Jalgaon Municipal Corporation esakal
जळगाव

Jalgaon Municipality News : फुले मार्केट गाळे भाडे, अतिक्रमण प्रश्‍नावर लवकरच ‘तोडगा’

Jalgaon Municipality News : शहरातील फुले मार्केट गाळे भाडे निश्चिती तसेच वाढते अतिक्रमणांवर कायमचा उपाय करण्याबाबत नियोजन सुरू आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Municipality News : शहरातील फुले मार्केट गाळे भाडे निश्चिती तसेच वाढते अतिक्रमणांवर कायमचा उपाय करण्याबाबत नियोजन सुरू आहे. दोन्ही प्रश्‍न लवकरच सोडविण्यात येतील अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांनी दिली.

शहरातील फुले मार्केटसह वीस व्यापारी संकुलाच्या गाळे भाडे निश्‍चितीचा प्रश्‍न प्रलंबीत आहे. फुले मार्केट हे शहरातील महत्त्वाचे संकुल आहे. (Jalgaon Commissioner Dr Vidya Gaikwad statement Phule Market encroachment issue resolved soon)

आर्थिक वसुलीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. परंतु फुले मार्केटच्याही गाळे भाडे निश्चितीचा प्रश्‍न २०१२ पासून प्रलंबीत आहे. त्याबाबत अनेक वेळा नवनवीन प्रस्ताव दिले होते. मात्र त्याबाबत सहमती झाल्याने तो प्रश्‍न सुटलाच नाही.

आताही शासनाने दिलेल्या निर्णयावर महापालिकेने शासनाकडून रेडीरेकनर दरावर लावण्यात टक्क्याच्या दराबाबत फेरविचार करण्याचे पत्र देवून निर्देश मागविले आहेत. मात्र अद्यापही शासनाकडून त्याबाबत नवीन कोणतेही आदेश आलेले नाहीत. त्यामुळे हा प्रश्‍न प्रलंबित असून महापालिकेची गाडे भाडे निश्‍चितीची वसुली थांबली आहे.

अतिक्रमण गंभीर प्रश्‍न

फुले मार्केटमध्ये फेरीवाल्यांकडून होत असलेल्या अतिक्रमणाचा प्रश्‍न गंभीर आहे. त्या ठिकाणी अतिक्रमण वाढल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मार्केट ये-जा करण्यास अडचण निर्माण होत आहे. महापालिकेने अतिक्रमण काढण्याची कारवाईनंतरही त्या ठिकाणी अतिक्रमण पुन्हा होत असते. (latest marathi news)

याबाबत कायम स्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांकडून तसेच संकुलातील दुकानदारांकडून होत आहे. मात्र दुसरीकडे दुकानदारच या फेरीवाल्यांना जागा देवून त्यांच्याकडून भाडे वसुल करीत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे या ठिकाणीही अतिक्रमणधारकांवर कारवाईचा पेच निर्माण झाला आहे.

उपायुक्तांकडे स्वतंत्र जबाबदारी

महापालिका आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांनी सांगितले, की फुले मार्केटमधून गाळे भाडे वसुल होत नसल्यामुळे महापालिकेचे मोठे नुकसान होत आहे. तर दुसरीकडे याच संकुलात वाढत्या अतिक्रमणामुळे जनतेला त्रास होत आहे. दोन्ही प्रश्‍नावर कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी उपायुक्त निर्मला गायकवाड-भोसले यांच्याकडे जबाबदारी दिली आहे.

त्या दोन्ही विषयाचा अभ्यास करीत असून लवकरच त्याबाबत एक प्रस्ताव करून त्या अहवाल देणार आहेत. त्यानुसार त्यावर विचार करून निर्णय घेण्यात येईल. येत्या काही दिवसात फुले मार्केटचे हे दोन्ही प्रश्‍न सुटलेले असतील अशी ग्वाही त्यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT