District Collector Ayush Prasad, CEO Ankit while releasing the informational poster of agricultural schemes in the pre-Kharif season meeting. esakal
जळगाव

Jalgaon District Collector : बँकांनी शेतकऱ्यांना किसान क्रेडीट कार्ड द्यावे : जिल्हाधिकारी प्रसाद

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान कसे उंचावेल, यासाठी कृषी विभागाने प्रयत्न करावेत. शेतजमिनीत रासायनिक खतांचा वापर टाळून जमिनीचे आरोग्य कसे टिकेल. शेतकऱ्यांच्या पिकांची उत्पादकता कशी वाढेल, यासाठी प्रयत्न करावेत. जिल्हा बँक व राष्ट्रीय बँकांनी किसान क्रेडिट कार्डधारकांची प्राधान्याने संख्या वाढविण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त प्रयत्न करावेत. (Collector Prasad statement Banks should give Kisan Credit Card to farmers)

बोगस बियाण्यांची विक्री होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी रविवारी (ता. २८) दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या खरीपपूर्व हंगाम बैठकीत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अंकीत, विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी.

प्रकल्प संचालक (आत्मा) रविशंकर चलवदे, कृषी विकास अधिकारी सूरज जगताप, कृषी उपसंचालक चंद्रकांत पाटील, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रणवकुमार झा, नाबार्डचे व्यवस्थापक श्रीकांत झांबरे आदी उपस्थित होते. खरीप हंगामासाठी प्रत्येक तालुकानिहाय पिकांचे सूक्षम नियोजन करावे. शेतजमीन तयार करण्यापासून ते बीज प्रक्रिया मोहिम राबविण्यापर्यंत, खतांचे नियोजन, खतांचा वापर कमी करून कंपोस्ट खते व इतर ग्रीन मॅन्युअरिंग,

अशा जैविक घटकांचा पावर करून व खर्च नियंत्रणात ठेवून कमीत कमी कीटकनाशकांचा वापर करावा. जमिनीचे आरोग्य टिकवून जास्तीत जास्त उत्पादकता कशी वाढेल, यावर भर द्यावा. शेतकऱ्यांचे राहणीमान कशाप्रकारे सुधारणा होईल, याकडे लक्ष द्यावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे कृषी विभागाच्या विविध योजनांच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाही व नियोजनाची माहिती दिली. (latest marathi news)

मकाला प्राधान्य द्या

जळगाव जिल्ह्यात पाच लाख ५८ हजार ३९२ हेक्‍टररावर कापसाची लागवड प्रस्तावित आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी कापूस पिकाला पर्याय म्हणून जास्तीत जास्त क्षेत्रावर मका पिकाची लागवड करण्याबाबत जनजागृती करावी. या वर्षाचे पर्जन्यामानाची अनुकूल परिस्थिती लक्षात घेऊन कृषी विभागाच्या फळबाग लागवड.

कमी पाण्यावर येणारी पिके घ्यावीत, व्हर्मी कंम्पोस्ट, नाडेप व वैयक्तिक शेततळे व जलसंधारणाची कामे लोकसहभाग करून घेण्यासाठी प्रयत्न करावेत. जेणेकरून पावसाच्या खंडित कालावधीत ठिबक सिंचनाव्द्वारे साठवणूक केलेल्या पाण्याचा उपयोग शेतीसाठी करणे सोयीचे ठरणार आहे.

१८ हजार क्विंटल बियाण्यांची मागणी

खरीप हंगाम २०२४-२५ साठी कापूस व सोयाबीन वगळता ९ लाख ६८ हजार ६०५ हेक्टरसाठी १८ हजार ४३८ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यात ५ लाख ५८ हजार ३९२ हेक्‍टरसाठी २७ लाख ९२ हजार बीटी बियाण्याच्या पाकिटांची मागणी नोंदविली आहे.

३ लाख टन खते

खरीप हंगामासाठी तीन लाख ४० हजार टन खतांची मागणी केली आहे. यापैकी तीन लाख २३ हजार टन खतांचे व ७३ हजार २०० नानो युरियाचे आवंटन कृषी आयुक्‍तालयाकडून जिल्ह्यास मंजूर झाले आहे.

१६ भरारी पथके

जिल्ह्यात बोगस बियाणे, बियाणे व खतांची जास्ती दराने विक्री होऊ नये, म्हणून बियाण्यांची गुणवत्ता नियंत्रणासाठी १६ भरारी पथके नियुक्‍त केले असून, ४२ निरीक्षक नियुक्‍त केले आहेत. रोहयो अंतर्गत फळबाग लागवड योजना, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतंर्गत ३५८२ हेक्‍टर क्षेत्रावर लागवड होणार असल्याचे श्री. तडवी यांनी सांगितले.

शेतकऱ्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करावा

२०२४-२५ मध्ये सात लाख ४४ हजार ५९३ क्षेत्रावर खरिपाचे उद्दिष्ट निश्‍चित केले आहे. त्यासाठी उत्पादन खर्च कमी करून उत्पन्नात वाढ होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांनी उपयोग करावा, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत शेतकरी बांधवांचे ई-केवायसी झालेले नाही. त्याबाबत तत्काळ कार्यवाही करावी. जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रधारकांनी शासनाने ठरवून दिलेल्या किमतीनुसारच रासायनिक खतांची विक्री करावी.

खते, बियाणे व कीटकनाशकांची जादा दराने विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्रावर गुन्हे दाखल करावेत. भरारी पथकांची स्थापना करावी. एचटी बीटी कपाशी वाणांची विक्री होणार नाही, याची दक्षता घ्यावी. शेतकरी बांधवांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज भरण्यासाठी मोहीम स्वरूपात जनजागृती करण्याचे आवाहन श्री. वाघ यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT