Vidhan Sabha Election esakal
जळगाव

Jalgaon Vidhan Sabha Election 2024 : उमेदवारांना 90 लाखांची खर्च मर्यादा : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

Vidhan Sabha Election : जळगाव जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील अकरा मतदार संघातील मतदानाची तयारी पूर्ण केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : राज्यात विधानसभा निवडणुकीची तारीख अद्याप निवडणूक आयोगाने जाहीर केली नसली तरी, जळगाव जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील अकरा मतदार संघातील मतदानाची तयारी पूर्ण केली आहे. जिल्ह्यात ३६ लाख ४६ हजार ८२४ मतदार आहेत. त्यात पुरूष मतदार १८ लाख ७५ हजार ९१८ तर महिला मतदार १७ लाख ७० हजार ७६२ आहेत. तृतीयपंथी मतदार १४४ आहेत. यंदा निवडणुकीत उमेदवारांना ९० लाखापर्यंत खर्च करता येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. (Collector Ayush Prasad statement of Expenditure limit of 90 lakhs for candidates )

निवडणूक उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर यावेळी उपस्थित होते. निवडणुकीच्या प्रक्रियेची तयारी जिल्हा प्रशासनाने पूर्ण केली आहे. जिल्ह्यातील अकराही मतदारसंघांत मतदान यंत्राचे लवकरच वाटप होईल. मतदारसंघांत मतदार संघ निवडणूक निर्णय अधिकारी त्या त्या मतदार संघाचे प्रमुख असतील. यंदा निवडणुकीत उमेदवारांना ९० लाखापर्यंत खर्च करता येईल. त्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकेत खाते सुरू करावे लागेल. दहा हजार रूपये अनामत रक्कम अर्ज भरताना भरावी लागेल.

आरक्षित संवर्गासाठी पाच हजारांची अनामत रक्कम आहे. यंदा ‘२-ब’ नमुन्यात अर्ज उमेदवारास भरावा लागेल. उमेदवार राज्यात कोणत्याही मतदार संघात उभा राहू शकतो. मात्र सुचक व अनुमोदक त्या-त्या मतदार संघातील असावेत. त्यासाठी सुचक, अनुमोदकांना त्या मतदार संघातील मतदार यादीत त्यांचे नाव असल्याचा पुरावा द्यावा लागेल. जिल्ह्यात मतदान कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलेले आहेत. येत्या बुधवारी, गुरूवारी संबंधित मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी त्यांच्या तयारीचा आढावा सादर करतील. (latest marathi news)

मतदारसंघनिहाय मतदार असे

मतदार संघ.....मतदान केंद्रे......पुरूष....महिला--तृतीयपंथी--एकूण

चोपडा (एसटी)...३३७.........१,६७,०७१--१,६२,५२८--३....३,२९,६०२

रावेर...............३२८.........१,५७,६०५...१,४९,९९२...३....३,०७,६००

भुसावळ-(एससी)--३१६......१,६१,०५७...१,५३,२२८..४०...३,१४,३२५

जळगाव शहर.......३५८.......२,२१,४३५--२,०५,४७२.....३४.....४,२६,९४१

जळगाव ग्रामीण.....३५३.....१,७१,१५८.....१,६२,८७४....४.........३,३४,०३६

अमळनेर...........३२५.......१,५६,६५४....१,४८,९६९.....३......३,०५,६२६

एरंडोल..........२९८........१,४९,९०९.....१,४२,१३५....१०.....२,९२,०५४

चाळीसगाव......३४४........१,९५,२१०.......१,७६,८८८...२९.....३,७२,१२७

पाचोरा..........३५४.........१,७०,४१९.....१,५९,८९६....८....३,३०,३२३

जामनेर.........३४२........१,७०,९८१.......१,६१,२८९....१.....३,३२,२७१

मुक्ताईनगर......३२२.......१,५४,४१९.......१,४७,४९१.....९.....३,०१,९१९

एकूण...........३,६७७.......१८,७५,९१८......१७,७०,७६२....१४४.....३६,४६,८२४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT