Jalgaon Agriculture News : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यंदा दहा टक्के वाढीव पीककर्ज प्रतिहेक्टरी मिळणार आहे. यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांनी पीककर्ज घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत केले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, कृषी उपसंचालक पाटील उपस्थित होते. श्री. प्रसाद म्हणाले, की जिल्ह्यात बियाणे उपलब्ध झाली आहेत. शेतकऱ्यांनी शंभर मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नये. ( Collector Prasad statement on 10 percent per hectare increased loan to farmers )
एका विशिष्ट प्रकारच्या बियाण्यांची मागणी शेतकऱ्यांनी करू नये. उपलब्ध बियाण्यांंची पेरणी करावी. जादा दराने बियाणे विक्री होत असल्यास संबंधित विक्रेत्याची तक्रार लेखी स्वरूपात करावी. आतापर्यंत ६६ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, तर सहा विक्रेत्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. यंदा कापसाचा पेरा ५ लाख ५८ हजार हेक्टरवर होणार आहे. त्यासाठी २७ लाख ९२ हजार बियाणे पाकिटांची मागणी केली आहे, तर २० लाख ७६ हजार पाकिटे उपलब्ध झाली आहेत. जिल्ह्यात ४ लाख ८९ हजार शेतकरी आहेत.
ट्रेनिंगमुळे मतमोजणी प्रक्रिया सुरळीत
जिल्हाधिकारी प्रसाद म्हणाले, की लोकसभा निवडणुकीचे मतदान व मतमोजणीचे प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना दिले. त्यांच्याकडून सराव करून घेतला. यामुळे मतदान व मतमोजणी योग्य प्रकारे झाली. कोणत्याही घोळ झाला नाही. मतमोजणीदरम्यान बॅटरी एकच टक्केच का कमी झाली, असे सांगत उमेदवार श्रीराम पाटील यांनी मतमोजणी थांबविण्याची मागणी केली. मात्र, ती नाकारण्यात आली. त्यांचे समाधान होईपर्यंत त्यांना उत्तरे देण्यात आली. (latest marathi news)
टपाल मतमोजणीला वेळ लागला. कारण प्रत्येक टपाल मताचे स्कनिंग करावे लागत होते. २५६ टपाली मतदान बाद झाले. कारण दोन ठिकाणी त्यांनी शिक्के मारले होते. मतमोजणीची प्रक्रिया बुधवारी (ता. ५) पहाटे सातला संपली. २४ तास मतमोजणीच्या मतदान यंत्रे सील करून स्ट्रॉग रूममध्ये ठेवेपर्यंत लागली. शिक्षक मतदारसंघासाठी मतदारयाद्या तयार आहेत. जिल्ह्यात १३ हजार ५६ मतदार आहेत. मतदानासाठी २१ केंद्रे आहेत.
महामार्गाशेजारी वृक्ष लावणार
जिल्ह्यात तापमान वाढले होते. यावर वृक्ष लावणे हाच उपाय आहे. महामार्गाशेजारी बांबू वृक्ष लावण्याच्या सूचना ग्रामपंचायतींना दिल्या आहेत. रोजगार हमी योजनेतून ते कामे करू शकतात. बांबू वृक्ष तीन वर्षांचे झाल्यानंतर ते त्यांना निम्मा तोडून विक्री करून ग्रामपंचायती उत्पन्न मिळवू शकतात, असे ते म्हणाले.
विद्यार्थ्यांचा पाया पक्का करणार
सेतू अभ्यास (पायाभूत साक्षरता, व संख्या ज्ञान क्षमता) या उपक्रमांतर्गत सर्व जिल्हा परिषद शाळा, महापालिका, नगरपालिका शाळा, खासगी अनुदानित शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सर्व लिहिता, वाचता आले पाहिजे, यासाठी उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी लवकरच शिक्षणाचे प्रशिक्षण घेण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी प्रसाद म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.