Excavation done near the entrance of houses for construction of sewers in new settlements and mud created on roads. esakal
जळगाव

Jalgaon News : गटारीसह पाणी योजनेचे कामे लवकर पूर्ण करा; एरंडोल शहरात मागणी

आल्हाद जोशी

Jalgaon News : शहराबाहेर असलेल्या नवीन वसाहतींमधील गटारी व नवीन पाणीपुरवठा योजनेचे कामे लवकर पूर्ण करण्यात यावेत, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे. नवीन वसाहतींमध्ये घरांच्या प्रवेशद्वाराजवळ गटारींसाठी खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे व नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी ठिकठिकाणी रस्ते खोदण्यात आल्याने रहिवाशांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. म्हणून मोठ्या प्रमाणात गैरसोयही होत आहे. (Complete works of water schemes along with sewerage )

एरंडोल शहराचा विस्तार वेगाने होत आहे. अनेक नवीन वसाहती निर्माण होत आहेत. नगरपालिकेचा हजारो रुपयांचा कर भरणारे रहिवासी मुलभूत सोयी व सुविधांपासून वंचित राहत आहेत. शहराबाहेर व नगरपालिकेच्या हद्दीत समावेश करण्यात आलेल्या नवीन वसाहतींमध्ये नवीन गटारींचे बांधकाम व नवीन पाणीपुरवठा योजनेची कामे सुरू आहेत. गटारीचे कामे वेगाने सुरू आहेत, तर पाणीपुरवठा योजनेचे काम अत्यंत संथगतीने होत आहे.

नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी सर्व रस्ते खोदण्यात आलेले आहेत. गटारींच्या कामांसाठीदेखील घरांच्या प्रवेशद्वाराजवळच खोदकाम करण्यात आलेले आहे. सध्यास्थितीत पावसाळा सुरू असल्याने नवीन वसाहतींमध्ये सर्वत्र चिखल व गारा झालेला आहे. त्यामुळे स्थानिक रहिवासी त्रस्त झालेले आहेत. गटारीच्या कामासाठी प्रवेशद्वाराजवळच खड्डे खोदण्यात आलेले आहेत. त्यामुळे रहिवाशांना घरात ये-जा करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

याचा सर्वाधिक त्रास ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान बालकांना सहन करावा लागत आहे. गटारींचे कामे सुरू असल्याने सांडपाणी वाहण्यात अडचण निर्माण होत असून, परिसरातच सांडपाणी तुंबत असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरून डासांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे रहिवाशांच्या आरोग्याची समस्या निर्माण होण्याची भीती आहे. तुंबलेल्या सांडपाण्यात डुकरे व मोकाट कुत्र्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. (latest marathi news)

नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी नवीन वसाहतींसह शहरातदेखील पक्के रस्ते खोदून त्यात पाईप टाकण्यात आले आहेत. मात्र, पाईप टाकल्यानंतर रस्ता योग्य पद्धतीने दाबण्यात न आल्याने खड्ड्यांमध्ये मोटारसायकली अडकत आहेत. नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम अत्यंत संथगतीने सुरू असताना नगरपालिका प्रशासनाने मात्र, याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केलेले दिसून येत आहे.

नवीन वसाहतींमधील मोकळ्या जागांवर नगरपालिकेने ठिकठिकाणी आकर्षक सर्व सोयींनीयुक्त सार्वजनिक उद्यानांची निर्मिती केली आहे. सकाळी व सायंकाळी नागरिक उद्यानांमध्ये फिरण्यासाठी जातात. मात्र, गटार व पाणीपुरवठा योजनेच्या कामांमुळे फिरण्यासाठी जाता येत नसल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली. मुलांसाठी उद्यानांमध्ये विविध प्रकारच्या खेळांचे साहित्य लावले आहे.

मात्र, रस्त्यांवर सर्वत्र गारा व चिखल असल्यामुळे मुलांना खेळण्यांचा आनंद घेण्यापासून वंचित राहावे लागत आहे. याबाबत पालिका प्रशासनाने त्वरित दखल घेऊन गटार व नवीन पाणीपुरवठा योजनेचे कामे लवकर पूर्ण करण्याच्या सुचना ठेकेदारास द्याव्यात, अशी मागणी नवीन वसाहतींमधील नागरिकांमधून केली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT