CM Vayoshri Yojana esakal
जळगाव

CM Vayoshri Yojana : ज्येष्ठांसाठी ‘मुख्यमंत्री वयोश्री’ योजना! अर्ज करण्याचे समाज कल्याण विभागाचे आवाहन

Jalgaon News : योजनेची जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत माहिती पोहोचावी, यासाठी समाज कल्याण विभागाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : ज्येष्ठ नागरिकांना आधार देण्यासाठी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासन आता ॲक्शन मोडवर आले आहे. ६५ वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना मदतीचा हात म्हणून एकवेळ एकरकमी ३ हजार रुपये त्यांच्या बचत खात्यात थेट वितरण करण्यासाठी राज्यात ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी अर्ज करावा, असे आवाहन सहाय्यक समाज कल्याण आयुक्त योगेश पाटील यांनी केले आहे. (jalgaon CM Vayoshri Yojana for Seniors)

ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/उपकरणे खरेदीसाठी, त्यांचे मन:स्वास्थ्य केंद्र, योगा उपचार केंद्रांद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणासाठी या योजनेच्या माध्यमातून तीन हजार त्यांना मिळणार आहेत.

पात्र ज्येष्ठ लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक असमर्थता आणि दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने, उपकरणे खरेदी करता येतील. त्यात चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टिक व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नी-ब्रेक्स, लंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर यांचा समावेश आहे. राज्य शासनाद्वारे नोंदणी करण्यात आलेल्या योगा उपचार केंद्र, मनस्वास्थ्य केंद्र, मनशक्ती केंद्र व प्रशिक्षण केंद्रात त्यांना सहभागी होता येणार आहे. (latest marathi news)

योजनेची जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत माहिती पोहोचावी, यासाठी समाज कल्याण विभागाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, उपजिल्हा रुग्णालयांमार्फत ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियान’ अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण व स्क्रीनिंग घरोघरी जाऊन करण्यात येते. त्या सर्वेक्षणाबरोबरच या योजनेच्या लाभार्थ्यांची तपासणी करण्यात येत आहे.

महापालिका आयुक्त, सहाय्यक आयुक्त, जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण/जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यांच्या समितीतर्फे अंमलबजावणी करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी वरील सर्व संबंधित कार्यालयात संपर्क साधावा. ३१ डिसेंबर २०२३ ला वयाची ६५ वर्ष पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार असून, त्यांच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीसाठी भाजपचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल

Mumbai Assembly Election 2024 Results Live : मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT