळांचे काम वाढले आहे. जन्म दाखल्यानंतर रेशन कार्डातही नाव आवश्‍यक आहे. यामुळे नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी, असलेल्या रेशन कार्डात नाव वाढविण्यासाठी तहसील कार्यालयात गर्दी दिसून येत आहे.

योजना जाहीर झाल्यानंतर लागलीच अडीच लाख उत्पन्न असल्याचा दाखला तलाठी, तहसीलदारांकडे घेण्यासाठी महिलांनी गर्दी केली होती. अनेक महिलांनी १५०० रुपये मिळणार, म्हणून कामांना दांड्या मारून योजनेसाठी लागणारी कागदपत्रे जमा करण्यासाठी तलाठी, सेतू केंद्र, आपले सरकार केंद्रांवर गर्दी केली होती.

शासनाने योजनेसाठी लागणाऱ्या काही अटींमध्ये सूट दिल्यावरही जन्म दाखल्यासाठी महिला व त्यांच्या कुटुंबीयांची फरफट सुरू आहे. सेतू सुविधा केंद्र, तहसील कार्यालयात अर्ज भरण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता, शासनाने आता ‘माझी बहीण ॲप’ही आणले आहे.

यामुळे महिलांना घर बसल्याही अर्ज भरता येणार आहे. मात्र, अनेक महिलांना हे ॲप डाउनलोड करताना व कागदपत्रे अपलोड करताना अडचणी येत असल्याने त्यांनी पुन्हा सेतू सुविधा केंद्रावर धाव घेतल्याचे चित्र आहे. (latest marathi news)

आकडे बोलतात...

२०११ च्या जनगणनेनुसार

*जिल्ह्यात पात्र महिला : २० लाख २६ हजार ६०७

*एकूण प्राप्त अर्ज : १ लाख ९९ हजार ६१९

*आनलाईन प्राप्त अर्ज : ७१ हजार ५८७

*आफलाईन प्राप्त अर्ज : १ लाख २८ हजार ०३२

*ग्रामपंचायतीद्वारे भरलेले अर्ज : १ हजार ३९३

*एकूण मदत केंद्रे : ४ हजार ७७

*एकूण टक्के काम : ९.८५ टक्के

"जिल्ह्यातील पात्र महिलांनी ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनचे अर्ज त्वरित भरून घ्यावेत. त्यासाठी त्यांच्या परिसरात सुरू केलेल्या मदत केंद्राचा लाभ घ्यावा."

- आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

Trending News : काॅंग्रेसचे दोन गट भररस्त्यात भिडले, तितक्यात अॅम्बुलन्स आली अन् पुढे जे घडलं...

SCROLL FOR NEXT